पैशांच्या श्रीमंतीत जगात आठ नंबर तर मनाच्या श्रीमंतीत जगात एक नंबरला असणारा राजा.
आपल्या देशात अनेक संस्थाने आहेत तसेच त्यांचे अनेक राजे देखील होऊन गेले. या पैकी काही राजांची नावे मात्र इतिहासात कायम स्वरूपी अजरामर झाले. युद्धात पराक्रम गाजवतो तोच श्रेष्ठ राजा असतो असे नाही तर अनेकदा आपल्या रयतेला सुखाचे आयुष्य भेटावे या साठी झटणारी काही विचारांनी आणि मनानी श्रीमंत असणारी माणस श्रेष्ठ असतात.
असेच एक बडोदा घराण्याचे राजे श्रीमंत सयाजीराव गायकवाड.
आपल्या कर्तुत्वाने आणि कार्याने या माणसाने जागतिक पातळीवर आपले नाव कोरले आहे. थेट आग्रा ते दिल्ली आणि कन्याकुमारी ते महाराष्ट्र अशा अखंड भारतात ज्या व्यक्तीच्या कार्याचा विस्तार होता असे हे राजे. संपत्तीने श्रीमंत असणारी बरीच माणसे आपल्या देशात घडलीत पण या संपत्तीचा स्वताच्या रयते साठी उपयोग करणाऱ्या काही मोजक्या राजांनी पैकी एक म्हणजे सयाजीराव गायकवाड.
मानवी मुल्याची जपणूक करत, कलाकर, साहित्यिक, शैक्षणिक संस्था, स्त्रियांचे स्वातंत्र्य, पोरोगामी विचारांचे आचरण, लोकहितदक्षता आणि आदी अनेक क्षेत्रात त्यांच्या कार्याचा ठसा होता. अशा या बहुयामी माणसाच्या निवडक गोष्टी सांगणे हे कसब अशक्य असेच आहे पण तरी देखील,
त्यांच्या या कार्याचा लेखाजोखा मांडणाऱ्या काही निवडक गोष्टी.
भारतातील ग्रॅंथालय चळवळीचे पितामह म्हणून सयाजीराव गायकवाडांचा उल्लेख करण्यात येतो. मराठीतील ८७० ग्रॅंथ प्रकाशनात लेखक, प्रकाशकांना मदत केल्यांची नोंद इतिहासात आहे.
बालगंधर्व, रवीकुमार, अब्दुल करीम खॉं, दादासाहेब फाळके यांच्यासारख्या अनेक कलावंतास सयाजीरावांनी मदत केली. जात, पात, धर्म यांचा विचार न करता सयाजीराव गायकवाडांकडून कलावंताना मदत करण्यात येत होती.
राईट बंधूंच्या अगोदर पुणे येथील संस्कृत पंडित श्री. शिवकर बापूजी तळपदे या संस्कृत पंडिताने एप्रिल १८९५ साली जगातील पहिला विमानउड्डाण प्रयोग केला. या प्रयोगास महाराजांचीच मदत केली होती.
इ.स १८८५ साली स्त्रीशिक्षणाची सुरुवात केली. महिलांसाठी व्यायामशाळा काढल्या. इ.स. १९०७ साली बडोद्यात ‘धारा सभा’ अर्थात राज्य विधिमंडळाची स्थापना केली. या सभेचा एक सदस्य मागास वर्गाचा प्रतिनिधी असेल अशी तरतूद केली. डॉ. भीमराव आंबेडकरांची प्रतिनिधी म्हणून नेमणूक करून नवा आदर्श निर्माण केला.
शिक्षण विभागात स्वतंत्र भाषांतर विभाग सुरु केला. हा भारतातील पहिला प्रयत्न.
भारतातील पहिला विधवा स्त्रीबरोबर मुलींना, बहिणींना, माहेरच्या मिळकतीत वाटा मिळेल असा केला तो सयाजीरावांनीच.
महाराजा सयाजीराव बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे कुलपती होते. पंडित मदन मोहन मालवीय उपकुलगुरू होते. अमेरिकेतील दुसरी जागतिक सर्वधर्म परिषद शिकागोचे महाराजा सयाजीराव अध्यक्ष होते.
विसाव्या शतकाच्या सुरवातीस महाराजा सयाजीराव हे जगातील आठव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. श्रीमंतीत प्रथम क्रमांक फोर्ड यांच नाव होतं.
सयाजीराव गायकवाडांचा उल्लेख ६४ वर्ष राज्य करणारे हिंदूस्तानातील एकमेव राजे म्हणून केला जातो.
हे ही वाचा.
- दिल्ली दरबारात सयाजीराव महाराजांनी पंचम जॉर्जचा अपमान केला होता.
- सर्वगुणसंपन्न महाराज सरफोजीराजे भोसले.
- भारतातील पहिला हॉमिओपॅथीचा सार्वजनिक दवाखाना शाहू महाराजांमुळे सुरू झाला.
I read word to word of “BolBhidu”
This is praiseworthy program for the youth of Maharashtra
Regards
Why not given bharat ratna to sayaji maharaj?
Khupach chaan mahiti dilit ya mule nakkich mahan vyktibddl aslele agyan dur hoil, ashyach goshti ani arthpurn mahiti baki raje ani aytihasik vytinbddl lihave. Pudil vatchalisathi page la shubhecha