युरोपात पहिलं हिंदू मंदीर बांधणाऱ्या, लंडनमध्ये खानावळ चालवणाऱ्या “राधाबाई वनारसे”

मुळात परदेशात जाणं सोपं काम नसतं. त्यातही इंग्लड सारख्या देशांमध्ये वातारण, त्यांचे दुसऱ्या देशांमधील लोकांबाबतचा दृष्टिकोन हे सगळं वेगळं आहे. तिथे कायमस्वरूपी रहायचं असेल तर इंग्रजी बोलता येणं, समजणे गरजेचं असते. 

परदेशात स्थायिक व्हायचं म्हटल्यावर भाषा, संस्कृती, राहणीमान सगळ्याचं गोष्टीत बदल होतो. एका संस्कृतीतून दुसऱ्या संस्कृतीत शिफ्ट व्हायला स्वतःत खूप बदल करणे गरजेचं असतं.  गावाकडून आपल्याला पुण्या मुंबईत भेटायला येणाऱ्या आई वडिलांची कशी धांदल उडते हे आपण पाहिलंच असेल.

भारत स्वतंत्र झाल्यानंतरच्या काळात यवतमाळच्या एका आजीने स्वप्नांतही इंग्लंड मध्ये कधी जाण्याचा विचार सुद्धा केला नसेल.

पण त्या इंग्लंड मध्ये नुसत्या गेल्याच नाही तर सगळ्या अडथळ्यांचा सामना करत त्यांनी लंडन मध्ये वेगळे स्थान निर्माण केले. परदेशी विद्यार्थ्यांच्या आधारवड तर बनल्याचं सामाजिक व सांस्कृतिक बाबतीत आपला ठसा उमटवला होता.

ही गोष्ट आहे लंडनच्या आजी राधाबाई वनारसे यांची…

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील चौंडी या गावी १० फेब्रुवारी १९१० मध्ये डहाके कुटुंबात राधाबाई यांचा जन्म झाला. घराची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यातच लहानपणी त्यांचे आई वडिलांचे निधन झाले. त्यानंतर राधाबाईंचा आत्याने सांभाळ केला.

त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे १३-१४ व्या वर्षी त्यांचे लग्न लावून देण्यात आलं. 

त्यांना ५ मुली झाल्या. त्यामुळे राधाबाईंना सासरच्या मंडळींकडून त्रास दिला जायचा. त्यातच ३३ व्या वर्षी त्यांच्या पतीचे निधन झाले. अशा परिस्थिती त्या उदरनिर्वाह करू लागल्या होत्या. मुलींच्या लग्नासाठी राहत घर गहाण ठेवलं. 

दरम्यान पंढपूरच्या यात्रेसाठी आबाजी डहाके हे लंडनवरून आले होते. त्यांच्या बायकोचे लंडन मध्ये निधन झाले होते. एका मध्यस्थाने त्यांचा पुनर्विवाह लावून दिला. भारतात काही काळ राहिल्यानंतर ते दोघे बोटीने लंडनला गेले. ना त्यांना तिथल्या भाषेची, संस्कृतीची, राहणीमानाची कल्पना राधाबाई यांना  नव्हती. 

लहान असतांना इंग्रजांचे भारतावर राज्य होते आणि आपण त्यांचे गुलाम होते एवढंच त्यांना माहित होत. 

मात्र तिथं गेल्यावर पतीच्या पहिल्या मुलांनी राधाबाई सावत्र आई म्हणून नको होती. त्यामुळे त्यांना पहिल्या दिवसा पासून त्यांना त्रास सहन करावं लागला. 

त्या मुलांचा लंडन मध्ये लॉजिंग बोर्डिंगचा व्यवसाय होता. भारतातून शिक्षण व नोकरीसाठी लंडनला येणारे मुले डहाके यांच्या मुलांच्या लॉजींग बोर्डिंग मध्ये राहत आणि जेवत होती. राधाबाई त्यांना मदत करू लागल्या होत्या. एवढं करून सुद्धा ती सावत्र मुलं राधाबाई यांना भारतात पाठवविण्याच्या तयारीत होती. पण राधाबाई दबावाला बळी पडल्या नाही.  

सावत्र नातवंडे राधाबाईंना ‘आजी’ म्हणून हाक मारीत. यामुळे इतरही लोक त्यांना ‘आजी’ म्हणू लागले. एकीकडे घरात गुलामासारखे काम करत असतांना आजीबाई हळूहळू तिथली भाषा, संस्कृती, माणसे यांच्याशी जुळत गेल्या.

त्यांनी बनवलेले जेवणाला वेगळी चव होती. त्यामुळे त्या खाणावळीला गर्दी वाढू लागली होती. कसाबसा संसार सुरु होता. इतक्यात आबाजी डहाके आजरी पडेल आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यामुळे राधाबाई पुन्हा रस्त्यावर आल्या. 

सावत्र मुलांनी त्यांना घराबाहेर काढले. त्यांना भारतात पाठविण्याची तयारी त्यामुलांनी केली. बोटीची ३ तिकिटे आणि ५० पौंड दिले आणि आणि घरा बाहेर काढले. तेही ऐन थंडीने गोठवणार्‍या हिवाळ्यात. अशिक्षित ९ वारी नेसलेली बाई लंडन च्या बर्फात हातात आपल्या दोन लहान मुली, एक वळकटी घेऊन उभ्या होत्या. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या ज्यू माणसाने त्यांना घरी नेले. तोडक्या मोडक्या भाषेत काय येते असं विचारलं. 

स्वयंपाक येतो असे सांगितले. त्या माणसाने यांना आपल्या घरातील मोकळी जागा दिली आणि स्वयंपाक करायला सांगितला. तुझ्या देशातले लोक येतील जेवायला असं त्यांनी राधाबाईंना सांगितले.  अशा प्रकारे आजीबाई यांच्या “वनारसे खानावळ ” या लंडन मधल्या खानावळीचा जन्म झाला.

लंडन मध्ये अस्सल महाराष्ट्रीय जेवण मिळते हे कळल्यावर त्यांच्याकडे तिथे गेलेल्या मराठी माणसांची रंग लागू लागली होती.

पुढे आजींनी राहायला कॉट बेसिस वर जागा द्यायला सुरवात केली. 

आलेल्या पैशांतून त्यांनी इतरांना हाताला धरलं व्यवसाय वाढवला. पुढे त्या अनेक मोठ्या घरांच्या मालकीण झाल्या. एवढंच नाही तर भारतीय संस्कृतीचं प्रतीक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाऊ लागलं. लंडन मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची आधारवड म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाऊ लागलं. 

लंडन मधील सन्मानीय व्यक्ती म्हणून त्यांना ओळखलं जाऊ लागले. भारतातून इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण सारख्या व्यक्ती लंडन मध्ये गेल्यावर त्यांना भेटू लागल्या होत्या. लंडनमध्ये मंदिर बांधून भारतीयांना एकत्र येण्यासाठी त्यांनी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. लंडनमधील महाराष्ट्र मंडळाच्या उपक्रमांना आकार देण्यातही राधाबाई डहाके यांचा मोठा वाटा आहे.

पु ल देशपांडे, अत्रे, यांच्यासारखे अनेक मराठी नेते, अभिनेते  त्यांच्याकडे राहून, जेवन करून गेले होते. राधाबाई ९ वारी साडी नेसून एकट्या लंडन मध्ये फिरत. लंडन मधील गणेशोत्सव सुद्धा त्यांची केल्याचे सांगण्यात येते.

तिथले पहिले देऊळ ही त्यांनीच बांधले. त्यांना इंग्लिश मध्ये फक्त RADHABAI एवढंच लिहायला येत होते. लंडनच्या आजी बाई कर्तृत्वाने एवढ्या मोठ्या झाल्या त्यांचा अंत्ययात्रेत तेथील मेयर सहभागी झाले होते. 

चौंडी या मूळ गावी त्यांच्या स्मारक बांधण्यात आले आहे.  

संदर्भ : सरोजिनी वैद्य यांचे पुस्तक ‘कहाणी लंडनच्या आजीबाईं’ची 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.