मी फक्त दोनच माणसांना भ्यायचो, “पहिला कॅप्टन चिकारा आणि दूसरा स्पॉट नाना.”

अंगावर एक कडक युनिफॉर्म. बॅकग्रॉउंडला कावळ्याचा आवाज. आणि एक खतरनाक डॉयलॉग. आय एम द किंग विदाऊट किंगडम. कर्नल चिकारा. (काऊकाऊकाऊ).

बस्स अल गद्दाफी, लादेन, सद्दाम हुसेन हे कर्नल चिकाराच्या दहशतीपुढे काहीच नव्हते. हुकूमशहा म्हणून आपल्याला समजलेला पहिला माणूस कर्नल चिकाराच असेल. ९० च्या दशकात हवा कुणाची का असेना दहशत होती फक्त एकाच माणसांची त्याच नाव कर्नल चिकारा. 

कर्नल चिकारा आणि स्पॉट नाना या नावाने ओळखला जाणारा रामी रेड्डी.

संपुर्ण नाव गंगासानी रामी रेड्डी. आध्रप्रदेशातल्या वाल्मिकीपुरम गावचा. त्याच्या गावाच नाव वाल्मिकीपुरम होतं. तो बाहेरच्या आयुष्यात देखील वाल्मिकीसारखाच वागायचां पण पडद्यावर मात्र तो वाल्मिकीचा वाल्या झाला. 

रामी रेड्डी उच्चशिक्षीत होता. चांगल्या मार्काने त्याने जर्नेलिझम केलं होतं. हैद्राबादच्या उस्मानिया विद्यापिठातून तो शिकला आणि एका वर्तमानपत्रात जॉब करू लागला. बऱ्यापैकी पत्रकार म्हणून दोन वेळचे पैसे देखील त्याला मिळायचे. पण चेहऱ्यावरची दहशत त्याला सिनेमात घेवून आली. त्याने पहिला सिनेमा मिळाला तो १९८९ साली अंकुशम मधून. 

या सिनेमातून त्याने स्पॉट नागाचा रोल केला होता. तो काळ एक खतरनाक व्हिलेन आणि बदला घेणारा हिरो इतक्यापुरताच मर्यादित होता. चेहऱ्यातून दिसणारी दहशत हाच मेन फॅक्टर होता. त्यात रामी रेड्डी डॉयलॉग फेकायला देखील मजबूत होता. झालं त्याचा पहिलाच सिनेमा अंकुशम सुपरहिट झाला. याच पिक्चरने राजशेखरला देखील मोठ्ठी प्रसिद्धी मिळाली होती. जसा तेलगु सिनेमात हिरो म्हणून राजशेखर फिक्स झाला होता तसाच रामी रेड्डी देखील व्हिलनच्या रोलसाठी सुप्रसिद्ध झाला. 

तेलगू सिनेमाचा हिट फॉर्म्युला घेवून हाच पिक्चर हिंदीत आला.

स्पॉट नागाचा स्पॉट नाना झाला. हिंदी सिनेमात त्याने स्पॉट नानाचा रोल करुन तुफान माजवला. स्पॉट नानाला दोनच गोष्टी जमायच्या. एकतर गडचिरोलित बदली नाहीतर खेळ खल्लास. आपल्या दहशतीने स्पॉट नानाने हव्वा केली.

“नाना को ना सुननें की आदत नहीं.”, टेन्शन लेनें का नहीं टेन्शन देणे का

असले डॉयलॉग आजही कित्येकांना आठवतात. 

त्यानंतरच्या तीन वर्षातच आला वक्त हमारा हैं. हिरो, हिरोईन सिनेमाची स्टोरी हे काहीच आठवत नाही पण आज फक्त आठवतो तो कर्नल चिकारा. कावळ्याच्या आवाजासोबत त्यांची होणारी एन्ट्री. आपल्या आर्मीत आलं की बाहेरचा मार्ग कसा मोकळा होतो हे सांगणारा कर्नल चिकाराच्या हातात कॅप्टैन बॉम्ब घावू नये म्हणून देव पाण्यात घालू वाटाचयचे. 

या दोन रोलने त्याला चांगलीच ओळख मिळवून दिली होत, त्यानंतर आलेल्या आंदोलन सिनेमातून तो बाबा नायक म्हणून समोर आलेला. एकंदरीत हिरो कोणीही असो दहशत फक्त रामी रेड्डीची अस वातावरण होतं. प

ण काळ संपला आणि तो स्क्रिनवरुन गायब झाला. 

Screen Shot 2018 12 19 at 6.52.14 PM

अचानक तो हैद्राबादमधल्या एका अवार्ड शो मध्ये दिसला. एकेकाळचा स्पॉट नाना आणि कर्नल चिकारा हाच तो ओळखणं लोकांना जड गेलं. त्याला लिवरचा कॅन्सर झाला होता. अशातच त्याच्या किडन्यांनी देखील काम करणं बंद केलं. एकेकाळचा किंग विदाऊट किंगडम वाला चिकारा १४ एप्रिल २०११ रोजी निघून गेला.  

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.