महामारी पसरु नये म्हणून लाखभर लोक या बेटावर नेली आणि जिवंत जाळली…!

जगाच्या कानाकोपऱ्यात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाआम्हाला ठाऊक नाहीत. जग रहस्यमय ठिकाण आणि गोष्टींनी भरलेले आहे. ज्याचे रहस्य मानव असो वा शास्त्रज्ञ कुणीच सोडवू शकलेलं नाही. अनेक गावे, अनेक शहरे, अनेक इमारती आणि अशी अनेक बेटे आहेत, जी रहस्यांनी भरलेली आहेत.

रहस्य म्हणल्यावर लोकांची पहिली उडी असते की थांब, मी जाऊन बघतो, मला लय कळतं, तू मागे थांब पण आजचा किस्साचं इतका डेंजर आहे ना भिडू की हे रहस्य वाचून तुसुद्धा हिंमत करायचा नाही कधी कुठल्या रहस्यात डोकं घालायला.

विषय रहस्यमय गोष्टींचा निघालाय तर या रहस्यमय बेटांपैकी एक बेट आहे याबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, जिथे गेला तो परत आलाच नाही. इथं असं काय घडलं ते आम्ही तुम्हाला सांगतो की येथे कोणीही जिवंत राहिले नाही. 

भिडू कन्फ्युज व्हायचा विषय नाही, डिटेलमध्ये विषय मांडलाय.

काही काही सरकार इतके गंभीर निर्णय घेतात आणि त्याची घातकता इतकी भयंकर असते की नागरिक गेले चुलीत आधी निर्णय घेउ दे या धाटणीचा प्रकार असतो. लॉकडाऊन मध्ये सुद्धा सेम होतं की खाण्यापिण्याचे वांदे झालेत आणि घरात बसायला सांगत होत.

बरं आपलं सोडा मूळ मुद्द्यावर येऊ. विषय बेटाचा होता. या बेटाचे नाव पोवेग्लिया बेट आहे. जे व्हेनिस आणि इटलीमधील लिडो दरम्यान व्हेनेशियन खाडीत आहे.

खरं तर, अनेक वर्षांपूर्वी इटलीमध्ये प्लेगची महामारी आली होती. या प्लेगच्या साथीनं दिवसेंदिवस गंभीरता धारण केली होती. परिस्थिती गंभीर होत चालली होती. त्यामुळे येथील सरकार चिंतेत पडले होते. 

या आजाराच्या प्रसाराची ही चिंता कमी करण्यासाठी सरकारने या बेटावर राहणाऱ्या सुमारे 1 लाख 60 हजार लोकांना जिवंत जाळण्याचे आदेश दिले. 

फक्त आदेशच नाय दिले तर अंमलबजावणी सुद्धा झाली आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर मानवी जीवहानी झाली. 1 लाख 60 हजार लोकं जिवंत जाळणे म्हणजे जोक वाटला का काय तुम्हाला, कल्पना सुद्धा करवत नाही इतकं भयानक हे दृश्य होतं.

या भयानक निर्णयानंतर आणि जीवितहानीनंतर सरकारने मृत लोकांना या बेटावर दफन करण्याचे आदेश दिले. तेव्हापासून येथील स्थानिक रहिवासी या बेटाला शापित मानतात. जाळलेल्यांचे आत्मे आजही इथे भटकतात, अशी त्यांची श्रद्धा आहे.

इतरांनी बेटावर आत्मे पाहण्याचा आणि विचित्र आवाज ऐकण्याचा दावाही केला आहे. म्हणजे असेही डेंजर प्रकार व्हायला लागले. आपल्या इथं जसं छोटं भूतसुद्धा गावाला काबूत आणत आणि आपली दहशत बसवतं तशातला हा प्रकार होऊ लागला.

या महामारीनंतर येथे काळा ताप नावाचा आजार पसरला. 

या सततच्या साथीचे गूढ उकलण्यासाठी शास्त्रज्ञांनी खूप प्रयत्न केले, पण त्यांना यश आले नाही. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथे जो जातो तो जिवंत परत येत नाही. आता एवढी मोठी घटना घडल्यावर सगळ्यांनीच धसका घेतला होता यामुळे, इटली सरकारने या बेटावर पर्यटकांना बंदी घातली आहे. हे बेट जगातील सर्वात भीतीदायक ठिकाणांपैकी एक आहे.

आपल्यापैकी अनेकांनी महामारीच्या या साथीत लोकं मरताना बघितली असेल पण इटलीमध्ये हा भयानक प्रकार अंगावर काटे आणणारा होता, एकत्र एक लाख सात हजार लोकं त्या बेटावर नेऊन जाळून टाकणे तेही महामारी थांबावी म्हणून जगभरातून याला मूर्खपणा म्हणून ट्रोल केलं गेलं तर देशातल्या धोरणी लोकांनी हा महत्वाचा निर्णय मानला. हे बेट आता शापित बेट म्हणून ओळखलं जातं.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.