वयाच्या 14 व्या वर्षी kbc मधून करोडपती बनलेला रवीमोहन सैनी आज आयपीएस आहे…

प्रत्येकाला त्याच्या नशिबापेक्षा जास्त काहीतरी पाहिजे असतं. नशीब सुद्धा अनेकांना जास्त देते पण ते ते सांभाळू शकत नाही. त्याचबरोबर रविमोहन सैनी सारखे काही लोक आहेत जे नशिबापेक्षा जास्त मिळूनही आपली स्वप्ने पूर्ण करतात, नासधूस करण्याच्या भानगडीत पडत नाही. कौन बनेगा करोडपती ज्युनियरमध्ये एक कोटी जिंकण्यापासून ते आयपीएस बनण्यापर्यंत रवीच्या कथेतून खूप काही शिकण्यासारखे आहे.

कोण बनेगा करोडपती या क्विझ गेम शोमध्ये करोडपती होण्यासाठी अनेकांनी आपले नशीब आजमावले, त्यापैकी बरेच जण करोडपती झाले पण जवळपास सर्वच करोडपती जवळपास गायब झाले आहेत, त्यांच्याबद्दल जगाला काही माहीत नाही. पण 2001 मध्ये एका 14 वर्षाच्या मुलाने 1 कोटी रुपये जिंकून त्या दिवसांत खूप चर्चेत आणले होते. वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी इतकी हवा या मुलाने केली होती.

या मुलाचा प्रवास तो करोडपती होईपर्यंत थांबला नाही, तर त्याने स्वतःच त्याच्या भविष्याचा मार्ग ठरवला आणि तो आयपीएस अधिकारी झाला.  IPS रवि मोहन सैनीबद्दलची ही यशोगाथा, ज्याने कौन बनेगा करोडपती गेम शो जिंकून UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि IPS बनला. रवी सध्या गुजरातमधील पोरबंदर येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहे.

2001 मध्ये रवीने कौन बनेगा करोडपती ज्युनियर सारख्या क्विझ शोमध्ये भाग घेतला. शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांनी रवीला 15 प्रश्न विचारले आणि प्रत्येक प्रश्नाचे अचूक उत्तर देऊन तो त्या सीझनचा करोडपती बनला. रवी जेव्हा या शोमध्ये सहभागी झाला तेव्हा तो दहावीचा विद्यार्थी होता.

रवी मोहन सैनी हा निवृत्त भारतीय नौदल अधिकाऱ्याचा मुलगा असून तो मूळचा राजस्थानमधील अलवरचा आहे. रवीचे वडील आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे तैनात होते. यामुळेच रवीचे शालेय शिक्षण येथील नेव्हल पब्लिक स्कूलमधून झाले. तो अभ्यासात नेहमी हुशार होता. म्हणून रवी आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत टॉपर राहू शकला.

रवीने यूपीएससी परीक्षा पास करण्यापूर्वी एमबीबीएस केले होते. त्याने जयपूरच्या महात्मा गांधी मेडिकल कॉलेजमधून बारावीनंतर एमबीबीएस पूर्ण केले. एमबीबीएसनंतर तो इंटर्नशिप करत होता आणि याच दरम्यान त्याची नागरी सेवेत निवड झाली. रवीवर त्याच्या नेव्ही ऑफिसर वडिलांचा खूप प्रभाव होता. त्यांना पाहून रवीने आयपीएस होण्याचे स्वप्न पाहिले.

रविमोहन सैनीला आयपीएस बनणे सोपे नव्हते. पहिल्या दोन प्रयत्नात त्याला त्याचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. रवीने 2012 मध्ये पहिल्यांदा UPSC ची परीक्षा दिली होती, ज्यामध्ये तो मेन पास करू शकला नाही. यानंतर रवी 2013 मध्ये पुन्हा यूपीएससीमध्ये बसला. यावेळी तो परीक्षा उत्तीर्ण झाला पण त्याची आयपीएससाठी नाही तर भारतीय पोस्ट आणि दूरसंचार विभागातील अकाउंट्स आणि फायनान्स सर्व्हिससाठी निवड झाली. या पदावर तो समाधानी नव्हता.

यामुळेच त्याने 2014 मध्ये पुन्हा प्रयत्न केले आणि यावेळी त्याची मेहनत फळाला आली. तिसर्‍या प्रयत्नात, रवीने अखिल भारतात 461 वा क्रमांक मिळविला आणि तो आयपीएस अधिकारी बनला.

तर आज हे रविमोहन सैनी भारतभर करोडपती म्हणून तर ओळखले जायचेच पण आता आयपीएस म्हणूनही ओळखले जातात.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.