बॉलिवूडमध्ये आल्या आल्या कंगना आदित्य पंचोलीसोबतच्या लव अफेअरमुळे गाजली होती..

कंगना राणावत हे नाव आपण आता मागच्या बऱ्याच काही दिवसांपासून म्हणा किंवा वर्षांपासून चांगलंच ऐकतोय. आता ही कंगना पुन्हा चर्चेत आलीये. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट केलीये ज्यात तिने नाव न घेता बॉलीवूडच्या एका कपल थेट घरात घुसून मारण्याची धमकी दिलीये.

झालंय असं… या कंगानानं असा दावा केलाय की,

‘बॉलीवूड मधलं एक कपल आहे. ते कपल नुकतंच आई-बाबा झालंय. ते कपल माझ्यावर लक्ष ठेऊन आहे.’

हे कपल नेमकं कोण आहे हे तिने सांगितलं नाहीये. असं असलं तरी, तिने त्या कपल थेट धमकी दिलीये. तिने म्हटलंय… स्वत:ला सुधारा नाहीतर मी घरात घुसून मारेन.

आता या कारणानं ती चर्चेत आलीये, याआधी राजकीय वक्तव्यांमुळे, राजकीय भुमिकांमुळं ती चर्चेत होती. सगळ्यात आधी ती चर्चेत आलेली ती आदित्य पंचोली या नावामुळे.

आदित्य पंचोली हा हिरो देखील बऱ्याच लोकांना माहिती असेल. ९० चे आशिक लोकं तर त्याला अजिबात विसरू शकत नाही. कुठलाही रोल सांगा हा गडी लगेच करायला तयार व्हायचा. हिरो असू दे, व्हिलन असू दे किंवा हिरोचा भाऊ असू दे सगळं या भिडूने केलंय.

आता तुम्ही म्हणाल भिडू तू तर कंगना राणावतचा विषय सुरू केला होता आणि मधीच हे पंचोली पुराण कस काय यायला लागलं. अरे भया थांब की तिथंच येतोय. तर आजचा विषय आहे कंगना राणावत आणि कंगना राणावत या दोघांच्या अफेअरचा. म्हणजे गंभीरता समजून घ्या आता तुम्ही. आदित्य पंचोलीसुद्धा बराच वादग्रस्त अभिनेता म्हणून फेमस आहे आणि कंगना…थांबा पुढचा पॅरा तोच आहे.

अभिनेत्री कंगना राणौत तिच्या उत्कृष्ट अभिनय आणि वादग्रस्त प्रतिमा या दोन्हीसाठी ओळखली जाते. कंगना रणौतचे नाव अनेक स्टार्ससोबत जोडले गेले आहे. ज्यामध्ये अध्यायन सुमन, आदित्य पांचोली आणि हृतिक रोशन यांचाही समावेश आहे. कंगनाचे पहिले अफेअर आदित्य पांचोलीसोबत होते अशी चर्चा सतत असते पण आपण जरा बघूया डिटेलमध्ये काय विषय आहे हा.

2004 साल होतं. तेव्हा कंगना राणावत आणि आदित्य पंचोली यांची पहिल्यांदा भेट झाली.

दोघांची नजरानजर झाली आणि फुल फिल्मी वे मध्ये दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि एकत्र राहायला त्यांनी सुरवात केली. हा तो काळ होता जेव्हा कंगना राणावत कडे काम नव्हतं आणि ती काम मिळवण्यासाठी संघर्ष करत होती. त्याच काळात आदित्य पंचोलीसुद्धा मिळेल ते काम करत होता.

याच काळात कंगनाला सिनेमा मिळाला गँगस्टर. तिचं नशीब उघडलं आणि हा सिनेमा लोकांना भरपूर आवडला. हळूहळू कंगना राणावत हे नाव इंडस्ट्रीत चालायला सुरुवात झाली.

हा सगळा विषय एक बाजूला आणि दुसऱ्या बाजूला या चर्चा होत्या की कंगनाला आदित्य पंचोलीने मारहाण केली. तिच्या कानाखाली हाणलेली, ती जखमी झालेली.

अश्या अनेक बातम्या तेव्हा सुरू होत्या. याविषयी कंगणाने एका ठिकाणी सांगितलं होतं की वडिलांच्या वयाच्या माणसाने माझ्यावर हात उचलला आणि माझ्या डोक्याला जखम झाली होती. पण जेव्हा आदित्य पंचोलीने तीच्यावर हात उचलला तेव्हा तिने त्याला सँडल फेकून हाणली होती आणि ती त्याच्या डोक्यात बसली होती. असं ती म्हणतेय बरं…!

या घटनेनंतर मात्र आपल्याहून 20 वर्षे मोठे असलेल्या आदित्य पंचोली सोबत कंगनाने नातं तोडलं. आता जेव्हा आदित्य पंचोली हा कंगना राणावत सोबत रिलेशनशिप मध्ये होता तेव्हा त्याचं लग्न झालेलं होतं. अभिनेत्री झरीना वहाब त्याची बायको आहे.

तर असा सगळा हा विषय झालेला. दोन्ही वादग्रस्त लोकं एकाच घरात असल्यावर अजून काय होणार होतं अश्या गप्पा तेव्हा रंगत होत्या. आज त्याचा विसर पडलेला दिसतो पण कंगना आणि आदित्य पंचोली यांचं हे लव अफेअर त्याकाळातला हॉट टॉपिक असायचा.

एकंदरीत काय तर, कंगना बॉलीवूडमध्ये पहिल्यांदा चर्चेत आली ते आदित्य पंचोली, मारहाण, सँडेल आणि जखम या गोष्टींमुळे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.