वयाच्या १०५ व्या वर्षी पॅरिसला जावून गोंधळ सादर करणारे, राजारामबापू कदम होते..

गोंधळ परंपरा ही महाराष्ट्रात सर्वदूर पसरली आहे आणि लग्नाच्या आधी किंवा लग्नाच्या नंतर जागरण गोंधळ महाराष्ट्रात भाविकांच्या घरी घातला जातो. गोंधळ का घातला जातो तर भोळ्या भक्ताच्या घरात सूख समृध्दी आणि शांतता नांदावी म्हणून हा गोंधळ घातला जातो.

रेणुराई गोंधळी आणि कदमराई गोंधळी असे गोंधळी लोकांचं दोन प्रकार पडतात. यातले कदमराई गोंधळी म्हणजे राजाराम बापू कदम.

भरघोस मिश्या आणि धिप्पाड देह आणि त्या देहावर फुलणारा पायघोळ अंगरखा.

राजाराम बापू कदम हे परभणीचे गोंधळी.

राधा विलास ही गवळण त्यांनी लिहिली आणि तिला इतक्या अप्रतिम पद्धतीने जगभर पसरवली की त्याला तोडच नाही. ही गवळण सादर करताना राधेच वात्सल्य आणि राधेचा श्रृंगार राजाराम बापू कदम असे काही जिवंत करायचे की पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसायचं. राजारामबापू कदम अनेक पुरस्कार मिळवलेले लोककलाकार आहेत. त्यांच्या गोंधळ परंपरेतला हा अभिमान वाटावा असा किस्सा.

जांभूळ आख्यान हे मेनली उभ राहिलं ते राधाविलास या गवळणीतून. पूढे जांभूळ आख्यान विठ्ठल उमप यांनी जगभर नेलं पण त्याही आधी राजाराम बापू कदम यांनी ही राधा विलास गवळण संकलित केली होती आणि ती ते सादरही करायचे. त्यातलीच एक झलक….

 

झाडाची उडविली फळं अन् केली देवगत

एका झाडाला एक फळं लैच निर्मळ अन् देठी गाभुळल

अन् कर्णाला पाहून द्रौपदीच मन पाकुळलं….

एकेदिवशी वाटे कर्णाला जावं जी, पांडवांच्या महाली जावं जी

सत्कार केला कर्णाचा धन्य महाराज जी, कर्णाला पाहून द्रौपदीस वाटे लाज जी

झाली सर्द-गर्द, कामोन्नत देह चळलं, कर्णाला पाहून द्रौपदीचं मन पाकुळलं…

राधाकृष्ण कदम याबद्दल सांगतात की ‘जांभूळ आख्यान’ रंगात आलेलं असायचं आणि गोंधळ महर्षी राजारामबापू कदम यांची द्रौपदीही. पाच पांडव असताना सहाव्या पांडवावर मन आलेली द्रौपदी राजारामबापू कदम असे काही सादर करायचे की, वाटायचं कर्ण आताच हिच्या रंगमहाली येऊन गेलाय. द्रौपदी सैरभैर झालीय.

द्रौपदीच्या रूपातला त्यांचा नखरा, मुरका, आवेग असा भन्नाट असायचा, पाहणाऱ्याला वाटायचं खरीखुरी द्रौपदीच अवतरलीय भूतलावर. द्रौपदीच्या साऱ्या भावावस्थांतलं भावकाम राजाराम बापू कदम अप्रतिम साकारायचे.

कर्णावर भाळलेली, त्याच्याशी संग करण्याची इच्छा बाळगणारी, कृष्णाने तिचं हे गुपित जाणल्यावर लज्जित होणारी, दृष्टान्तकथेतून पुन्हा शील परत मिळवणारी…

याच कसबामुळे १९८६ मध्ये वयाच्या १०५ व्या वर्षीही त्यांनी पॅरिसच्या आयफेल टॉवरखाली गोंधळ घातला तेव्हा फ्रान्सचे तेव्हाचे पंतप्रधान मितराँदेखील भारावून गेले होते. त्यांनी राजाराम बापू कदम यांना घट्ट मिठीच मारली होती.

इंडियन नॅशनल थिएटर कडून राजाराम बापू कदम हे वय वर्ष 105 असतानाही पॅरिसला गेले आणि तिथे त्यांनी हा गोंधळ सादर करून उपस्थितांची मने जिंकली होती. आज त्यांची ही गोंधळ परंपरा त्यांचे वारसदार राधाकृष्ण कदम चालवत आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.