पोलीसांचे धाड न पडणारे ‘ओयो कपल्स लॉज’ ही काय भानगड असते. 

मुख्यमंत्री कुणाचा याचा निकाल लागेना. भाजपवाल्यांचा बीपी (मेडीकल क्षेत्रातला शब्द) वाढतोय. इकडे संजय राऊत आपली स्टेनगन घेवून रोज सकाळी १० वाजताच धनुष्यबाण ताणायला सुरवात करतायत. शेतकऱ्यांना पडणाऱ्या पावसाचं टेन्शन आलय. कांदा १०० ला टेकलाय. ट्रॅम्पने बगदादीला दहाव्यांदा मारलय. इतकं सगळ टाईमपास करायला मटेरियल असताना आमच्या एका भिडूला प्रश्न पडलाय,

सेफ प्रकारे लॉजवर कस जायचं. 

अनेक उपाय करुन त्यांने बोलभिडूला मॅसेज टाकला. त्याने विचारलं प्रेयसीला घेवून लॉजवर जायचं आहे. किती नाही म्हणलं तरी पोलीसांची भिती आहेच. ते ओयोची कपल फ्रेंडली म्हणून काहीतरी भानगड आहे. 

ते काय आहे आणि सुरक्षित आहे का ते सविस्तर सांगता का? 

झालं आम्हाला पण राजकारणातून विश्रांती पाहीजे होती. म्हणून ही सगळी भानगड शोधायला स्वत: कामाला लागलो

आत्ता जोडपी लॉजवर जातात हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी नाहीतर जिल्ह्यातल्या एखाद्या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी असे लॉज असतात. जिथे फक्त अविवाहित जोडपी जातात तिथले चार्जेस देखील प्रतीतास असल्याचं सांगण्यात येतं. बाकी अशा ठिकाणाचा मुख्य प्रॉब्लेम असतो तो म्हणजे पोलीस.

मोरल पोलिसींगच्या नावाखाली अशा धाडी टाकल्या जातात.

यात दोघेही कायदेशीरदृष्ट्या सज्ञान असतील तर पोलीसांना कारवाई करता येत नाही. पण ते पोलीस असतात. शांत बसणं त्यांच्या अंगात नसतं. ते काय करतात तर दोघांच्या घरातल्यांना फोन लावायला लावतात आणि घरातल्यांना बोलावून घेतात. मग पुढं काय होतं ते सांगायची गरज तुम्हाला नाही. हे झालं पोलीसांच अशा ठिकाणी जाण्याचा दूसरा तोटा असतो तो म्हणजे लुटालुट. व्हिडीओचित्रफित काढणं, ब्लेकमेलिंग.  अशा वेळी एखादा व्यक्ती जोडप्याला गाठतो. पोलीस असल्याचं भासवून देखील लुटलं जातं. 

त्यावर सर्वात सेफ पर्याय म्हणून ओयो कपल फ्रेन्डली हॉटेल्सचा पर्याय पुढे आला. 

ओयो हि हॉटेल्सची चेन आहे. आमच्या देवदर्शनासाठी घरातल्यांसोबत गेल्यानंतर मार्केट कळलं आणि २५ व्या वर्षी हजारो कोटींचा मालक झाला. या आर्टिकलवर जावून तुम्ही ओयोची संपुर्ण गोष्ट वाचू शकता. इथे त्यांच्या कपल फ्रेन्डली हॉटेल्सबद्दल सांगण मुख्य उद्देश आहे. तर ओयोच अॅप्लिकेशन असतं, ज्यावरून तुम्ही हॉटेल्स बुक करु शकता.  एका मोठ्या ब्रॅण्डशी संलग्न असल्याने अशा हॉटेलमध्ये जास्तीत जास्त सुऱक्षित वातावरण असतं. काही चुकीचं वाटलच तर तुम्हाला तक्रार करण्यास जागा असते.

पण सर्वात महत्वाचं म्हणजे इथे कपल फ्रेन्डली नावाचा ऑप्शन असतो. तो पर्याय तुम्ही सिलेक्ट केला तर अविवाहित लोक राहण्यास परवानगी असणारे हॉटेल्स इथे सजेस्ट होतात. इथे तुमची ओळखपत्र दाखवून, सज्ञान असल्याचा दाखला देवून रुम बुक करु शकता. इथे कोणीही तुम्हाला त्रास देण्याची शक्यता कमी असते, कारण हे मोठ्या ब्रॅण्डशी संलग्न असते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.