४० पैसे प्रती एकराने मुंबईत जमीन घेणाऱ्या हिरानंदानी यांच्याकडे किती रुपये आहेत..?

खरं सांगू आत्ता माझ्या खिश्यात पन्नास रुपये आहेत. तरिही मी हिरानंदानी या माणसाकडे किती पैसा आहे सांगू शकतो. माणसाला असा कॉन्फिडन्स असला पाहीजे. आज सकाळीच bolbhidu1@gmail.com या आमच्या हक्काच्या मेल आयडीवर पुरषोत्तम पाटील या मुलाने प्रश्न विचारला. प्रश्न असा होता की,

हिरानंदानी टाऊनशीपमध्ये राहणारी माणसं एवढी श्रीमंत आहेत तर हिरानंदानी किती श्रीमंत असेल? 

आपल्याला श्रीमंत माणसांचे प्रश्न पडतात. पैसा कसा कमवला, अगोदर काय करायचं. त्यानं केलय तर आपल्याला पण जमलं असा साधा नियम असतो. असो कुणालाही फिलॉसॉफिकल ग्यान देणं आपण काम नाही तर खरी माहीती सांगण हे आपलं काम आहे. नमनाला घडाभर तेल ओतून झालं असल्यानं मुळ मुद्याला हात घालूया.

त्यापुर्वी हिरानंदानी नावाची भानगड काय आहे…? 

हिरानंदानी ही मुंबईच्या पोवई/पवई भागातली टाऊनशीप आहे. आत्ता या टाऊनशीपचं तोंड फाडून कौतुक करण्यापेक्षा सरळ सरळ फोटो दाखवतो.

Screenshot 2020 02 29 at 3.39.34 PM
https://www.hiranandani.com/gallery-thane.aspx

तर अशा प्रकारच्या बिल्डिंग मुंबईत आहेत. हिरानंदानी हे मोठ्ठे बिल्डर आहेत. फोर्ब्ज च्या यादीनुसार त्यांच्याकडे 1.3 बिलीयन रुपये आहेत. थोडक्यात हजारों कोटींची संपत्ती या माणसाकडे आहे. आत्ता हा माणूस इतका श्रीमंत कसा झाला या आपल्या मुळ मुद्याकडे येवूया.

काळ भारताला स्वातंत्र मिळण्यापुर्वीचा. 

सिंध प्रांतातले सिंघी कुटूंब मुंबईला स्थायिक झालं. ते साल होतं १९३७ चं. सर्वात पहिला येणाऱ्या काळाचा त्यांना अंदाज आला. २० वर्षाचे असणारे लघुमल हिरानंद हिरानंदानी तेव्हा आपल्या कुटूंबासोबत मुंबईत आले. इथे ते ़डॉक्टर झाले. मुंबईच्या प्रसिद्ध एम्स हॉस्पीटलमध्ये त्यांनी इंटरनशीप केली. लंडनला जावून शिकले, डॉक्टरकीत चांगल बस्तान बसवलं.

पुढे त्यांना तीन पोरं झाली. एकाच नाव निरंजन हिरानंदानी, दूसऱ्यांच नाव सुरेंद्र हिरानंदानी आणि तिसऱ्यांच नाव नविन हिरानंदानी. नवीन हिरानंदानी आपल्या वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकून डॉक्टर झाला. 

आत्ता हे लघुमल हिरानंद हिरानंदानी कसे डॉक्टर होते तर अगदी टॉप क्लास. भारतात Otorhinolaryngology क्षेत्रातला सर्वात टॉम क्रुझ डॉक्टर म्हणून त्यांचा उल्लेख केला जायचा. डॉ. एल.एच. हिरानंदानी समाजसेवक देखील होते. म्हणूनच त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले.

अशा माणसाच्या पोटी जन्मलेले ही तीन लेकरं. 

पैकी निरंजन हिरानंदानी मुंबईच्या कंम्पेन शाळेतून शिकले. मुंबईच्याच सिडनेहॅम कॉलेजातून कॉमर्समधून पास झाले. इथं काय झालं तर त्यांचे वडिल मोठ्ठे डॉक्टर होते. त्यांच्या वडिलांनी आपले मित्र नाना पालखीवाला यांच्याकडे पोराला नेलं. नाना पालखीवाला म्हणले पोराला CA करुदे. पोरगा CA झाला. पुढे सीसी चोक्सी एण्ड कंपनीमध्ये ते शिकवू लागले. 

दोन वर्ष शिकवल्यानंतर आपला भाऊ सुरेंद्र ुपालखीवाला यांच्या माध्यमातून कांदिवली येथे टेक्स्टाईल सुरू केली. ग्वॉलियर रेऑनसाठी कपडे बनवण्यात येवू लागले. या धंद्यात सेट होणार त्याच काळात गिरणी कामगारांचे संप होवू लागले. काम न जमल्याने त्यांनी या धंद्यातून शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला.

याच काळात त्यांच्या हिरानंदानी कुटूंबाने वर्सोवात एक लाख स्केअर फूटांची जागा घेतलेली. हिरानंदानी बिल्डर झाले. त्यांनी इथे पहिला प्रोजेक्ट उभारला. जेव्हा लोखंडवाला १३०० रुपये स्वेअरफुटाने फ्लॅट विकत होते तेव्हा या माणसाने ८०० रुपयेचा रेट काढला आणि पैसा कमावला.

याच काळात प्रसिद्ध स्किम झाली.

स्कीम होती ४० पैसे एकर प्रती महिना या दराने २५० एकर जागा डेव्हलप करायची. हा करार हिरानंदानी गार्डन्स आणि MMRDA व महाराष्ट्र शासन असा त्रिपक्षीय करार होता. सुरवातीच्या काळात हा भाग पुर्ण डोंगराळ होता. इथं पावसाळ्यात साठलेलं पाणी उन्हाळा झाला तरी आटायचं नाही. रोगराई असणारा घाण भाग म्हणून परिसर ओळखला जायचा.

याच अडीचशे एकरांवर हिरानंदानी यांनी मध्यमवर्गीय लोकांना परवणारी घरे बांधण्याच ॲग्रीमेंट करण्यात आलं. निम्या भागात सरकारच्या नियमांनुसार ४३० आणि ६६१ स्वेअर फुटांची घरं बांधायची ठरलं. त्यानूसार १९८५ साली बांधकामास सुरवात करण्यात आली. १ लाख झाडं लावून लोक इथे घरे घेतील याची तरतूद करण्यात आली. १९९० साली पहिली फेज ओपन करण्यात आली. त्यामध्ये ५०० स्केअर फूटाने फ्लॅट विकले गेले.

आत्ता दूसरा टप्पा हा पुर्णपणे हिरानंदानी यांच्या मालकीचा राहिलेला. आत्ता त्यांनी आपलं खास शस्त्र अर्थात भविष्यवेधी बाणास्त्र बाहेर काढलं. इथे त्यांनी युरोपीयन थीम वापरली. निओक्लासिकल थिम वापरून पडवणाऱ्या घरांचा अजेंडा अपअर्बन मार्केटवर गेला. श्रीमंत लोकांसाठी खास घरं म्हणून सोसायटी बांधण्यात आली. सर्व काही नियमाप्रमाणे झाल्याने काहीच प्रॉब्लेम नव्हता व तिथून हिरानंदानी श्रीमंत झाले ते कायमचे.

त्यानंतर हिरानंदानी बिल्डर म्हणजे मास्टरमाईंट समजले गेले. त्यांचा भाऊ सुरेंद्र हिरानंदानी आणि निरंजन हिरानंदानी मिळून कारभार हाकू लागले. निरंजन हिरानंदानी हे हिरानंदन गार्डन्सचे सर्वसर्वा होते. हिरानंदानी यांनी पुन्हा दोन टाऊनशिप मिळवून एक हजार कोटी मिळवले तेव्हा ते चर्चेत आले. 

Screenshot 2020 02 29 at 3.25.41 PM
image :https://luxuryatchennai.wordpress.com/2014/03/05/hiranandani-bankruptcy-all-you-really-need-to-know/

निरंजन हिराचंदानी यांना दोन मुले आहेत. प्रिया आणि प्रदिप. पैकी मुलगी प्रिया हिचं लग्न लंडनचे उद्योगपती सायरस वाद्रेवाला यांच्यासोबत झालं. २००६ ला बाप भाऊ एकीकडं आणि पोरगी एकीकडं असा प्रकार झाला. हा राडा पण पैशावरूनच झाला. एका प्रोजेक्टमध्ये प्रिया वाद्रेवाला पार्टनर होती. पण त्यानंतर बाप आणि पोराने न सांगता डिल केल्याचा आरोप होता. त्यावरून पोरीने त्यांना थेट लंडनच्या कोर्टात खेचल. बाप आणि पोराने मिळून मुंबईच्या कोर्टात अपील केलं. शेवटी हे प्रकरण प्रियाला ३६० कोटी देवून मिटवायचं अस ठरलं. ते पण २०१९ मध्ये.

आत्ता निरंजन हिरानंदानी हे हिरानंदानी ग्रुपचे सर्वेसर्वा आहेत आणि सुरेंद्र हिरानंदानी बिल्डींग क्षेत्रातल्याच इतर गोष्टीवर मालकी हक्क ठेवून आहेत. अंबानींच्या रिलायन्ससारखीच ही वाटणी आहे. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.