सांगली जिल्ह्यास “द्राक्षभूमी” बनवणारा अधिकारी काळाच्या पडद्याआड गेला..

द्राक्ष म्हणंटल की देशात फक्त सांगली आणि नाशिकचचं नाव येतं. दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना आज आर्थिकदृट्या प्रगत बनवलं ते याच नगदी पिकांन,

पण याच द्राक्षे पिकावर संशोधन करून कमी पाण्यात जास्त उत्पादन येणारं हे पिक आपल्या देशात आणण्यासाठी व त्यावर संशोधन करण्यासाठी झटलेल्या जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकारी असणाऱ्या प्र.श.ठाकूर यांनी रविवारी पुणे येथे वयाच्या ९९ व्या वर्षी अंतिम श्वास घेतला. रोजगार हमी योजनेच्या सुरूवातीला वि.स.पागे यांच्यासोबत सचिव म्हणून काम पहिले होते.

प्र.शं.ठाकूर यांचा जन्म मध्य प्रदेशातील जबलपूर शहरात २४ मे १९२१ रोजी झाला होता. त्यांनी १९४१ रोजी शेती महाविद्यालयातून कृषि पदवी घेतली, याचकाळात देशात दिवंगत प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी त्यांचे जिव्हाळयाचे संबध निर्माण झाले. त्यांनी एकत्र कामही केले.

वसंतदादांनी हा हिरा सांगलीत आणला. 

दरम्यानच्या काळात वसंतदादा पाटील यांच्याशी त्यांचा संपर्क आला, आणि हा हिरा वसंतदादांनी उचलला, सांगली जिल्हा परिषदेत १९६३ साली कृषी विकास अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि सांगली हिच त्यांची कर्मभूमी बनली. १९६७ साली शासनाने त्यांना अमेरिका सारख्या प्रगत देशात पाठवले व तेथील शेतीचा शास्त्रशुध्द अभ्या करून भारतातील विशेषत: महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी जगप्रसिध्द द्राक्षशास्त्रज्ञ विंकलर यांनी लिहिलेल्या जनरल व्हिटीकल्चर हे पुस्तर सर्वप्रथम भारतात आणून द्राक्षे क्रांतीची सुरूवात केली.

रोजगार हमी योजनेचे प्रथम प्रकल्पाधिकारी.

सांगली जिल्ह्याचे सुपुत्र वि.स.पागे यांनी १९६७-६८ साली देशात प्रथमच तासगाव तालुक्यातील विसापूर येथे रोजगार हमी योजनेची सुरूवात केली. या योजनेचे १९६७ ते १९७० पर्यंत ठाकूर यांनी प्रकल्पाचे प्रथम प्रकल्पाधिकारी म्हणून यशस्वीपणे काम पाहिले होते. त्यानंतर केंद्र शासनानेही योजना स्विकारली, त्यामध्येही त्यांनी महत्वाचे योगदान दिले होते.

तासगाव, कवठेमहांकाळ, मिरजेसह संपुर्ण भागास द्राक्षभूमी म्हणून ओळख मिळवून दिली. 

वसंतदादा पाटील यांनी ठाकूर यांना शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर प्रतिनियुक्तीवर घेऊन सांगली जिल्ह्यात द्राक्षपीकांची वाढ करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध करून दिली, यामध्ये सहकार महर्षी गुलाबराव पाटील यांनीही जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या माध्यमातून सहकार्य केले. या मिळालेल्या संधीचे सोने करीत ठाकूर यांनी अवघ्या सांगलीची ओळख द्राक्षभूमी सांगली करून टाकली. साधारण ४५ ते ५० वर्षापूवी सुमारे ४०० ते ५०० एरांवर भोकरी व फाकडी सारख्या द्राक्षे वाणांची लागवड केली जात होती.

वसंतराव आर्वे, आबासाहेब म्हेत्रे, श्रीपाद दाभोळकर, ॲड.भगवानराव पवार यांच्या सोबतीने ठाकूर यांनी सततच्या संशोधन आणि प्रयोग करून नवीन वाण, संजिवकांचा वापर करीत आजची द्राक्षे प्रगती झालेली आपल्याला पहायला मिळते आहे.

सन १९६९ मध्ये दलित, दिन दुबळे शेतरी आर्थिकदृट्या मागास राहिल्यामुळे त्यांची प्रगती थांबल्याचे लक्षात आल्यावर ठाकूर यांनी वसंतदादा पाटील आणि मधूकर देवल यांच्या सहकार्याने मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे श्री.विठ्ठल सहकारी संयुक्त शेती सोसायटीची स्थापना करून हरिजनांच्या जमिनीवर द्राक्षपिकांची लागवड करून त्यांना उत्कर्षाचा मार्ग दाखविला.

सांगलीत अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 

महाराष्ट्र शासनाने त्यांना १९८९ मध्ये शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन ‘ कृषिभूषण’ पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. याबरोबरच त्यांना अनेक पुरस्करांनी सन्मानीत करण्यात आले. १९९५ मध्ये सांगलीतील तरूण भारत स्टेडीयमवर त्यांच्या अमृतमोहोत्सवी सोहळयाला त्यांचे मित्र अटलबिहारी वाजपेयी यांच्याहस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला होता. तर सन २०१० मध्ये गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले होते.

सरकारी नोकरीत केवळ महिन्याचा पगार घेऊन दिवस भरणाऱ्यांच्या यादीत न जाता, मागसलेला शेतकरी समृध्द होण्यासाठी समर्पित भावनेने सेवा केलेल्या या शेती संशोधकाला भावपूर्ण आदरांजली..!

पत्रकार प्रविण शिंदे (सांगली : 9637252700) 

हे ही वाच भिडू

सांगलीच्या राजानं ठरवलं, कृष्णेच्या महापुराला तोंड देईल असा महाप्रचंड पूल उभारायचा.
सांगलीच्या पूरात औरंगजेबाचा पाय मोडला होता.
म्हणून चितळेकडं काम करणाऱ्या पोराला लग्नासाठी पोरगी मिळते. 

Leave A Reply

Your email address will not be published.