दोनदा सर्वस्व गमावलेला माणूस पुन्हा उभा राहिला, आज आनंद महिंद्रांसकट कित्येकांचा हिरो आहे..

महिंद्रा अँड महिंद्रा या ब्रँडचे चेअरमन असलेले आनंद महिंद्रा जेवढं लक्ष आपल्या बिझनेस वर देतात तितकंच लक्ष त्यांचं देशातल्या लोकांच्या क्रियेटीव्हीटीवर असतं. म्हणजे काही दिवसांपूर्वी कोणीतरी गाडीचा जुगाड केला होता त्याचा व्हीडिओ आनंद महिंद्रा यांनी स्वत:च्या सोशल मीडियावर टाकून व्हायरल केला होता.

एखाद्या माणसाचं त्यांच्या फिल्ड रीलेटेड काम त्यांना आवडलं तर ते त्या व्यक्तीचं काम सरळ सोशल मीडियावर शेअर करतात. यातूनच आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ब्रँडच्या स्टार्टअप बॉयची लोकांना ओळख करून दिली. तर जाणून घेऊया या स्टार्टअप बॉय बद्दल.

आनंद महिंद्रा ज्यांना आपला स्टार्ट अप बॉय सांगतात त्या व्यक्तीचं नाव आहे परमजित सिंग.

आता हे परमजीत सिंग काय किरकोळ व्यक्ती नव्हतेच तर एकेकाळी सगळ्यात टॉपचे डिस्ट्रीब्युटर म्हणून त्यांची ओळख होती.

पण एका घटनेने त्यांना रस्त्यावर आणलं

ती घटना होती 1984 सालची दंगल. ही घटना म्हणजे परमजित सिंग यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी घटना ठरली. पुढे काय करायचं असा सगळा यक्षप्रश्न त्यांच्या पुढे येऊन ठाकला.

पण हिंमतवान माणसं कधी खचत नाही, त्यामुळे जे झालं ते झालं म्हणून भूतकाळ विसरत पाजींनी शून्यातून सुरवात केली आणि टॅक्सी ड्रायव्हरची नोकरी करायला सुरवात केली. पण संकटं काय कमी होतील अशी चिन्हं दिसत नव्हती.

टॅक्सी चालवता चालवता परमजित सिंग यांचा अपघात झाला. 

अपघातातून सावरत असताना त्यांनी रिक्षा सुरु केली आहे. ही रिक्षाची झिंग जाऊन पोहचली आनंद महिंद्रा यांच्याकडे. आनंद महिंद्रा यांनी परमजित सिंग यांचा हा थक्क करणारा प्रवास पाहिला आणि त्यांनी ट्विट केलं,

हा माझा पहिला स्टार्टअप हिरो आहे. यांनी आजवर जे केलंय तितका उत्साह आणि धाडस सगळ्यांनाच मिळो. फक्त एक बिझनेस सुरु करण्यासाठी पाजीनी त्यांचं आयुष्य नव्याने सुरु केलं ते पण एकदाच नाही तर दोनदा.

परमजित सिंह यांचं आधीच आयुष्य काय होतं तर त्यांचे वडिल शासकीय अधिकारी होते. 1984 च्या दंगलीआधी रसना या ब्रँडचे पाजी एकमेव डिस्ट्रीब्युटर होते. दिल्लीच्या लाजपत नगरला असलेल्या परमजित सिंग यांच्या गोडाऊन मधून सगळया दिल्लीला रसना पोहचला जायचा. पण त्यांचं आयुष्य कुठे बदललं तर जेव्हा दिल्लीत शीख दंगे सुरू झाले. या दंग्यामध्ये परमजीत सिंग यांचं सगळचं लुटलं गेलं. त्यामुळे दिल्लीत त्यांनी टॅक्सी सुरु केली.

आता कुठं पाजींच जीवन सुरळीत चालू होतं की मसुरी मध्ये त्यांच्या टॅक्सीला मोठा अपघात झाला. हा इतका डेंजर अपघात झाला होता की परमजित सिंग 13 दिवस कोमात होते. पण हळूहळू सगळं ठिक होत गेलं आणि आज ते रिक्षा तर चालवतातच पण आनंद महिंद्रा यांच्यामुळे परमजित सिंग हे आज महिंद्रा अँड महिंद्रा ब्रँडचे स्टार्ट अप बॉय झाले आहेत.

जुगाड करुन आणि मेहनतीच्या बळावर पुढे जाणारे लोकं आनंद महिंद्रा कायमच हुडकत असतात हे परमजित सिंग त्यातलेच एक भिडू. त्यामुळे 84 च्या दंगलीत पाजींनी सगळं काही गमावलं पण महिंद्रा ब्रँडचा स्टार्ट-अप बॉय होउन जगभर नाव कमावलं…!

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.