म्हणून ४२ खून करणाऱ्या रमण राघवला फाशी देण्यात आली नव्हती. 

रमण राघव. १९७० च्या काळातला अध्याय. रमण राघव जावून जवळपास २५ वर्ष होत आलीत. पण अजूनही त्याची चर्चा होते. क्रुर आणि विक्षिप्त या शब्दातच त्याच वर्णन केलं जातं. पण ४२ खून करुन देखील त्याला फासावर लटकवता आलं नाही.

कोर्टाने त्याला मृत्यूची शिक्षा का दिली नाही हा प्रश्न अनेकांना आजही पडतो. 

रमण राघवला अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याची दोन दिवस चौकशी केली. दोन दिवस तो काहीच बोलला नाही. तिसऱ्या दिवशी पोलिसांनी त्याला काही खाणार का विचारलं तेव्हा तो म्हणाला मुर्गा. पोलिसांनी त्याला चिकन खावू घातलं. पोटभर खाल्यानंतर पुन्हा पोलिसांनी विचारलं अजून काही खाणार का. तो पुन्हा मुर्गा म्हणाला. पोलिसांनी त्याला परत चिकन खायला दिलं. त्यानंतर तो स्वत: बोलू लागला. 

किती खून केले ? कोणाचे केले ? अस विचारल्यानंतर तो पोलिसांना जिथे हत्यार लपवून ठेवली जात अशा ठिकाणी घेवून गेला. एका झाडीत एक लोखंडी रॉड आणि काही हत्यारे त्याने लपवून ठेवली होती.  त्यानंतर त्याने पोलिसांकडे खोबरेल तेल आणि कंगव्याची मागणी केली. खोबरेल तेल दिल्यानंतर ते त्याने स्वत:च्या अंगभर लावून घेतलं. त्या वासात मश्गुल झाला.

पोलिसांनी अजून चौकशी केल्यानंतर तो बोलू लागला. 

नाव काय ? 

सिंधी दलवाई / तलवाई 

वय चाळीस वर्ष 

पत्ता मद्रास 

चिंचोली फाटकाकडे दोघांना कशाला मारलेस ? 

मी त्यांना मारले कारण तिन सरकारमध्ये युद्ध चालू होते. ब्रिटीश सरकार, इंग्रज सरकार आणि मी. युद्धाबद्दल मी जास्त सांगू शकत नाही. 

रमण राघवने दोन टप्यामध्ये खुनाच सत्र अवलंबल होतं. 1965-66 च्या दरम्यान त्याने एकूण 19 जणांवर खूनी हल्ला केला. त्यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला. बाकीचे दहा जण यशस्वीरित्या त्याच्या तावडीतून पळून गेले होते. त्यानंतर काही काळ हे खूनाच सत्र थांबल. 

त्यानंतर 1968 पासून पुन्हा खूनांच्या बातम्या येवू लागल्या. रात्रीच्या वेळी डोक्यात जोराचा वार करुन हे खून केलेले असत. सर्वच खून फुटपाथवर झोपलेले, झोपडपट्टीतले कामगारांचे असत. लहान मुलं, महिला, पुरूष असं प्रत्येकाला रमण राघवणे लक्ष्य केलेलं होतं. रमण राघवच्या या गुन्ह्यात स्वत:च्या बहिणीवर बलात्कार करुन खून केल्याचा देखील आरोप होता. 

Screenshot 2019 04 29 at 1.49.35 PM

त्या काळात क्राईम ब्रॅन्चमध्ये नव्याने नियुक्त झालेले रमाकांत कुलकर्णी यांनी हि फाईल आपल्या ताब्यात घेतली होती. ज्यांच्यावर हल्ला झाला आहे अशा लोकांकडून स्केच काढून घेण्यात आले होते. या गुन्ह्याच्या संदर्भातून त्याला एकदा ताब्यात देखील घेण्यात आलं पण त्याची मानसिकता पाहून पुन्हा त्याला सोडून देण्याचा निर्णय घेण्यात आला.  प्रत्यक्षदर्शनी सांगितलेल्या वर्णनावरुन PSI एलेक्स फिआल्हो यांना त्याची ओळख पटली होती. सुरवातीपासून उडवाउडवीची उत्तरं देणारा रमण राघव हा मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे याची पोलिसांना खात्री पटली होती. 

त्यानंतर रमण राघवची केस सत्र न्यायालयात गेली. सत्र न्यायालयामार्फत १३ ऑगस्ट १९६९ रोजी त्याला देहदंडाची शिक्षा ठोठवण्यात आली होती, मात्र हायकोर्टाने त्याची केस कायद्याच्या परिप्रेक्षात बघत असताना ती वैद्यकिय परिप्रेक्षात देखील पाहण्याचा निर्णय घेतला. याचाच परिणाम म्हणजे रमण राघव पॅरॉनाईड स्किझोफ्रेनियाचा रुग्ण असल्याच लक्षात आलं. 

हाय कोर्टामार्फत ३०२ कलमासोबतच कलम ८४ चा देखील विचार करण्यात आला. ३०२ म्हणजे गुन्हा पण सोबत कलम ८४ असल्याने मानसिकदृष्ट्या रुग्ण असलेल्या व्यक्तिचे कृत्य गुन्ह्याच्या कक्षेत येणार नव्हते. 

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. ए. जहागिरदार आणि न्यायमूर्ती ए. तातेड यांच्या खंडपीठाने ४ ऑगस्ट १९८७ रोजी महाराष्ट्र शासन विरुद्ध सिंधी उर्फ रामन, दलवाई यांचा मुलगा खटल्यात निकाल देत असताना त्याला मानसिक रुग्ण ठरवले. 

त्यासाठी रमण राघवचे दोन दोन तासांच्या फरकाने एकूण पाच सेशन घेण्यात आले होते. यामध्ये रमण राघवने जे मुद्दे मांडले होते त्याप्रमाणे, 

  • देशात तीन सरकार होती. ब्रिटीश सरकार, कॉंग्रेस सरकार आणि अकबर सरकार. या तिन्ही सरकारांनी त्याच्या विरोधात कारस्थान रचले होते. 
  • त्याला तृतीयपंथी करण्यात येईल अशी त्याला भिती वाटत होती. 

अखेर  हायकोर्टाने त्याला आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली. पुण्यात येरवडा कारागृहात त्यांनी रवानगी करण्यात आली. त्याच्यावर ’पॅरॉनाइड स्किझोफ्रेनिया’ या आजारावर उपचार करण्याची सुरवात झाली मात्र त्याची मानसिकता पाहता डॉक्टरांनी तो ठिक होईल हि अपेक्षा सोडून दिली होती. अखेर १९९५ साली किडनीच्या आजारामुळे त्याच निधन झालं. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.