या पाटलांच्या वेटिंग रुममध्ये जे.आर.डी. टाटा देखील वाट पहात बसायचे

मुंबईचा नेकलेस पाईन्ट अर्थात मरीन ड्राईव्ह. मुंबईचे महापौर असताना एका वर्षात याला आधुनिक रुप देण्याचं काम त्यांनी केलं. ते मुंबई काॅग्रेसचे सम्राट म्हणवले जात.

जेष्ठ पत्रकार मधुकर भावे सांगतात या पाटलांच्या वेटिंग रुममध्ये मी स्वत: जे.आर.डी टाटांना वाट पहाताना पाहिलं आहे.

ते पाटील म्हणजे स. का. पाटील.

स.का. पाटील आपणाला माहित असतात ते म्हणजे,

जोपर्यन्त चंद्र सुर्य आहेत तोपर्यन्त मुंबई महाराष्ट्राला मिळून देणार नाही या त्यांच्या गर्जनेसाठी. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील सर्वात मोठ्ठा व्हिलन हाच त्यांचा इतिहास आपणाला माहित आहे.

पण आपण कधी हा विचार करत नाही की मुंबई महाराष्ट्राला मिळून देणार नाही अशी जाहीर घोषणा करणारा नेता किती मोठ्ठा असू शकतो.

सका पाटील हे मुळचे सिंधुदूर्ग जिल्ह्यातल्या कुडाळचे. एका शेतकरी कुटूंबात जन्मलेले ते पत्रकार झाले. त्यांचे वडिल पोलीस खात्यात अधिकारी होते. सका पाटील वकिलीचं शिक्षण घेवून मुंबईत आले.

काही काळ वकिलीचे प्रॅक्टिस केल्यानंतर त्यांनी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला. मालवणमध्ये  राष्ट्रीय शाळा सुरू करून ते शिक्षक म्हणून काम देखील केलं. 

सका पाटील मुंबई काँग्रेसचे अनभिषिक्त सम्राट होण्यास सुरवात झाली ती बाॅम्बे मिल मजदूर युनियनची स्थापना झाल्यानंतर. पुढे हीच यूनियन राष्ट्रीय मिल मजदूर संघामध्ये विलीन झाली.

कामगार संघटनेचे नेतृत्त्व करणारे सका पाटील मुळात उजव्या विचारसरणीचे नेते होते. पुढे जेव्हा काॅग्रेसमधील डाव्यांचे विचारसरणीवर मात करण्याची वेळ आली तेव्हा सका पाटील यांना पुढे करूनच काँग्रेस नेतृत्त्वाने शह देण्याचं काम केल.

अस सांगतात की,

आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्रातील राजकारणात सिंडिकेटच्या माध्यमातून इंदिरा गांधींच्या डावीकडे झुकणाऱ्या भूमिकांना देखील सका पाटलांच्या माध्यमातून शह देण्यात आला.

सका पाटील हे मुंबई काॅग्रेसचे काम करू लागल्यानंतर ते मुंबईचे पहिल्या फळीतील नेते म्हणून गणले जावू लागले. काही काळातच मुंबई काँग्रेस म्हणजे सका पाटील आणि सका पाटील म्हणजे मुंबई काँग्रेस हे समीकरण तयार झाले.

शिवसेनेला पुढे आणण्यात देखील सका पाटील यांच राजकारण महत्वाच ठरलं.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात व्हिलन म्हणून छाप पडल्यानंतरच्या काळात देखील सका पाटीलांचा मुंबईचा डाॅन म्हणूनच दरारा होता. राजकिय विश्लेषक सांगतात की,

नेहरूंच्या मंत्रीमंडळातील व्ही.के. कृष्ण मेनन हे मुंबईतून खासदारकीची निवडणूक लढवत होते. त्याचवेळी दाक्षिणात्य राजकारणाचा विरोध करण्याचा डावपेच सका पाटलांनी आखला व या विरोधातूनच शिवसेनेस पुढे आणण्यात आले.

मुंबईचे महापौर, मुंबई काॅग्रेसचे सम्राट, महाराष्ट्र काॅग्रेसचे अध्यक्ष, खासदार, केंद्रीय मंत्री अशा विविध भूमिकेतून त्यांनी काम केले.

त्यांनीच शेतकऱ्यांच्या शेतात काँग्रेस नेली.

शेतकऱ्यांच्या शेतात काँग्रेस गवत अर्थात गाजर गवत घेवून जाण्याचं श्रेय देखील सका पाटलांना देण्यात येतं. सका पाटील यांच राजकारण अमेरिकाधार्जिणी होते.

पंतप्रधान नेहरूंनी अलिप्तवादी धोरणं स्वीकारले असले तरी ते सोव्हिएत रशियाकडे झुकल्याचं सांगण्यात येत. अशा वेळी थेट अमेरिकाधार्जिणी भूमिका घेवून पंडित नेहरूंना देखील शह देण्याचं काम सका पाटलांनी केलं.

सका पाटील केंद्रीय मंत्रीमंडळात अन्न व कृषीमंत्री होते.

ॲागस्ट १९६० च्या दरम्यान देशभरात अन्नधान्याचा मोठ्ठा तुटवडा पडला होतो. त्यावेळेस सका पाटलांच्या पुढाकारातून १.३ अब्ज अमेरिकन डाॅलर किंमतीचा १.६ कोटी टन गहू व दहा लाख टन तांदूळ आयात करण्यात आला.

या कराराचे नाव पी.एल.८४ होते. या गव्हाच्या मार्फतच गाजर गवताचे बी शेतात आले व संपूर्ण भारतात पसरल्याचं सांगण्यात येतं.

अशा या माणसाला निवडणूकीत पराभूत करण्याचं काम केलं ते जाॅर्ज फर्नांडिस यांनी. हा किस्सा आपण पुढील लिंकवर क्लिक करून वाचू शकता.

सका पाटील मातब्बर नेते होते. मात्र अमेरिकाधार्जिणी भूमिका, मुंबईतील मुठभर उद्योगपतींचे नेतृत्व करण्यावर त्यांचा भर राहिला. अस सांगतात की रशियन गुप्तचर खात्यातील कर्मचाऱ्याने त्यांनी भारतीय गुप्त दस्तावेज अमेरिकेला सोपवल्याचा आरोप केला होता.

महाराष्ट्र द्वेषी भूमीका घेण्यापासून ते भारताविरोधातील माहिती अमेरिकेला देण्यापर्यन्तचे अनेक आरोप त्यांच्यावर होत असतात. मात्र ते निर्विवाद कधीकाळी मुंबई आपल्या हातात ठेवणारे नेते होते हे देखील तितकंच खरं आहे.

हे ही वाचा भिडू. 

2 Comments
  1. Rahul Muli says

    आचार्य अत्रे हरणांचा उल्लेख नासका पाटील असा करायचे‌

  2. Rahul Muli says

    हरणांचा नाही ह्यांचा

Leave A Reply

Your email address will not be published.