पुण्याच्या खुन्या मुरलीधराची मुर्ती वाचवण्यासाठी २०० मुस्लीम अरब सैनिक लढले होते. 

देशात ज्ञानवापी आणि पुण्यात पुण्येश्वर, नारायणेश्वर मंदीराची चर्चा चालू आहे. वास्तविक आज छोटा शेख व बडा शेख असे दर्गे असणाऱ्या ठिकाणी पुण्येश्वर व नारायणेश्वरांचे मंदीर होते असा दावा मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी केल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आल आहे. 

आत्ता या ठिकाणी देखील न्यायालयात जावून उत्खनन करण्याचा कार्यक्रम करण्यात येईल की फक्त बातम्यांच्या TRP पुरता विषय मर्यादित राहिल हे काळच सांगेल.. 

पण आम्ही सांगतोय ती पुण्याच्या मंदिराची एक वेगळी गोष्ट. इथे मुरलीधराची मुर्ती वाचवण्यासाठी इंग्रज विरुद्ध अरब असा सामना झाला होता. अन् त्यात अरब सैनिकांनी आपले रक्त सांडले होते.. 

काय आहे खुन्या मुरलीधर चा इतिहास..

सदाशिव पेठेत असणाऱ्या खून्या मुरलीधर मंदीराची स्थापना इसवी सनाच्या १७९७ साली करण्यात आली. या मंदिराची स्थापना पेशवाईचे सावकार असणाऱ्या सदाशिव रधुनाथ उर्फ दादा गद्रे यांनी केली.

अस सांगतात की दादा गद्रे यांना मुरलीधराने दृष्टांत देवून मंदिर बांधण्यास सांगितले. त्यानंतर दादा गद्रे यांनी जयपूरचा शिल्पकार बखतराम यांच्याकडे मुर्ती तयार करण्याचे काम दिले. बखतराम याने एका पायावर व दूसऱ्या पायाच्या फक्त अंगठ्यावर उभा असणारी संगमरवात सुंदर अशी मुरलीधराची मुर्ती तयार केली. 

मात्र ही मुर्ती दूसऱ्या बाजीरावाला आवडली. त्याने गद्रे यांच्याकडे मुर्तीची मागणी केली. मात्र त्र्यंबकेश्वरच्या खरे यांनी गद्रेंना मुर्तीची प्रतिष्ठापना तात्काळ करण्याचं सुचवलं.

त्रंबकेश्वरचे पंडीत नारायणभट्ट खरेंना विधीसाठी पाचारण करण्यात आलं व दूसऱ्या बाजीराव पेशव्यापासून मुर्ती वाचवण्यासाठी गद्रेंनी आपल्याकडे असणाऱ्या २०० अरब सैनिकांचे सैन्य मंदिराबाहेर उभं केलं. 

चैत्र वद्य द्वादशी शके १७१९ म्हणजेच १३ एप्रिल १७९७ रोजी भल्या पहाटे मंत्रउच्चारात मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. 

त्याचवेळी पेशव्यांनी कॅप्टन बॉयडच्या नेतृत्वाखाली ब्रिटीश तैनाती तुकडी गद्र्याच्या खून्या मुरलीधर मंदीराच्या दिशेने धाडली. मुसलमान अरब सैनिक विरुद्ध ख्रिश्चन ब्रिटीश सैनिक असे हे छोटेखानी युद्ध झाले. या युद्धात प्रचंड रक्तपात झाला व सुमारे ६० अरब सैनिक मृत्यूमुखी पडले. खून्या मुरलीधरची मुर्ती वाचवण्यासाठी या अरब सैनिकांनी आपले प्राण दिल्याचं सांगण्यात येत. 

त्यानंतर दूसऱ्या बाजीरावाने गद्रे सावकारांना अहमदनगरच्या तुरूंगात धाडले. तिथून २३ वर्षांनी गर्दे सावकार सुटले. पुढे खरे यांना त्यांनी दानपत्र दिले व स्वत: संन्यास स्विकारला. अस सांगण्यात येतं. 

दूसऱ्या इतिहासात चाफेकर बंधूशी देखील या संदर्भ दिला जातो. चाफेकर बंधूंनी या मंदिरात रॅडच्या हत्येचं नियोजन केल्याने या मंदिराला खून्या मुरलीधर असे. नाव पडल्याचा दावा देखील केला जातो. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.