जगात अशाही काही चोऱ्या घडल्यात ज्यांची गिनीज बुकमध्ये नोंद करण्यात आलीये

आता टायटल वाचून आत आले आहात खरे आणि वरून तुम्हीच म्हणाल की अरे भिडू प्रेमाचा आठवडा आहे हा, हृदय चोरी करण्याच्या गोष्टी सांगण्याऐवजी हा काय नवीन लफडा सुरू केला. तर पब्लिक प्रेमाची चोरी वैगरे तर चालूच असते पण आज ज्या चोऱ्या आपण बघणार आहोत त्या होत्याच इतक्या खत्री की गिनीज बुकमध्ये त्याची नोंद करण्यात आली. तसं पाहिलं तर जगभरात रोजच चोऱ्या होतात, मर्डर पडतात आणि बरच काही काही होतं. तर या काही विशेष चोऱ्या म्हणा किंवा दरोडे म्हणा यांनी त्या त्या देशात तुफ्फान दहशत माजवली होती.

आता यात पहिली मोठी लूट होती ती म्हणजे द ग्रेट ट्रेन रॉबरी. 1963 साली ही द ग्रेट ट्रेन रॉबरीची भरपूर हाईप झाली होती. ब्रूश रेनॉल्ड्स आणि त्याच्या गँगने रॉयल मेल ट्रेनमधून 2.6 मिलियन पाउंडची चोरी केली होती. इतके पैसे पाहून चक्कर यायला बसली. मग ही केस भरपूर गाजली पण नंतर काही दिवसांनी या घटनेतले सगळे आरोपी पकडले गेले पण आजही ही चोरी सगळ्यात जास्त लोकप्रिय आणि चर्चेत राहिलेली मानली जाते. हा दरोडा इतका मोठा होता आणि एकदम वाढीव पद्धतीने याचा प्लॅन रचण्यात आलेला होता म्हणून पुढे यावर सिनेमा देखील बनवण्यात आला.

चोरी मारी करण्यासाठी एकमेव लोकप्रिय असणारं ठिकाण त्याकाळी असायची बँक. मग अशीच एक चोरी झाली ती उत्तर आयर्लंडच्या बेलफास्टमधे. यात नॉर्दन बँकेच्या मुख्यालयातून 26. 5 मिलियन पाऊंडची नगदी लूट झाली आणि जगभरातून निषेध आणि हल्लकल्लोळ माजला. यात दरोडेखोरांनी बँकेच्या एका महत्वाच्या अधिकाऱ्याच्या घरच्यांना कैद केलं आणि धमकी रुपाने एव्हढी रक्कम उकळली.

Damber रॉबरी ही अमेरिकेतली सगळ्यात जबरदस्त चोरी मानली जाते आणि या आधी अमेरिकेत इतकी मोठी चोरी कधी झाली नव्हती. बँक कर्मचाऱ्यानेच आपल्या बँकेला गुलिगत धोका दिला आणि कॅश व्हॅनमधून 18 मिलियन डॉलर लुटून नेले. म्हणजे थोडक्यात काय तर आपल्यांनी आपल्यांचे लावले रस्ते.

इराणी बँक लूट. बँकेत जाऊन थेट धमकी देऊन पैसा मिळवता येतो हे तंत्र तेव्हा प्रगतच होतं, कारण कोण इतके कष्ट घेणार आणि रात्री उठून चोरीला जाणार त्यामुळं दरोडेखोर एकदम वाढीव प्लॅन करायचे आणि थेट बँक गाठून बँकेचं लॉकर साफ करायचे. तेव्हा अमेरिकेने इराकवर हल्ला चढवला नव्हता. सद्दाम हुसेनचा एक मुलगा चिठ्ठी घेऊन इराणी बँकेत पोहचला आणि फक्त पाचच मिनिटांत त्याच्यापुढे पैशाने काठोकाठ भरलेला ट्रक आला आणि तो तिथून निसटला. अजूनही या पैशांच पुढे काय झालं याचा पत्ता नाहीये.

सेंट्रल लॉकर रॉबरी , ब्राझील.

ही चोरी रहस्यमय घटना मानली जाते कारण दिवसाढवळ्या पाच कंटेनर मधून शहरातून पैसा लुटण्यात आला आणि हे पाचही कंटेनर शहरातून बाहेर गेले आणि नंतर याचा पुढे काहीही थांगपत्ता लागलेला नाही.
कार्लटन हॉटेल ज्वेलरी लूट. हा दरोडा जगातला सगळ्यात मोठा ज्वेलरी दरोडा मानला जातो. यात 30 मिलियन डॉलरचे दागिने लुटून नेण्यात आले होते आणि ही घटना गिनीज बुकमध्ये नोंद करण्यात आली होती.

युके बाँड रॉबरी, बेरुत बँक लूट, द ग्रेट डायमंड रॉबरी या सगळ्या जगाला हादरवून टाकणाऱ्या चोऱ्या होत्या. काहींवर सिनेमे बनले तर काहींवर वेबसिरीज बनल्या. काही चोऱ्या तर अजूनही उलगडलेल्या नाही, हे पैसे कुठे वापरले गेले याचाही काही पत्ता नाही. पण या सगळ्या चोऱ्या इतिहासात अजरामर झाल्या आणि गिनीज बुकमध्ये नोंदसुद्धा झाल्या हे ही काही कमी नाही….

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.