बेरोजगारीवर उपाय: फक्त लाईनमध्ये उभं राहून हा भिडू लाखोंनी पैसे छापतोय

सुशिक्षित तरुण नोकरीच्या शोधात बेकारीचा ढोल पिटून देशाच्या व्यवस्थेला दोष देताना दिसतात, पण व्यवस्थेपेक्षा आपलीच जास्त चूक आहे हे ते विसरतात. समजा सध्याच्या काळात बेरोजगारीची समस्या आहे, पण त्याने आपल्या महत्त्वाकांक्षेमध्ये थोडासा बदल केला तर तो स्वत:साठी उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार करू शकतो. याचं उदाहरण देणारा आजचा एक भिडू आहे. म्हणजे टेन्शन फ्री काम काय असतं, निवांतपणे काम करायचं आणि रोकड हातावर घ्यायची. ना कुठली पळापळ ना कशाची धावपळ मेंटॉस जिंदगी एकदम. तर पाहूया कोण आहे हा लाईन स्टँडर.

असेच एक जिवंत उदाहरण म्हणजे न्यूयॉर्कचा ‘रॉबर्ट सॅम्युअल’, ज्याने आपल्या अनोख्या विचारसरणीने कमाईचा एक अनोखा मार्ग शोधून काढला आणि रॉबर्टने फक्त रांगेत उभे राहून एका आठवड्यात सुमारे 70,000 रुपये कमवून लोकांना आश्चर्यचकित केले. होगी डॉलर में अपनी कमाईया….सेम तसा वाला झोन या रॉबर्ट सॅम्युअलचा आहे. म्हणजे फक्त लाईनमध्ये उभं राहण्याचे पैसे मिळतात हे सुद्धा एक मोठं आश्चर्यचं आहे. पण मग हे प्रकरण सुरू कसं झालं की लाईनीत उभं रहा आणि पैसे मिळवा, आपण तर नोटबंदीच्या काळात हा प्रकार चांगलाच अनुभूवला होता.

ही त्यावेळची गोष्ट आहे, साल 2012 होतं, जेव्हा आयफोन 5 बाजारात येणार होता आणि काही कारणास्तव रॉबर्टला त्याची सेल्समनची नोकरी गमवावी लागली तेव्हा त्याने अमेरिकेतील एका पेपरमध्ये जाहिरात दिली होती की

“100 डॉलर्स रांगेत उभे राहण्यासाठी. तुमच्यासाठी एक मुलगा, जो तुमच्या जागी रांगेत उभा राहील आणि तुम्हाला रांगेत उभे राहून उगाच गर्दीचा रेटा सहन करण्याची गरज नाही. “

वाचायला अस्ताव्यस्त वाटणारी ही जाहिरात छापली गेली आणि काही तास वाट पाहिल्यानंतर सॅम्युअलला फोन आला ज्यामध्ये त्याला ग्राहकाऐवजी आयफोन खरेदी करणाऱ्याच्या रांगेत थांबावे लागले.

तो रांगेत उभा राहिला पण थोड्या वेळाने ग्राहकाने ऑर्डर रद्द केली पण चांगली गोष्ट म्हणजे ऑर्डर रद्द करूनही त्या ग्राहकाने सॅम्युअलला $100 दिले आणि लाईनमध्ये उभे राहून सॅम्युअलने पुन्हा टिव्ह जागा दुसऱ्या ग्राहकाला दिली.ते ही विकत आणि तेच चक्र चालू राहिले. सॅम्युअल रांगेत थांबायचा आणि काही डॉलर्समध्ये उभे राहण्यासाठी त्याची जागा दुसऱ्याला विकायचा. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत रॉबर्टने सुमारे 22,000 रुपये कमावले होते. रॉबर्टला त्याच्या उत्पन्नाचा स्रोत सापडला होता. व्यस्त लोकांच्या जागी रांगेत उभे राहणे, रॉबर्टचा व्यवसाय चालू होता.

हळुहळू अनेक तरुण त्याच्याशी जोडले गेले आणि रॉबर्टने ‘सॅम ओले लाइन ड्यूड्स’ नावाची एक कंपनी उघडली, जी कधी चित्रपटाच्या तिकिटांसाठी किंवा कधी कधी चित्रपटाच्या तिकिटांसाठी रांगेत उभे राहून पैसे कमावते तट कधी थेट शोच्या तिकिटासाठी सुद्धा लाईन मध्ये उभं राहते. सॅम्युअल 1 तास रांगेत उभे राहण्यासाठी $100 आणि त्यानंतर प्रत्येक तासासाठी $25 आकारतो. खरे तर लाईन सिटर्स देणारा रॉबर्ट आपल्या नव्या विचारसरणीमुळे बेरोजगारीबद्दल ओरड करणाऱ्यांसाठी एक उदाहरण आहे.

लाईन मारत बोंबलत फिरण्यापेक्षा लाईनमध्ये उभं राहून पैसे कमवता येऊ शकतात हेच रॉबर्ट सॅम्युअलने सांगितले आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.