लग्नाच्या बोलणीपासून ते जुही चावलाचं करियर सावरण्यात कुरकुरे ब्रँडचा सिंहाचा वाटा होता…..

आता थोडा फ्लॅशबॅक सीन क्रिएट करू की रविवार आहे, सोफ्यावर सगळे बसले आहेत. आता रविवार म्हणल्यावर भारत पाकिस्तान मॅच आलीच, टेबलवर मस्त कडक अदरक घालून चहा आहे. आता इथ थोडं चेंज आहे चहासोबत खायला खरी किंवा बटर नाही तर चटपटीत कुरकुरे आहे. सागा कुरकुरे म्हणजे विषय खोल. सगळ्या भारतात मोठ्या खपाची विक्री सागा कुरकुरेची आहे आणि अजूनही त्याचं जोमात सुरू आहे. बर आता इतका मोठा सीन तयार केलाय म्हणल्यावर काहीतरी ब्रँड असेलच की नाही भया..तर जाणून घेऊया कुरकुरेच योगदान आणि हा लग्नाच्या बोलणी पासून ते जुही चावलाचं करियर मेन फ्लो मध्ये आणण्यात कुरकुरेच मोठं योगदान आहे त्यामुळे नुसतं खायचं काम नका करत जाऊ जरा इतिहास सुद्धा माहिती ठेवत जा.

वाफाळत्या चहाला एक ब्रँड जोडीदार होता कुरकुरे. ज्याने कुटुंबाची चव बदलू दिली नाही. 90 च्या दशकातील लोकांना कल्पना असेलच की कुरकुरे काय ब्रँड होता. पोरं फक्त या कुरकुर्यासाठी मार खाताना पाहिलीय आपण.तर याची सुरवात कशी झाली तर 90 च्या दशकात पेप्सिको lehr या ब्रॅण्डने snack आयटम बाजारात उतरवायला सुरवात केली. चिवडा, चकल्या पासून चखणा काय काय लागतो याची सगळी सोय पेप्सिकोने केली होती. अनिश मोटवानी यांच्या मार्गदर्शनाखाली हा ब्रँड लोकांमध्ये लोकप्रिय होत होता. 

तरीही म्हणावी तशी लोकप्रियता मिळत नव्हती. लोकांच्या घराघरात हे snack पोहचत होते आणि त्याची चव जिभेवर रेंगाळत ठेवत होते. माऊथ पब्लिसिटी हे एक उत्तम पर्याय ठरू शकत हे मोटवानी यांना माहिती होतं त्यातूनच नवनवीन tag लाईनचं यंत्र त्यांना सापडलं.

1996 साली पेप्सिको लॉन्च झाल आणि पुढच्या तीन वर्षातच कुरकुरे सागा आला म्हणजे 1999 साली. आता कुरकुरे सागा लॉन्च झाला तेव्हा त्याला tagline होती की क्या करे कंट्रोल ही नहीं होता….ही कॅची लाईन मार्केटमध्ये जोरदार चालली. या tagline मुळे सागा कुरकुरे जाहिरात क्षेत्रात उतरलं आणि इथेही बाप ठरलं. घरगुती मसाले वापरून हे कुरकुरे तयार केले जायचे आणि त्याची चव लोकांना आवडायची. छोटी मुलं सोडाच पण ज्येष्ठ लोकं सुद्धा दणकून यावर ताव मारायची. त्यात असलेला क्रंचीनेस आणि तोंडात विरघळत जाणारी त्याची चव लोकांना बेफाम आवडली. पुढे पेप्सिको गायब झाला आणि कुरकुरे सागा ब्रँड म्हणून उदयास आला.

2001 साली कुरकुरे ब्रँड सेपरेट मोठा होऊ लागला. 2000 उजाडलं होतं आणि जागतिकीकरण वेगाने फोफावत होतं. स्नॅक्स इंडस्ट्रीत नवनवीन ब्रँड जन्म घेत होते भलेही ते थोडा काळ असायचे पण गर्दी करून भाव खाऊन जाण्याची जुनी सवय इतर ब्रँड्सला घातकी ठरायची. मग कुरकुरेने एक मार्ग शोधला तो म्हणजे सेलिब्रिटी लोकांना ब्रँड जाहिरातीसाठी वापरायचं.

आजच्या काळात हिरो लोकं क्रिकेट खेळताना दिसतात आणि क्रिकेटर लोकं जाहिराती करताना दिसतात असो…

तर त्यावेळी 90 च्या दशकातली ड्रीम गर्ल होती जुही चावला. कुरकुरेने अचूकपणे तिला हेरत आपल्या ब्रँडला मोठं केलं. आता जुही चावलाने हा ब्रँड खरचं चांगला चालवला. टेढा है पर मेरा है म्हणत जुही चावला भाव खाऊन गेली. टीव्ही शो मध्ये सुद्धा कुरकुरे हात अजमावू लागली.

सिरीयल मध्ये डायलॉग होता की इस कहाणी मे कुरकुरे होने चाहिए. जस्सी जैसी कोई नहीं, सांस भी कभी बहू थी, अनारकली या सीरिअलमधे डायलॉग असायचे की इस कहाणी मे ट्विस्ट नही कुरकुरे होने चाहिए…

सिनेमा पाहायचा असू दे किंवा चहा प्यायचा असू दे, लग्नाची तारीख ठरवायची असु दे कुरकुरे कंपल्सरी होतं. ब्रँड इतका मोठा झाला की जुही चावलाने जेव्हा सिनेमातून काढता पाय घेतला तेव्हा तिला कुरकुरेने सावरलं होतं. ब्रँड इज ब्रँड म्हणत्यात ते उगीच नाही…

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.