एकच डोळा असलेला इस्त्रायलचा सेनापती ज्याच्या नावानं अख्खं अरब जगत थरथरायचं

तिसरे अरब- इस्त्रायल युद्ध.

या युद्धात इस्त्रायलच्या विरोधात इजिप्त, जॉर्डन आणि सिरीया होते. युद्धाच्या पूर्वी हे तिन्ही देश इस्त्रायला उखडून टाकतील अशी चिन्ह होती. इस्त्रायलला समुद्रात बुडवणार हे फिक्स झालेलं होतं.

तीन देश विरुद्ध इस्त्रायल सारखा नवखां देश. कोणीही कल्पना केली नसेल की या युद्धात इस्त्रायल जिंकेल. पण तेव्हा तो जिंकला. इस्त्रायल फक्त जिंकला नाही तर हे युद्ध त्याने सहा दिवसात तडीस नेले. सहा दिवसांमध्ये युद्ध निकाली लावण्यात आले. 

हे युद्ध ज्याच्या नेतृत्वाखाली झाले तो मात्र या सहा दिवसांच्या युद्धामुळे नाराजचं होता. त्याच्या मते हे युद्ध एका दिवसात निकाली लावायचं होतं. त्याचा इतिहास वाचला तर तुम्हालाही पटू शकतं की या माणसाने एका दिवसात सुद्धा युद्ध निकालात लावलं असतं.

मोशे दायान यांच एक वाक्य फेमस आहे ते म्हणजे, 

स्वातंत्र्य म्हणजे आत्म्याचे ऑक्सिजन आहे

इस्रायलच्या लष्करी आणि राजकीय जीवनातील एक अत्यंत वादळी व्यक्तिमत्त्व असलेला मुत्सद्दी माणूस अशी जेरुसलेमच्या मोशे दायान यांची ओळख. मोशे दायान यांचे वर्णन ‘जन्मजात सेनानी’ असेही केले जाते.

त्यांचा जन्म २० मे १९१५ ला एका सधन ज्यू कुटुंबात दगानिया (पॅलेस्टाईन) येथे झाला. मोशे चे वडील श्मुएल शेतकरी होते. त्यांनी सहकारी कृषी वसाहत चळवळ सुरू केली. आणि आई द्वोराह ही ज्यू राष्ट्रीय आंदोलनाच्या बुद्धीवान नेत्याची मुलगी होती. बालपणात दायान सारखा आजारी पडायचा त्यामुळे त्याचे शालेय शिक्षण अर्धवट झाले.

शेतकी महाविद्यालयात शिकत असताना वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी हॅगाना या लष्करी संघटनेत प्रवेश घेतला. पुढे किंबर्ले (इंग्लंड) येथे त्यांना उच्च लष्करी शिक्षण घेण्यासाठी पाठविण्यात आले.

वयाच्या बाराव्या वर्षी तो हगनाह या ज्यूंच्या भूमिगत राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीत सामील झाला. परत तो काही दिवस शाळेत गेला. त्याची तिथे रूथ नावाच्या तरुणीशी गाठ पडली. पुढे जाऊन दायान ने शेतकी महाविद्यालयात शिकत असताना वयाच्या सोळाव्या वर्षी हॅगाना या लष्करी संघटनेत प्रवेश घेतला. पुढे त्यांना उच्च लष्करी शिक्षण घेण्यासाठी इंग्लडला पाठविण्यात आले.

पण आधी रूथ सोबत विवाहबद्ध झाला. त्याला एल नावाची मुलगी व दोन मुलगे झाले. एल लेखिका म्हणून, तर असफ हा मुलगा सिनेनट म्हणून पुढे प्रसिद्धीस आले. १९७१ मध्ये सु. ३६ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर त्याने रूथला घटस्फोट दिला.

१९१७ ते १९४८ अशी तीस वर्षे जेरुसलेम आणि इस्रायलवर ब्रिटिशांचा अंमल होता. त्याच वेळी सीरियावर फ्रेंच अंमल होता. ब्रिटिशांनी पॅलेस्टाइनमधील अरबांच्या बंडखोरीला आळा घालण्याकरिता कॅप्टन ऑर्ड विंगेट याच्या नेतृत्वाखाली एक स्वतंत्र गनिमी लढाऊ दल संघटित केले (१९३६). त्यात मोशे दॅयान सहभागी झाला.

फ्रान्समध्ये तेव्हा मार्शल पेताँ हा हिटलरधर्जिना माणूस सत्तेवर असल्याने ब्रिटिशांनी मोशे दायानला सीरियात हेरगिरी करण्यासाठी पाठविले.

ज्यूंना स्वातंत्र्यासाठी लढण्यास या दलाचा फार उपयोग झाला. हे शिक्षण घेऊन त्याने हगनाह चळवळ अधिक बलवान केली. परंतू ब्रिटिशांनी ती चळवळ बेकायदेशीर ठरविली व १९४० मध्ये दयानला अटक करण्यात आली. परंतु दुसऱ्या महायुद्धाच्या काळात म्हणजेच १९४१ साली त्याची सुटका झाली.

सुटका झाल्यानंतर तो पून्हा ब्रिटिश सैन्यदलात भरती झाला, नाझीं विरुद्ध लढण्यासाठी.

त्याचं झालं असं कि,

१९४१ च्या ब्रिटिश-फ्रेंच युद्धात मोशे दायान दुर्बिणीतून फ्रेंचांच्या हालचालींचे निरीक्षण करीत होता, तेवढ्यात समोरून त्यांच्यावर निशाणा साधला गेला, आणि त्या गोळीबारात त्याच्या दुर्बणीचे तुकडे होऊन त्यातले काही तुकडे, त्यांच्या डाव्या डोळ्यात घुसले.

डोळ्यांना झालेला हा अपघात इतकं जबरदस्त होता कि, यात मोशे दायानना त्याचा डावा डोळा नेहमीसाठी गमवावा लागला.

पुढे ब्रिटिशांचे महादिष्टित सरकार व ज्यू यांमध्ये झगडा चालू झाला, याचमुळे १९४८ साली झालेल्या इस्रायल अरब युद्धामध्ये जेरुसलेमच्या ही वेळी तो पुन्हा हगनाहमध्ये सामील झाला. या स्वातंत्र्यलढ्यात तो आघाडीवर, लेफ्टनंट कर्नलपदी होते.

जेरूसलेमच्या युद्धाचे त्याने नेतृत्व केले होते.

इस्रायल-जॉर्डन युद्धबंदी दायान यांचा महत्त्वाचा सहभाग होता. या युद्धानंतर तो रोड्झच्या युद्धबंदी परिषदेस इझ्राएलचा प्रतिनिधी म्हणून हजर राहिला. पुढे जाऊन १९५३ ते १९५८ या काळात ते स्वतंत्र इस्रायली लष्कराचे सरसेनापती होते.

या काळातल्या इजिप्त-इस्रायल संघर्षांमध्ये, १९५६ साली त्यांनी अभूतपूर्व पद्धतीने सिनाई हा इजिप्तचा प्रदेश घेतल्यामुळे एक अद्वितीय सेनानी म्हणून जगभरात त्यांची ख्याती झाली. १९५६ च्या सिनाईच्या लढाईत त्याने ईजिप्तचा पराभव केला आणि पुढे १९५८ मध्ये तो लष्करातून निवृत्त झाले.

निवृत्तीनंतरचा प्लॅन म्हणुन, त्याच्या जुन्या मित्राच्या–बेन-गूरिऑनच्या सल्ल्यानुसार त्याने राजकारणात प्रवेश केला. युद्धभूमी प्रमाणेच त्याने राजकीय भूमी देखील गाजवली, तेही अभ्यासपूर्ण तयारीनुसारच, म्हणजेच त्याने राजकारणात उतरण्याअगोदर त्याने हिब्रू विद्यापीठात दोन वर्षे राज्यशास्त्राचा अभ्यास केला आणि मगच निवडणुकीत उतरला.

१९५९ साली मोशे दायान मापाई या बेन-गूरिऑनच्या पक्षातर्फे, इस्रायली लोकसभेवर निवडून आल्यावर बेन-गूरिऑनने त्याला कृषिमंत्री केले.

१९५९ ते १९६४ कृषीमंत्री म्हणुन कार्यकाळ पूर्ण केला. परंतु १९६३ मध्ये बेन-गूरिऑनचे पक्षाशी मतभेद झाले व त्याचे पंतप्रधानपद गेले. तेव्हा दायाननेही राजीनामा दिला व तो बेन-गूरिऑनच्या रफी नावाच्या नवीन पक्षात सामील झाला व १९६५ मध्ये निवडूनही आला. पण बहुमत विरोधी पक्षास असल्यामुळे त्यास कोणतेही मंत्रिपद मिळाले नाही.

मात्र १९६७ मध्ये जनमानसाच्या दबावामुळे त्यास मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री म्हणून स्थान मिळाले.

त्याच वर्षी अरब-इस्रायल युद्ध सहा दिवस चालले. या युद्धातही त्यांच्या मार्गदर्शनाखाली इस्रायलने मोठा विजय संपादन केला. अरबांबरोबरच्या युद्धात त्याने ईजिप्त, जॉर्डन आणि सिरिया यांचा पराभव केला. या सहा दिवसांच्या युद्धातील विजयामुळे त्याची लोकप्रियता वाढली. काहींनी त्यास ‘गार्बो ऑफ इस्त्रायल’ अशी उपाधीही दिली.

यानंतर त्याने संरक्षणमंत्री म्हणून काही वर्षे काम केले. पुढे १९७४ मध्ये संरक्षणमंत्री असताना १९७३ च्या युद्धात इझ्राएलची युद्ध तयारी नव्हती, असा आरोपही त्यांच्यावर लादण्यात आला. १९७५ पासून तो संसदेचा सभासद होता, १९७९ पर्यंत ते इस्रायलचे परराष्ट्र व्यवहारमंत्री म्हणुन कार्यरत होते.

दयानने काही पुस्तकेही लिहिली होती. त्यांपैकी इझ्राएल्स बॉर्डर अँड सिक्युरिटी प्रॉब्लेम्स (१९५५) आणि युद्धविषयक अनुभव व आठवणींवर आधारित ‘अ डायरी ऑफ सिनाई कँपेन’ १९६६, ही खूप प्रसिद्ध आहे. यांशिवाय ‘अ न्यू मॅप, न्यू रिलेशनशिप्स (१९६९) त्याचे हे आत्मचरित्र फार लोकप्रिय झाले होते.

त्याला पुरातत्त्वविद्या विषयाचा छंद असून तो उत्खननाच्या कामात अनेक वेळा सहभागी झाला होता. इस्त्रायल लष्करीदृष्ट्या एक बलशाली राष्ट्र मानले जाते, तर त्याचे सर्वं सर्व श्रेय त्याला दिले जाते.

तेल आवीव्ह येथे १९८१ मध्ये त्यांचे निधन झाले. या जांबाज खिलाडी शेवटी कॅन्सरच्या युद्धात मात्र हरला !

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.