वेळ गेली असं वाटत असेल तर यांच्याकडे बघा, ७८ व्या वयात त्यांनी बिझनेस हिट केलाय

बास्स झालं लय केलं. १० वी ची बोर्डाची परिक्षा दिल्यानंतर माझ्या डोक्यात आलेलं हे वाक्य होतं. पण घरचे म्हणजे अजून दोन वर्ष १२ वी झालास की चांगल कॉलेज अन् त्यानंतर निवांत राहशील बघ. मग अजून दोन वर्ष दिली. त्यानंतर बास्स म्हणलं पण झालं नाही. त्यानंतर इंजिनियरिंग केलं. आत्ता MPSC करुन सेट झालो की बास्स..

पण तिथं चार वर्ष घालवून आत्ता जर्नेलिझम करून बोलभिडूवर लेख लिहीत बसलोय. आत्ता निवांतपणा येईल हे लय दिवसानं कळून चुकलय. तरिपण अस वाटतं की अजून चार पाच वर्ष कष्ट करु. काहीतरी करु आणि नंतर खरच निवांत राहू. म्हणजे एकदम रिटायरमेंट घेवून टाकू. पण काय होतं कधीकधी एखादी गोष्ट वाचायला मिळते अन् राहूदे रिटायरमेंट म्हणून परत पहिले पाढे पच्चावन सुरू होतात..

अशीच एक गोष्ट वाचनात आली अन् तुम्हाला ती सांगावी म्हणलं..

म्हणजे काय आहे आपल्यातल्या अनेकांना रोजचा दिवस नको वाटतोय. काय करायचय पैसे कमवून अस पण वाटतं. चाळीशी झाली की रिटायरमेंट हे फिक्स असत. पण ही गोष्ट जराशी वेगळी.

या गोष्टीतल्या महिलेने चाळीशीत नोकरी सोडली पण स्वत:ची अशी वेगळी सक्सेस स्टोरी लिहली. 

राधा डागा अस त्यांच नाव. टिपिकल घरात जन्म घेतलेल्या राधा डागा एका ट्रॅव्हल कंपनीत कामाला होत्या. दिवसभर नोकरी अन् संध्याकाळी आराम हे ठरलेलं होतं. पण एकदिवस हुक्की आली. तेव्हा त्यांच वय ४० च्या घरात पोहचलेलं.

त्यांनी थेट नोकरीचा राजीनामा देवून टाकला. पण पुढे करायचं काय. इतकच माहिती होतं की स्वत:च काहीतरी करायचं पण काय करायचं ते कळत नव्हतं. ते साल होतं १९८७. या काळात भारतात लायसन्स राज होतं. एखादा नवीन धंदा किंवा स्टार्टअप सुरू करायचा हे आजच्या इतकं सोप्प नव्हतं.

त्यांच्या डोक्यात फुड संबंधित काहीतरी करायचं फिक्स होतं. पण जमलं नाही. तेव्हाचं मार्केट काहीतरी पॅकिंगमधलं रेडी टू कुक खावं या विचाराचं नव्हतं. त्यामुळे गोष्ट तिथेच थांबली व त्यांनी गारर्मेंट क्षेत्रात पाऊल टाकलं.

वयाच्या ४० व्या वर्षी बिझनेस सुरू केला तो गारर्मेंटचा..

रिडेमेट कपडे विकणे अस या बिझनेसचं स्वरूप. एकामागून एक वर्ष जावू लागली अन् राधाजी सेटल होत गेल्या. सुरवातच चार माणसांनी झाली होती पण २०१० सालापर्यन्त हा बिझनेस हजार माणसांना थेट रोजगार देणारा झाला..

पाहिलेलं एक स्वप्न पुर्ण झालं, स्वत:चा असा बिझनेस होता. सगळं सेटल होतं..

आत्ता माणसानं काय करायचं असतं. तर असा बिझनेस आपल्या मुलांकडे सोपवून मस्तपैकी लाईफ एन्जॉय करायची असते. कोणीही तेच केलं असतं. पण इथे राधा डागा यांना आठवलं ते आपलं जूनं स्वप्न..

फुड सेक्टरमध्ये काहीतरी करायचं… 

हे काहीतरी करायचं अस त्यांच्या डोक्यात आलं तेव्हा त्यांच वय होतं ६९ वर्ष. सगळं आयुष्य तस झालेलं. तरिही डोकं लावून त्या काहीतरी करण्याचा प्रयत्न करू लागल्या.

सुरवात केली ती इजी टू कुट किंवा इन्स्टंट कुक या प्रकारातून. थोडक्यात गरम पाणी व मॅगी दिली जाते व बॉलमध्ये झाली मॅग्गी तयार असा प्रकार असतो. याला त्यांनी जरा चांगल्या पद्धतीने जोडलं. म्हणजे ग्राहकांना कमी कष्ट पडतील पण चांगल काहीतरी देता येईल. त्यासाठी आपल्याचं कंपनीतला एक छोटा भाग रिकामा करुन तिथे प्रयोग सुरू केले.

त्यासाठी त्यांनी एक कुक घेतला. काम चालू झालं. एक क्षण आला तेव्हा त्यांना वाटलं की आत्ता हा बिझनेस पिकअप घेवू शकतो.

तेव्हा कंपनीचं नाव ठेवलं त्रिगुणी इजी इट्स..

यात एक प्रोडक्ट आणलं लेमन राईस नावाने. एकूण १५ प्रॉडक्ट तयार करण्यात आले. त्यामध्ये राईस होता, बिर्याणी होती सोबतच डाल खिचडी, राजमा चावल अन् पोहे, उपमा देखील होता. आत्ता गरज होती मार्केट सेट करण्याची..

तूम्ही B2B आणि B2C या कन्सेप्ट वाचल्याचं असतील. नसतील माहित तर थोडक्यात सांगतो, एखादा बिझनेस बिझनेसला आपला माल पोहचवतो तेव्हा तो B2B आणि एखादा बिझनेस ग्राहकांना माल पोहचवतो तेव्हा तो बिझनेस टू कन्झुमर अर्थात B2C. राधा यांनी B2B चा पर्याय निवडला. 

त्यांनी आपला माल इंडिगो साठी कसा देता येईल याची चाचपणी केली. इंडिगोसोबत अनेक मिटींग्स झाल्यानंतर त्यांच्याकडून प्रायोगिक तत्वावर फ्लाईटमध्ये पोहे, उपमा, लेमन राईस देण्यास सुरवात झाली. ग्राहकांनी या पदार्थांना चांगला रिस्पॉन्स दिला. आर्डर वाढत गेली अन् बिझनेस सेट होत गेला.

आत्ता B2C चं मार्केट देखील त्यांनी ओळखलं.

त्या दिशेने देखील प्रयत्न करण्यात सुरवात करण्यात आली. एकट्या इंडिगो फ्लाईटचं सांगायचं तर या फ्लाईटचा वार्षिक टर्नओव्हर साधारण १ कोटींच्या पुढे जातो. त्यांनी आपला व्यवसाय असा पक्का केली की त्यामुळे एका ठिकाणावरून त्यांना वार्षिक १ कोटींचा व्यवहार करता येतो.

आत्ता B2C चं मार्केट त्या सेट करण्याच्या मागे लागलेत. आज त्यांच वय आहे ७८ वर्ष अन् याही वयात त्या नवीन स्वप्न पाहत आहेत, बस्स अजून काय पाहीजे.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.