प्रत्येक दरोड्यानंतर चेहरा बदलून पोलिसांना घाम फोडणारा गुप्ता अजूनही हाती लागलेला नाही

संग्राम हा चेहरा लक्षात ठेव….

चेहरा है या चांद खीला है…

तेरे चेहरे में वो जादू है….

चेहरा क्यो देखते हो…

आता तुम्ही म्हणाल भिडू नक्की विषय आहे तरी काय ? तर थांबा की राव वातावरण निर्मिती करावी लागते असल्या डेंजर विषयांसाठी तसा फिल येत नाही. जास्त न चावता थेट मुद्द्यावर येऊ, तर एखाद्याचे किती नावं असू शकतात ? सरळ सोपं म्हणजे एक किंवा दोन. नाव बदलता येऊ शकतं पण चेहरा किती वेळा बदलता येऊ शकतो याचं काही लिमिट असेल की नाही.

घडी घडी थोबाड कसं बदलू शकतो माणूस त्याचाच हा किस्सा आणि वरती जे गाणे आणि डायलॉग सांगीतले ना त्याची लिंक लागेलच आता तुम्हाला.

खून, मारामाऱ्या, इंटीमेट सीन्स हा कंटेंट आज काल तुफान लोकप्रिय आहे पण आजचा किस्सा हा एखाद्या वेबसीरिजला सुद्धा भारी पडू शकतो. हा क्राईम सीन इतका डेंजर आहे की पोलिसांच्या सुद्धा बत्त्या गुल झाल्या होत्या.

रवी कुमार गुप्ता, रवी पेशंट उर्फ मास्टर, नेताजी असे अनेक नावं आणि या नावांमागे सहा महिन्याच्या अंतराने बदलत जाणारे चेहरे. आता नावांचा काय विषय नाही पण हे बदलत जाणारे चेहरे? इतके चेहरे चेंज करणारा हा माणूस ना बहुरूपी आहे ना की हिरो आहे तर हा गुन्हेगारी जगतातला भयानक माणूस आहे.

तर या गुन्हेगाराच ओरिजनल नाव आहे रवी कुमार गुप्ता. पण रवी कुमार गुप्ताला हे चेहरा बदल प्रकरण इतकं महागात पडलं की त्याच्या गँगच्या लोकांनाही तो ओळखू यायचा बंद झाला आणि पोलिसांचा तर विषयच लांब आहे पण अजूनही तो घावलेला नाहीय हे विशेष.

रवी कुमार गुप्ताची स्टोरी सुरू होते ती म्हणजे बिहारची राजधानी पटना आणि जहानाबादपासून. फक्त इतकंच नाही तर झारखंड,बंगाल, ओडिसा अशा राज्यांमध्ये त्याने चेहरे बदलून धुमाकूळ घातला होता आणि अजूनही त्याची दहशत कायम आहे. गर्दीत घुसने,मर्डर करणे आणि चेहरा बदलून परत पोलिसांना चकवा देऊन गर्दीत गायब होणे असा सगळं मास्टर प्लॅन रवी कुमार गुप्ताचा आहे.

हा किस्सा सुरू होतो २१ जानेवारी २०२२ पासून. बिहारच्या बाकरगंज मध्ये दुपारी दोन वाजता. या जागेत बाजार भरतो आणि याच बाजारात अशी घटना घडली ज्यामुळे अख्ख्या बिहारला दणके बसले. या एरियात एस एस ज्वेलर्स म्हणून दुकान होतं. अचानक या दुकानात चार ते सहा गुंड घुसले आणि त्याने दुकानात तोडफोड करून, बंदूक मालकाच्या डोक्याला लावून माल पळवून नेला.

ही लुटपाट ८-९ मिनिटे चालली पण या कालावधीत गुंडांनी १४ करोड गायब केले. शॉट वाजवून,कल्टी गायब….

गुंडांनी धमकावलं तरी सुद्धा काही फरक पडला नाही, चोरी करायला जास्त वेळ लागल्याने दुकानासमोर लोक जमा होऊ लागले. गुंडांनी फायरींग केली आणि पळून जायला लागले पण एक जणाने माती खाल्ली आणि तो चोर नेमका खाली पडला लोकांनी त्याला लागलीच धरला आणि बेदम तुडवला. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने साधू नाव असल्याचं सांगितलं आणि हा गडी १४ करोड लंपास करणाऱ्या रवी कुमार गुप्ताच्या गँगचा माणूस निघाला. याच रवी कुमारला कैक दिवसांपासून पोलीस शोधत होते.

साधूने पोलीस चौकशीत बरीच नाव सांगितली पण जेव्हा पोलिसांनी रवी कुमारचा फोटो दाखवला तेव्हा ती सुद्धा कन्फ्युज झाला आणि तो म्हणाला की हा रवी कुमार नाहीये.

आधी पोलिसांना वाटलं की हा काहीही फेकतोय पण बऱ्याच चौकशी नंतर पोलिसांना कळलं की विग, प्लास्टिक सर्जरी आणि चेहरा बदलून रवी कुमारने आपल्याला गंडवल आहे.

साधूने सांगितले की जेंव्हा जेंव्हा त्याने मर्डर केले तेंव्हा तेंव्हा त्याने चेहरा बदलला. त्यामुळे गँग मधले लोकं त्याला ओळखू शकत नव्हते. तो फक्त आपल्या ठराविक आणि विश्वासात असलेल्या लोकांशी संवाद साधायचा आणि त्यांच्यामार्फत गँग चालवायचा.

अजूनही पोलिसांकडे रवी कुमारचा ओरिजनल फोटो नाहीये जे आहेत ते वेगवेगळे आहेत. पोलिसांनी दाखवलेलं स्केच आणि साधूने सांगितलेलं वर्णन ६० टक्के मिळतं जुळतं आहे. दरोडे टाकून ,खून करून रवी कुमार अजूनही हवा करतोय.

१८ डिसेंबर २०१९ ला तो पकडला गेला होता पण न्यायालयात हजर करते वेळी त्याने पोलिसांना गुंगारा दिला आणि तो गायब झाला. नंतर मात्र त्याने मोठे ज्वेलरी शॉपला नजरेत धरलं आणि तिथे दरोडे टाकले. आता परत त्याच दरोड्यावर येऊ जिथून १४ करोड लंपास झाले पण त्यात रवी कुमारचा काहीही सहभाग नव्हता असं पोलीस चौकशीत समोर आलं. हे १४ करोड साधूने रवी कुमारचा संबंध लावून उकळले होते. आपल्यावरच सगळं बालंट हे रवी कुमार वर टाकायचं असा प्लॅन साधूचा होता. ही बातमी प्रसिद्ध झाली पण रवी कुमार हे नाव पोलिसांच्या हिट लिस्टवर परत एकदा आलं आणि अजूनही रवी कुमार हाती लागलेला नाही.

बिहारच्या आणि आसपासच्या राज्यांमध्ये मोठे दरोडे पडतात , लोकांचा अंदाज थेट रवी कुमार वर असतो पण चेहरे बदलून गायब होणारा हा खतरनाक चोर अजून हाती लागलेला नाही. पोलिसांनी या ऑपरेशनचं नाव एक ग्लास पाणी असं ठेवलेलं आहे. पण १४ करोडच्या दरोड्यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा रवी कुमार गुप्ता चर्चेत आला आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.