अभिनंदन स्टाईलच्या मिश्या ठेवल्या म्हणून कॉन्स्टेबलला सस्पेंड करण्यात आलंय….

मिश्या असाव्या तर नथुलाल सारख्या नाहीतर नसलेल्या बऱ्या असं अमिताभ बच्चन त्याच्या एका सिनेमात म्हणताना आपल्याला दिसतो. नंतर हा ट्रेंड आला ऑफिसर अभिनंदन यांच्या मिशिवरून. एकदम वाढीव मिश्या आणि रुबाबदार चेहरा हा अभिनंदन यांचा होता. मिश्या किती महत्वाच्या याचं महत्व त्यालाच असतं ज्याला मिश्या अजूनही येत नाही.

बऱ्याच  लोकांसाठी आपल्या मिश्या या अभिमान आणि स्वाभिमान, मेन म्हणजे शीर्षस्थानी असतात. त्यासाठी ते कोणतीही किंमत मोजायला तयार असतात. पण तुम्ही कधी ऐकलय का की कोणीतरी त्यांच्या मिशा त्यांच्या कामापेक्षा जास्त महत्वाचं मानत? तुम्ही ऐकलं नसेल तर जाणून घ्या मध्य प्रदेशातील या पोलीसाबद्दल.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये स्टायलिश मिशा ठेवल्यामुळे एका पोलिसाची नोकरी गेली. 

हे प्रकरण इतके तापलं आहे की, आता सोशल मीडियावर या पोलिसाची आणि त्याच्या मिशीची चर्चा सुरू आहे. या पोलिसाच्या समर्थनार्थ लोक पुढे येऊ लागले आहेत.मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये स्टायलिश मिशा ठेवल्यामुळे एका पोलिसाची नोकरी गेली. हे प्रकरण इतके तापल आहे की, आता सोशल मीडियावर या पोलिसाची आणि त्याच्या मिशीची चर्चा सुरू आहे. या पोलिसाच्या समर्थनार्थ लोक पुढे येऊ लागले आहेत.

राकेश राणा असे या पोलिस कॉन्स्टेबलचे नाव असून, ते मध्य प्रदेश पोलिसात ड्रायव्हर कॉन्स्टेबल म्हणून तैनात होते. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना त्यांची स्टायलिश मिशी आवडली नाही आणि त्यांनी राकेशला मिशा कापण्याचे आदेश दिले, मात्र राकेशने मिशी हा आपला अभिमान असल्याचे सांगत तसे करण्यास नकार दिला. त्यांचा नकार हे त्यांच्या निलंबनाचे कारण ठरले.

राकेश राणा यांना निलंबित करताना, सरकारी आदेशात असे म्हटले आहे की हवालदार चालक 1555 राकेश राणा, एमटीपूल, भोपाळ हे विशेष पोलीस महासंचालक (सहकार फसवणूक विभाग आणि सार्वजनिक सेवा हमी) यांचे चालक म्हणून कार्यरत आहेत. आदेश पत्रात असे म्हटले आहे की राकेश यांचा टर्न आउट तपासला असता असे आढळले की त्याचे केस वाढले आहेत आणि मिशा विचित्र डिझाइनच्या आहेत ज्या मानेपर्यंत पोहोचतात. म्हणजे ज्या अभिनंदन यांच्यासारख्या होत्या.

ऑर्डर लेटरमध्ये राकेशच्या मिशीची रचना अत्यंत कुरूप असल्याचे वर्णन करण्यात आले होते. यानंतर राकेश राणा यांना त्यांचे टर्न आउट ठीक करण्यासाठी केस आणि मिशा नीट कापण्याच्या सूचना देण्यात आल्या, मात्र त्यांनी ही विभागीय सूचना पाळली नाही.

यानंतर विभागीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले. मिशा राकेश यांच्यासाठी स्वाभिमान आहे. राकेश राणासोबतच सोशल मीडियावरील लोकही पोलिसांच्या या कारवाईवर आश्चर्य व्यक्त करत आहेत.

पण त्याहूनही आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणजे राकेश राणा यांनी नोकरीपेक्षा आपला स्वाभिमान जास्त ठेवला आहे.

निलंबित झाल्यानंतरही त्यांनी मिशी कापण्यास नकार दिला आहे. राकेश या संदर्भात सांगतात की, ते राजपूत आहे, त्यांना मिशी कापता येणार नाही कारण मिशी ही राजपूतची शान आहे.

राकेश राणा यांच्या म्हणण्यानुसार काहीही झाले तरी ते मिशीबाबत तडजोड करणार नाहीत. पण मिशी वरून बडतर्फ करणं यावर हे प्रकरण बरंच तापलं आहे.

मिशीची किंमत सस्पेंड झाल्यावरसुद्धा राकेश यांना आहे आणि अभिनंदन स्टाईल मिशी असल्याचा त्यांना अभिमान आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.