भारतातल्या या गावाचा पॅटर्नच वेगळाय, इथं गायीला बसायला गादी देतात

भारतीय लोकांचा गाई हा खूपच हळवा विषय आहे. म्हणूनच तर त्यांच्या कत्तली झाल्या तर मोठया दंगली झाल्याचे भारताच्या इतिहासाने बघितलं आहे आणि अजूनही बघत आहे. मात्र, मागच्या काही वर्षात राजसत्तेची मते बदलली असून त्यांच्या मार्फतही संगोपनाचे काम सुरु झाले आहे. 

 विदर्भात एक असे गाव असून त्या गावात गायीला बसायला चक्क गादी देण्यात येते. या गावात गाईचे मंदिर सुद्धा असून येथे दूरवरून लोक दर्शनाला येतात. गाईचा मृत्यू झाल्यानंतर मंदिरा शेजारीच तिची समाधी बांधली जाते. सतराव्या शतकापासून या गावात गायींची पूजा करण्यात येते. प्रत्येक घरात गाईची प्रतिमा लावण्याची प्रथा आहे.  

तर गाईला बसायला गादी देणार, तिचे मंदिर बांधणाऱ्या गावा बद्दलची हि गोष्ट 

गाईंची पूजा सर्व गावात केली जाते. मात्र यागावात गाईंबद्दल एक वेगळीच आस्था आहे. तर हि गोष्ट आहे अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील’सार्शी या गावाची. सतराव्या शतकापासून या गावात गायीची पूजा करण्यात येते. ती परंपरा अखंडितपणे आजही सुरु आहे. 

१७ व्या शतकाच्या दरम्यान सार्शी गावात एक गाय आली होती. 

ती गाय गावातील एका वडाच्या झाडा खाली थांबली होती. पुढे, तिथेच वास्तव्य करणाऱ्या या गाईचा वंश वाढत गेल्याचे सांगण्यात येते. आता गावात असणाऱ्या गायी या १७ व्या शतकात गावात आलेल्या गायीचे वंशज असल्याचे ग्रामस्थ सांगतात. 

त्या गाय पासून झालेल्या वंशज गावातच फिरतात आणि सर्व ग्रामस्थ त्यांची काळजी घेतात. गावात मध्यभागी पार्वती माता संस्थान तर्फे गायीचे मंदिर बांधले गेले आहे. 

 दीड हजार लोकसंख्या असणाऱ्या या गावात प्रत्येकाच्या घरात इतर देवीदेवतांप्रमाणे गायीची प्रतिमा लावण्याची प्रथा आहे. तर दरवर्षी पौष पौर्णिमेला मंदिरात गायीची पुण्यतीथी साजरी करण्याची पद्धत आहे. यावेळी भागवत सप्ताह असे विविध कार्यक्रम होत असतात. 

या कार्यक्रमांना संपूर्ण जिल्ह्यातील श्रद्धाळू येतात. 

एक गायीपासून सुरु झालेला हा प्रवास १० व्या वंशजा पर्यंत येऊन पोहचला आहे. यातील ६ गायींचा मृत्यू झाला इतर गायी जिवंत आहेत. मृत्यू झालेल्या गायींची समाधी मंदीच्या शेजारी असणाऱ्या जागेत बांधण्यात आली आहे. 

या वंशातील जिवंत असणाऱ्या गायींना गावात विशेष वागणूक देण्यात येते. गावात गेल्यानंतर या गायींना बसायला गादी दिली जाते. गावात प्रत्येक घरी या गायींची पूजा करण्यात येते. इतर ठिकाणावरून दर्शनासाठी आलेले भाविक या गायींसाठी गादीचे आसन दान करतात.

 सार्सी गावात मोकाट, भटक्या जनावरांना कत्तलीसाठी नेण्यास बंदी आहे. त्यासाठी गोशाळाही बांधण्यात आली आहे. या गोशाळेत असणाऱ्या गाईंना चारा पाण्याची व्यवस्था नागरिक मोठ्या श्रद्धेने करतात.  

गावाची ओळख आता ‘गायीची सार्सी’ अशीच झाली आहे.  

 दोन वर्षापूर्वी सार्सी या गावात गाईच्या पुण्यतिथी निम्मित एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या होत्या, आपल्यामधील जे नकारात्मक विचार आहेत ते गाईच्या दर्शनामुळे, गायीच्या पाठीवरून हात फिरवल्याने विसरुन जातो. हा चमत्कार आहे. हे सर्व आपल्या संस्कृतीमध्ये सांगितले आहे.”   

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.