आलिशान घड्याळ्यांची रोलेक्स कंपनी 90 टक्के नफा हा चॅरिटी करते ?

घड्याळांची आवड असलेला एक वेगळा चाहता वर्ग आपल्याला पाहायला मिळतो. ( राजकारणाचा विषय नाहीए बरं हा…! ओरिजिनल घड्याळाबद्दल बोलतोय आपण ) लग्नातलं घड्याळ असो किंवा मनगटी घड्याळ असो ज्याच्या त्याच्या पॅटर्नचे जो तो फॅन. त्यातही तरुण पोरांमध्ये भांडणं होत असतात की कोणत्या कंपनीचं घड्याळ एकदम बाप आहे. फास्टट्रॅक आणि रोलेक्स मध्ये कायम ही ठिणगी पडत असते व रोलेक्स हे श्रीमंत लोकांची ओळख आणि रिच पर्सनॅलिटी असणाऱ्या लोकांना जाम आवडतं म्हणून कायम आघाडीवर असतं.

तर घड्याळाचा विषय आहे रोलेक्सचा. रोलेक्स कंपनी बद्दल बोलायचं झालं की एक मुद्दा तापला होता तो म्हणजे रोलेक्सचा मालक हा अनाथ असल्या कारणाने रोलेक्स कंपनी ही त्यांच्या एकूण कमाईतील 90 टक्के नफा हा चॅरिटीसाठी देतात. आता हा एकदम साधा विषय होता व बऱ्याच लोकांचा यावर आक्षेप होता की जर 90 टक्के चॅरिटी होत असेल तर रोलेक्स घड्याळाचा सोडून अजून दुसरा कुठला व्यापार करते का ? असे अनेक प्रश्न उभे राहिले.

खरंतर हा कॉमन प्रश्न आहे की खरंच रोलेक्सचा मालक अनाथ आहे का ? इतकी संपत्ती ते दान करतात का ?
तर यावर नाही असंच उत्तर आलं. गुगलवर सुद्धा या गोष्टीला नकार देण्यात आला होता अर्थात हे पब्लिक वोट देऊन कार्यक्रम झाला होता.

रोलेक्स हे हॅन्स विल्सडोर्फ फाउंडेशनच्या मालकीचं आहे. तेही खास चॅरिटीसाठी पण ते टॅक्स देणं पूर्णपणे टाळतात त्यामुळे अनेकजण म्हणतात की 90 टक्के नफा देणं खुद्द रोलेक्सलाच परवडणारं नाही म्हणून रोलेक्सनेच याचे पुरावे देण्याचं नाकारलं आहे.

रोलेक्सचा मालक हॅन्स विल्सडोर्फ हा वय 12 वर्षे असताना त्याचे आईवडिल वारले आणि तो अनाथ झाला. त्याच्या काकांनी त्याला बोर्डिंग मध्ये भरती केलं. तिथं गणित आणि नवीन भाषेची गोडी हॅन्सला लागली. शिक्षण मधेच सोडून तो जगाच्या सफरीवर निघाला. शाळेच्या दिवसात त्याने स्विस वॉच मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जॉईन केली होती. काही दिवस तिथं काम केल्यानंतर त्याने स्वतःची घड्याळांची कंपनी सुरू केली. सावत्र भावाच्या मदतीने त्याने रोलेक्स उभारली आणि आज रॉलेक्सला मार्केटमध्ये काय डिमांड आहे हे आपण जाणतोच.

काही पोस्ट तर अशा होत्या की त्यावर लिहिलेलं आहे की रोलेक्स ही ना नफा ना तोटा या तत्वावर चालत असल्याने यातील 90 टक्के फायदा हा चॅरिटीला दिला जातो. रोलेक्स चॅरिटी करते पण तेही गुप्तपणे असंही काहींच म्हणणं आहे. पण 90 टक्के इतकी चॅरिटी करणं कंपनीला परवडणारं नसल्याचं सांगितलं जातं. मालक अनाथ असल्याने रोलेक्स चॅरिटी करेल पण तीही इतकी यावर अजूनही वाद सुरूच आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.