चारचौघात ऑन्टी म्हणून हाक मारल्यावर या पोरगीनं हे करुन दाखवलं.

करायचं करायचं म्हणून राहणारी एकमेव जागतिक गोष्ट म्हणजे जीम. आज जावू उद्या जावू करत आपण स्थितप्रज्ञ राहतो. आजूबाजूला कितीही बदल झाले तरी आपण मात्र तसेच. मग कधीतरी कोणीतरी काका-आंन्टी म्हणून हाक मारते. मारली तर मारली आपल्याला काय म्हणून आपण पुन्हा शांत बसतो.

आपल्यात कोणी भांडखोर असला तर तिथेच अंकल-आंन्टी म्हणणाऱ्याला चारपाच शब्द सुनावतो. पण जीम वगैरे लावणं काही शक्य होत नाही. असो सगळेच असे नसतात. काहीजण मिस्टर आणि मीस परफेक्ट कॅटेगरीत येणारे देखील असतात.

हि गोष्ट अशाच एका मीस ची.

आत्तापर्यन्त तुमच्या लक्षात आलच असेल की आज ती सुपर डुपरच्या वरती दिसते. लाखो पोरं तिचे फोटो इन्टाग्रामला शेअर करत असतात. लाखों पोरी तिचे यु ट्यूबवरचे व्हिडीओ पाहून सल्ले घेत असतात. तिच नाव सपना व्यास पटेल. गुजरातची पोरगी.

झालं अस की ती १९ वर्षांची असताना खूप जाड होती. इतक्या कमी वयात पोरगी ३० एक वर्षांच्या मुलीसारखी दिसायची. त्यावेळी ती तिच्या छोट्या भाचीसोबत एका आयस्क्रिमच्या दूकानात गेली. तिथे दोघांनी पोटभरून आयस्क्रिम  खाल्ले. तरिही पोट भरलं नाही म्हणून अजून खाल्ले. त्या आयस्क्रिमच्या दूकानात एक मुलगा होता. त्याने सपना व्यास पटेलशी काही बोलण्याएवजी त्या लहान भाचीचा लाड करण्यास सुरवात केली. इतक्यावर प्रकरण मिटलं असलं तरी आजचा दिवस सपनाच्या आयुष्यात आला नसता.

पण झालं अस की तो मुलगा जाता जाता सपना नको ते बोलून गेलाच. तो मुलगा तिला म्हणाला, 

आन्टी तूमची मुलगी गोड आहे.

ऑन्टी…!!!! 

Screenshot 2019 07 03 at 8.16.18 PM

बर इतक्यावरच थांबला नाही तर ५ वर्षाच्या भाच्चीला चक्क तिची मुलगी करुन टाकलं. याच ठिकाणी जगभरातल्या संतूर मॉम देखील कोसळून गेल्या असतील. असो. तर हा अपमान पचवता येण्यासारखा नव्हताच. तिने अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला.

अन्नत्याग म्हणजे छोटी गोष्ट नव्हती. कारण तिचं अन्नच इतकं मोठ्ठ होतं. बर्गर, पिझ्झा, पाणीपुरी असलं सगळं सोडायचा निर्णय घेण्यात आला. तिने फिटनेस जीम जॉइन केली. जन्मठेप झालेला कैदी जेलमध्ये वर्षभर राबून चांगल्या वर्तनाखाली बाहेर वर्षाभरात बाहेर पडावा अस तिच झालं. बिचारीने जे कष्ट घेतलं ते तुमच्या समोर आहेच. तीने एका वर्षात तब्बल तेहतीस (तीसावर तीन) किलो वजन कमी केलं.

Screenshot 2019 07 03 at 8.16.08 PM

आज सपना व्यास पटेल आघाडीची मॉडेल आहे. जगभरात तिचे लाखोंचे चाहते आहे. पण त्याहून अधिक म्हणजे ती आज सेलिब्रिटी फिटनेस कोच आहे. सोशलमिडीयावर तिथे याच वर्षाभरातले फोटो अपलोड केले होते. तिच्यातला बदल लोकांनी पाहिला आणि लोक तिच्या फॅनक्लबमध्ये सामील झाले.

आज तिच्या इन्साग्रामला 1.8 M इतके फॉलोअर्स आहे. यू ट्यूबवर तिचे लाखोत चाहते आहेत. त्यावरुन ती डायटिंगचे फुकट सल्ले देत असते. तिला वेगवेगळ्या कार्यक्रमांची सुपारी मिळते. आत्ता काही निर्मात्यांनी तिला संपर्क केला आहे म्हणे. ती सिनेमा साईन करणार आहे का त्याची पक्की माहिती नसली तरी या मार्गाने ति काही दिवसात महेश भट्ट अथवा करण जोहरच्या फिल्ममध्ये दिसेल देखील. 

Screenshot 2019 07 03 at 8.15.51 PM

असो, सपना व्यास पटेल सारखाच सर्वांनी अपमानातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करावा अशी बोलभिडूची इच्छा. बाकी सौंदर्य हे आतंर्मनात असते यावर आमचा विश्वास आहे. सौदर्यांची खरी व्याख्या तिच. तरिही इन्स्टाग्रामवर फोटो बघायला काय जातय.

हे तिच इन्स्टाग्राम अकाऊंट : सपना व्यास इन्स्टा

हा तिचा यु ट्यूब चॅनेल : https://www.youtube.com/user/SapnaVyasPatel

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.