भारत छोडो आंदोलनात थेट शिक्षण सोडून देणारे शायर म्हणजे कैफी आजमी….
‘दबा दबा सा सही दिल में प्यार है की नहीं’ , ‘वक्त ने किया क्या हसीं सितम’
अशी एकदम हृदय पिळवटून टाकणारी गाणी लिहिणारे कैफी आजमी आजमी शायरीच्या दुनियेतील एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व होय.
शायरीचा नाद हा तसा डेंजरच म्हणजे आजवर आपण जितके शायर ऐकले किंवा वाचले असेल प्रत्येकाच्या जीवनात अशी काहीतरी घटना घडते की, तो शायरीकडे वळतो कारण शायरी त्याला रिझवते, समाधान देते असा सगळा हा झोन फक्त दुःख हलकं करण्यासाठी. पण कैफी आजमी यांची शायरी लिहिण्याची सुरवात झाली ती भारत छोडो आंदोलनात.
भारत छोडो आंदोलनात ते इतके गुंतले होते की त्यांनी थेट अभ्यासालाच रामराम ठोकला होता. तर आज आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
शबाना आझमी यांचे वडील आणि गीतकार जावेद अख्तर यांचे सासरे कैफी आझमी यांचा जन्म उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील मेजवान गावात झाला. कैफी आझमी यांचा जन्म जमीनदार कुटुंबात झाला, पण त्यांचे हृदय गरीब भाबड्या आणि कष्टकरी लोकांसाठी नेहमीच धडधडत असे.
कैफी आझमी यांनी पाकीजा, कागज के फूल, हीर रांझा आणि हकीकत यांसारख्या चित्रपटांसाठी गाणी लिहिली असतील पण त्यांच्या कवितेची सुरुवात ‘भारत छोडो आंदोलन’ने झाली
१९४२ च्या भारत छोडो आंदोलनासाठी त्यांनी आपले शिक्षण सोडले. त्यानंतर ते पूर्णवेळ मार्क्सवादी झाले. याच काळात ते मुंबईला आले आणि पक्षाचे कौमी जंग हे वृत्तपत्र चालवू लागले.
स्वयंक्रांतिकारक असलेल्या कैफी आझमी यांच्या लग्नाची कहाणीही खूप भन्नाट आहे.
असे सांगितलं जाते की, ते हैदराबादमध्ये एका मुशायराला गेले होते आणि याच दरम्यान त्यांची शौकतशी भेट झाली, ही पहिलीच भेट दोघांनाही वेड लावून गेली आणि त्यांनी नंतर लग्न केलं. शौकत आझमी यांनी नंतर नाटक आणि चित्रपटांमध्ये अभिनयाद्वारे आपला ठसा उमटवला.
कैफी आझमी यांचा पहिला कवितासंग्रह 1943 मध्ये ‘झंकार’ या नावाने प्रसिद्ध झाला. गीतकार म्हणून त्यांनी अनेक चित्रपटांसाठी गाणी लिहिली, परंतु कागज के फूल, हकीकत आणि हीर रांझा या चित्रपटांसाठी ते लोकांच्या विशेषतः लक्षात राहतात.
‘कागज के फूल’ या चित्रपटातील ‘वक्त ने किया क्या हसीन सितम’ आणि ‘पाकीजा’मधील चलते चलते या गाण्यासाठी त्यांची आठवण होते. विशेष म्हणजे कैफी आझमीची लोकप्रियता भारतातच नाही तर पाकिस्तानातही आहे. अनेकदा त्यांची कविता शेजारच्या देशातही ऐकायला मिळते.
अर्थ’ चित्रपटातील ‘झुकी झुकी सी नजर’ हे गाणे जगजीत सिंग यांच्या आवाजासाठी ओळखले जाते, परंतु हे गाणे कैफी आझमी यांनी लिहिले असल्याचे फार कमी लोकांना माहिती आहे. या चित्रपटात कैफी आझमी यांची मुलगी शबाना हिने काम केले आहे. हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले आहे.
याशिवाय कैफी आझमी यांनी जगजीत सिंग यांनी गायलेली ‘तुम इतना जो मुस्करे रहे हो’ ही आणखी एक गझलही लिहिली होती.असे हे कैफि आजमी अजूनही त्यांच्या शायऱ्या लोकांच्या स्मरणात आहेत.
बस इक झिजक है यही हाल-ए-दिल सुनाने में
कि तेरा ज़िक्र भी आएगा इस फ़साने में …
बस्ती में अपनी हिन्दू मुसलमाँ जो बस गए
इंसाँ की शक्ल देखने को हम तरस गए…
हे ही वाच भिडू :
- आज आपल्या स्टेट्स वॉलवर दिसणाऱ्या मराठी शायरीचं श्रेय भाऊसाहेब पाटणकरांना जातं..
- फिराक गोरखपुरी यांच्या शिव्यांमध्येही शायरी असायची..
- आजही ‘रंजिश ही सही’ ऐकल्याशिवाय टेबलावरची बैठक संपत नाही…
- तिचं लग्न झालं आणि त्या रात्री मला ‘गालिब’ भेटला…