शरद पवारांचे सासरे सदाशिव शिंदे यांच्या नावाने क्रिकेटमध्ये असाही एक अचाट विक्रम आहे

सदाशिव शिंदे म्हणल्यानंतर जून्या माणसांना ओळख पटेल. राजकारणात विशेष करुन शरद पवारांबद्दल बऱ्यापैकी माहिती असणाऱ्या माणसांना सदाशिव शिंदे म्हणजे शरद पवारांचे सासरे हे माहित असेल,

पण त्यांचा एक अचाट विक्रम मात्र सहसा कुणाच्या ऐकण्यात नसणार हे मात्र नक्की. 

सदाशिव गणपतराव शिंदे हे १९४६ ते ५२ या काळात भारतासाठी क्रिकेट खेळले. या काळात वनडे सारखा प्रकार नव्हता. तेव्हा टेस्ट मॅच खेळल्या जात. एकूण सहा वर्षांच्या काळात त्यांनी भारतासाठी सात टेस्ट मॅच खेळल्या तर ७९ फर्स्ट क्लास क्रिकेट मॅचेस खेळल्या. 

आत्ता क्रिकेटमधला दूसरा मुद्दा तो म्हणजे एव्हरेजचा. ज्याचा एव्हरेज जास्त तो भारी खेळाडू अस सांगण्यात येत. एखादा खेळाडू जेव्हा रिटायर होतो तेव्हा त्याचं एव्हरेज सांगूनच त्यांच करियर किती महत्वाचं होतं ते सांगण्यात येत. आत्ता हे एव्हरेज काढण्याची पद्धतीचा एकमेव तोटा असाय ही जो कमी मॅच खेळला त्याच्या एव्हरेजवरून तो भारी होता अस म्हणणं चूकीचं असतं. 

असो, तर सदाशिव शिंदे यांच्या नावावर असा कोणता विक्रम आहे, जो आजवर फक्त एकाच क्रिकेटरच्या म्हणजे सदाशिव शिंदेच्या नावावर आहे हा आपला मुख्य मुद्दा आहे.

सदाशिव शिंदे हे भारताचे एकमेव क्रिकेटर आहेत ज्याचं एव्हरेज एक हायएस्ट स्कोेअरपेक्षा जास्त आहे. 

सदाशिव शिंदे क्रिकेटविश्वात चर्चेत आले ते त्यांच्या १८६ रन्सच्या इनिंगमुळे. १९४३-४४ साली झालेल्या बॉम्बे विरुद्ध महाराष्ट्र या सामन्या दरम्यान महाराष्ट्राकडून खेळताना त्यांनी १८६ रन्स काढून पाच विकेट घेण्याचा करिश्मा केला होता. पण झालं अस की त्याच सिरीजमध्ये विजय मर्चंट यांनी नॉटआऊट ३६९ रन्स काढल्या होत्या. त्यामुळे शिंदेपेक्षा जास्त हवा विजय मर्चंट यांची झाली होती. 

नंतरच्या काळात म्हणजे १९४६ साली त्यांची इंग्लंडच्या टूरसाठी भारतीय संघात निवड झाली. त्या टूरमध्ये त्यांनी एकूण ३९ विकेट्स घेतल्या. पण हे सामने फर्स्ट क्लासचे होते. त्यामुळे त्यांच रेकॉर्ड टेस्ट मॅचेससाठी धरण्यात आलं नाही. 

मात्र लॉर्ड्स वर झालेल्या टेस्ट क्रिकेट मॅचमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला. रूसी मोदी सोबत शेवटच्या विकेटसाठी त्यांनी ४३ रन्सची पार्टनरशीप केली आणि ते चर्चेत आले. 

त्यानंतर मात्र पुढील पाच वर्षामध्ये ते एकच टेस्ट मॅच खेळू शकले. १९५१-५२ साली दिल्लीत झालेल्या टेस्ट मॅचमध्ये त्यांना बॉलिंगचा चान्स मिळाला. ही मॅच इंग्लडच्या विरोधात होती. मैदानात उतरताच त्यांनी जॅक रॉबर्टसन आणि डॉनल्ड यांची विकेट घेतली. आठ ओवरमध्ये त्यांनी फक्त सोळा रन्स दिल्या आणि तीन विकेट घेतल्या. त्यांच्यामुळेच इंग्लडच्या टिमला फक्त २०३ इतका स्कोर करता आला. या सिरीजमध्ये शिंदे यांनी सहा विकेट घेतल्या होत्या. 

झालं अस की,

शिंदेंच्या कामगिरीमुळे भारताने पहिल्या डावात आघाडी घेतली होती.  पण शिंदे यांच्यामुळेच भारताला पराभवाचा सामना करावा लागला. शिंदे यांच्या फिल्डिंगमुळे भारत सात वेळा विकेट घेता घेता चुकला. तरिही पहिल्या डावातील पराक्रम पाहून शिंदेंना १९५२ सालच्या इंग्लंड टूरमध्ये जागा मिळाली. 

सुभाष गुप्ते यांच्या जागेवर सदाशिव शिंदे यांची निवड करण्यात आली होती. या टूरमध्ये शिंदेंनी एकूण ३९ विकेट घेतल्या होत्या. लीड्स टेस्टमध्ये त्यांनी पीटरची विकेट घेतली होती. मात्र ही टेस्ट मॅच त्यांची शेवटची टेस्ट मॅच ठरली. संपुर्ण सिरीजच्या सात टेस्ट मॅचमध्ये त्यांनी १२ विकेट घेतल्या तर ८५ रन्स काढल्या. या टेस्ट मॅचनंतर त्यांचा हायएस्ट स्कोर १४ आणि एव्हरेज १४.१६ इतकं राहिलं. 

महाराष्ट्र, बॉम्बे आणि बडोदा साठी ते खेळत राहिले. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांनी एकूण २३० विकेट घेतल्या. २२ जून १९५५ रोजी त्यांचा मृत्यू झाला. 

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.