सेम टू सेम तात्या विंचूसारखा या सिरीयल किलरचा गेम झालेला…

डिसेंबर १९७८ मधला एक जबऱ्या दिवस. रशियातील रोस्तोव रेल्वे स्थानकावर लेना जकोटनोव्हा नावाची एक महिला तिच्या नऊ वर्षांच्या मुलीसह बाकावर बसली होती. मुलगी थोडी भुकेली होती. जकोटनोव्हाने, मुलीला बेंचवर बसवले, अन्नपदार्थ खरेदी करण्यासाठी जवळच्या कॅफेमध्ये गेली. जकोटनोव्हा तिचे सामान घेऊन बेंचजवळ पोहोचली तेव्हा ती मुलगी तिथे नव्हती.

मुलगी बेपत्ता झाल्यानंतर काही तासांनंतर, जवळच्या जंगलात एक माणूस सापडला ज्याचे हात रक्ताने माखलेले होते. त्या मुलीची हत्या केल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. हा राक्षस रशियाचा विक्षिप्त सिरीयल किलर आंद्रेई शिकाटिलो होता. त्यादिवशी शिकाटिलोने पहिल्यांदाच कुणाला तरी बळी बनवले होते. शिकाटीलो हा इतका मानसिक आजारी होता की, तो आधी अपहरण झालेल्या महिलांचे हात-पाय बांधून हत्या करायचा.

त्यानंतर त्याच्या मृतदेहावर बलात्कार केला. तो व्यवसायाने शिक्षक असला तरी सुरुवातीपासूनच लैंगिक निराशेचा बळी होता. हत्या, बलात्कार केल्यानंतर तो महिलांचे अवयव कापायचा. त्याने 12 वर्षात 56 महिलांची हत्या केल्यानंतर बलात्कार केला होता. पण शेवटी तो पकडला गेला. रशियन सीरियल किलर आंद्रेई शिकाटिलोची भितीदायक कथा. रशियन सीरियल किलर आंद्रेई शिकाटीलो खून करण्यापूर्वी महिलांना नग्न करायचा. मग हातपाय बांधायचा. यानंतर महिलेला काही समजेल तोपर्यंत तो तिला मारायचा.

गुन्हेगारीच्या जगाचा इतिहास अनेक भयानक गुन्हेगारांच्या कृत्यांनी भरलेला आहे. यामध्ये अशा नराधमांचा समावेश आहे, ज्यांनी एक-दोन नव्हे तर अनेक खून केले आहेत. केवळ खूनच नाही तर मृतांच्या मृतदेहांसोबत मर्यादेची क्रूरताही दाखवली. असेच एक नाव आहे रशियाचा कुख्यात सिरीयल किलर आंद्रेई शिकाटीलोचे. रशियामध्ये हे नाव भीतीपेक्षा कमी नाही. तो पूर्वी महिलांना मारायचा. त्यानंतर तो त्याच्या मृतदेहाशी शारीरिक संबंध ठेवायचा.

आंद्रेई शिकाटीलोचा जन्म 16 ऑक्टोबर 1936 रोजी युक्रेन, सोव्हिएत रशिया येथे झाला. तो व्यवसायाने शिक्षक होता. पण लहानपणापासूनच त्याला लैंगिक न्यूनगंडाचा त्रास होता. याचा परिणाम असा झाला की तो सतत त्याचाच विचार करत असे. वासनेची भूक शमवण्यासाठी तो काहीही करायला तयार होता. यामुळेच त्याला महिलांची हत्या करून आपली वासना नष्ट करण्याचे व्यसन जडले. रशियाच्या गुन्हेगारी इतिहासातील डेटा दर्शवितो की आंद्रेई शिकाटीलोने 1978 ते 1990 दरम्यान 56 पेक्षा जास्त लोकांची हत्या केली. त्याचे सर्वाधिक लक्ष्य महिला होते. ड्रग्जच्या बहाण्याने तो महिलांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांची हत्या करायचा.

आपली वासना दूर केल्यानंतर आंद्रेई आपल्या पीडितेचे डोळे काढत असे. त्यानंतर तो महिलेचा प्रायव्हेट पार्ट कापायचा. जणू त्या वेळी त्याच्या डोक्यावर सैतान स्वार झाला होता. रशियन पोलिसांच्या नोंदीनुसार, आंद्रेई शिकाटीलोने 1981 मध्ये 17 वर्षांच्या मुलीला पहिला बळी दिला. तो त्याच्या घृणास्पद आणि भयानक कृत्यांमुळे इतका कुप्रसिद्ध झाला की त्याला रोस्तोव्हचा बुचर, रेड रीपर आणि रोस्तोव्ह रीपर म्हणूनही ओळखले जात असे. पण गुन्ह्याला पाय नसतो असे म्हणतात. अखेर एके दिवशी हा विचित्र मारेकरी पोलिसांच्या हाती लागला

20 नोव्हेंबर 1990 रोजी पोलिसांनी आंद्रेई शिकाटीलोला अटक केली. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे पकडले जाऊनही त्याने आपला गुन्हा कबूल केला नाही. कोर्टात प्रकरण सुरूच होते. पण 14 फेब्रुवारी 1994 रोजी त्याला त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा झाली. चकमक उडाली आणि त्याच्या डोक्यात गोळी लागून त्याचा मृत्यू झाला.

असा हा शिकाटीलो शेवटी सेम तात्या विंचू सारखा नरक यातना भोगत मरण पावला. मात्र आजही त्याच्या नावानेच रशियामध्ये निम्म्या लोकांची गाळण उडते.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.