स्टार्टअपला पाण्यात पहाणाऱ्यांनो, मायलॅब या पुण्याच्या कंपनीचा इतिहास एकदा वाचा.
काय करतो MBA, काय करतो इंजिनिरिंग, काय करतो BCA/BBA, काय करतो MPSC, UPSC आणि त्यानंतर आली पिचर सिरीज. २०१८ पासून सुरू झाला तो स्टार्टअप चा काळ. चार मित्र एकत्र येतात आणि कंपनी उभा करतात.
त्यानंतरच्या काळात प्रश्न विचारला जावू लागला काय करतो तेव्हा उत्तर मिळतं, स्टार्टअप आहे.
सर्वसामान्य उत्तरांमुळे स्टार्टअप म्हणलं की वर्षाभरात बुडणारं प्रकरण म्हणून लोक पाहू लागले. एक किस्सा असाही ऐकण्यात येतो की किर्लोस्कर कंपनी सुरू झाली तेव्हा त्यांच्या मालकांच लग्न ठरत नव्हतं. का तर म्हणे मुलाचा स्वत:चा व्यवसाय आहे. काय सांगा उद्या मुलगा बुडला तर. पण त्याच कंपनीत काम करणाऱ्यांची मात्र चांगला हुंडा देवून लग्न व्हायची. कारण तो मुलगा नोकरीला असायचा. आजही स्वत:च काहीतरी करतो म्हणल्यानंतर तोंड मुरगळणाऱ्यांची संख्या अफाट आहे.
आत्ता समजाची तोंड बंद करणं महात्मा फुलेंपासून शाहू महाराजांना अवघड गेलं तर स्टार्टअप सुरू करणारे काय चिझ आहेत. पण असाच एखादा स्टार्टअप जेव्हा विस्तारतो आणि मागून येणाऱ्यांसाठी आदर्श होतो तेव्हा त्यांच्या सक्सेसची गोष्ट सांगण मस्ट असतं.
ही गोष्ट सध्या दोन चार दिवासांनी पेपरमध्ये नाव येणाऱ्या मायलॅब या पुण्याच्या स्टार्टअपची.
माय लॅब ही दोस्तांनी मिळून सुरू केलेली कंपनी. काल या कंपनीने भारतातले पहिले स्वदेशी स्वयंचलित निदान यंत्राचे अनावरण केले. यामुळे एक व्यक्ती दिवसाला ४०० टेस्ट करू शकणार आहे. कोरोनाचं निदान करणं यामुळे सोप्प झालं आहेच पण टॅक्नोलॉजी आणि रिसर्च च्या क्षेत्रात भारताने टाकलेलं एक पाऊल म्हणून देखील या गोष्टीकडे आपण पहायला हवय. कॉम्पॅक्ट एक्स एल अस या यंत्राच नाव आहे. ७०० स्वेअर फुट इतक्या कमी जागेत एकावेळी ३२ चाचण्या घेणं यामुळे शक्य आहे.
या कंपनीची सुरवात केली ती शैलेंद्र कवाडे व हसमुख रावळ या मित्रांनी.
शैलेंद्र कवाडे बायोटेक्नॉलॉजी या विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर ते लॅब इंडिया या कंपनीत नोकरी करत होते. इथेच त्यांचा सहकारी हसमुख रावळ हा मित्र भेटला. आपल नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू करू अस मत शैलेंद्र कवाडे यांनी मांडल. हसमुख रावळ यांचा त्याला पाठिंबा होता. दोघांनी मिळून व्यवसाय करूया हे पक्क झालं. प्रतिमा कवाडे या फॉरेंसिक लॅबमध्ये कार्यरत होत्या मात्र मॉलिक्युलर बॉयोलॉजित काम करण्याच स्वप्न पुर्ण करण्यासाठी त्या देखील आपली नोकरी सोडून मायलॅबमध्ये दाखल झाला.
२०१४ साली मायलॅब ही कंपनी स्थापन करण्यात आली.
फक्त ट्रेडिंग म्हणून कंपनी सुरवातीला काम करू लागली. त्यानंतर राहूल आणि देबार्षी हे दोन मित्र आले आणि २०१५ पासून रिसर्च डेव्हलपमेंट विभाग सुरू करुन रिएजेंट्स, टेस्टिंग किट्स सुरू करण्यात आले. सुरवातीला ते किट्स बनवायचे. HIV, HBV, HCV अशा प्रकारच्या व्हायरस स्क्रिनिंग करणाऱ्या किटचे ते उत्पागन करतात. सोबतच H1N1, स्वाईन फ्ल्यू, टिबी, कॅन्सर अशा किटचे देखील ते उत्पादन करतात. अशा क्षेत्रात प्रामुख्याने परदेशी कंपन्याचे वर्चस्व आजही कायम आहे. त्यावेळी २०१९ मध्ये त्यांना FDA ची मान्यता मिळाली. त्यामुळेच NAT किट्स चे उत्पादन घेणारी ती एकमेव भारतीय कंपनी म्हणून समोर आली.
कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर सहा आठवड्यात माय लॅबने कोरोना टेस्ट किट यशस्वीपणे तयार केले. आज मायलॅबमधून दिवसाला दोन लाख वेगवेगळे किट्स तयार केले जात आहे. वेगवेगळ्या ठिकाणी अचूक निदान कमी वेळेत होईल यासाठी ते सध्या काम करत आहेत.
प्रतिमा कवाडे, शैलंद्र कवाडे, हसमुख रावळ यांच्यासह पन्नास ते साठ व्यक्तिंचा स्टाफ हा आज स्वदेशीचा झेंडा उंचावत आहे. त्यामुळे भिडूंनो स्टार्टअप असो की MPSC, नाहीतर BCA असो कि MBA नॅट लावून धरलं की सरळं होत असतय.
संदर्भ : बेटर इंडिया/साप्ताहिक सकाळ
हे ही वाच भिडू
- भारतातली पहिली फेअरनेस क्रीम ज्याची जाहिरात खुद्द महात्मा गांधींनी केली होती.
- हाच तो शेतकऱ्याचा पोरगा ज्याच्या भारत बायोटेकने कोरोनावर लस तयार केली
- या बाईमुळे पोलिओ, स्वाईन फ्लू ते कोरोनाची लस शोधणं सोप्प जातं