माजी विद्यार्थ्याने निनावी बॉक्स पाठवला आणि त्यात होते १.५ कोटी रुपये….

आजच्या काळात पैशाशिवाय काम होत नाही, पैसा म्हणजे सगळं काही अशा अनेक चर्चा आपण ऐकत असतो. कोणाला पैशाची गरज नाही? प्रत्येकाला मेहनतीपेक्षा जास्त पैसा मिळवायचा असतो. अशा स्थितीत दीड कोटी रुपये कोणीही मालक नसताना पडून असतील तर ते कोण ते पैसे हातातून जाऊ देईल ? पण अमेरिकेत 1.5 करोडचा कॅशने भरलेला बॉक्स वर्षभर मालकाविना राहिला पण कोणीही त्याची दखल घेतली नाही. आता एवढे पैसे पाहूनच एखाद्याला आकडी यायला बसली. थेट पैसा ही पैसा होगा वाला हेराफेरीवाला सीन. आपण आता जरा डिटेलमध्ये हे प्रकरण बघू की1.5 कोटी रुपये आणि त्याला मालक नाही.

सगळ्यात आधी हा पैशाने भरलेला बॉक्स मिळाला तो एका भारतीय प्राध्यापकाला. सुमारे एक वर्षानंतर, अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील सिटी कॉलेजचे प्राध्यापक डॉ. विनोद मेनन यांना हा बॉक्स सापडला. आपल्या कार्यालयातील रोकड भरलेली ती पेटी पाहून तेही थक्क झाले. या बॉक्समध्ये $180,000 पेक्षा जास्त म्हणजेच 1 कोटी 36 लाख रुपये रोख भरले होते. वास्तविक, याच महाविद्यालयातील एका माजी विद्यार्थ्याने भरलेली रोकड येथेच टाकून दिली होती. एकेकाळी या महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या एका निनावी व्यक्तीने रोख रकमेसह एक पत्र ठेवले होते, त्यात त्यांनी महाविद्यालयात इतकी रोकड ठेवण्याचे कारण दिले आहे. यासोबतच ही रक्कम कोणाला पाठवली हेही त्यांनी पत्रात सांगितले आहे.

एका माजी विद्यार्थ्याने पैसे पाठवले होते. ‘डेली मेल’च्या वृत्तानुसार, प्रोफेसर विनोद मेनन यांना गेल्या महिन्यात त्यांच्या कार्यालयात रोखीने भरलेली ही पेटी सापडली होती. सुमारे 1.5 कोटी रुपयांच्या रोखीने भरलेला हा बॉक्स नोव्हेंबर 2020 मध्ये प्राध्यापकांच्या कार्यालयात आला होता. कोरोनाच्या संकटामुळे कॉलेज बंद पडल्याने हा बॉक्स कोणाच्याच नजरेत आला नाही. कोट्यवधी रुपयांनी भरलेली ही पेटी आपल्या कार्यालयात बेवारस पडून असल्याचे पाहून प्राध्यापक मेनन यांनाही आश्चर्य वाटले.

या बॉक्समध्ये प्रोफेसर विनोद यांना एक पत्र मिळाले, ज्यामध्ये असे सांगण्यात आले की, ज्या व्यक्तीने हा बॉक्स कॉलेजच्या पत्त्यावर पाठवला होता तो या कॉलेजचा विद्यार्थी होता आणि त्याने विनोद मेनन यांच्याकडून शिक्षण घेतले होते.

गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी पैसे पाठवले

या चिठ्ठीवर त्यांनी या महाविद्यालयातून उत्कृष्ट शिक्षण घेतले असून इतर विद्यार्थ्यांनीही या महाविद्यालयातून चांगले शिक्षण घ्यावे, अशी त्यांची इच्छा असल्याचे या चिठ्ठीवर लिहिले होते. यामुळेच त्यांनी ही रक्कम महाविद्यालयाला देणगी म्हणून पाठवली होती.

बॉक्स पाठवणाऱ्या विद्यार्थ्याने सिटी कॉलेजमधून फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्समध्ये बॅचलर डिग्री, नंतर फिजिक्समध्ये एमए आणि त्यानंतर फिजिक्समध्ये डबल पीएचडी केली असल्याचं सांगण्यात येत आहे. रोख भरलेली पेटी पाठवणाऱ्या विद्यार्थ्याने पत्रात नमूद केले आहे की, आपण पाठवलेली रक्कम कनिष्ठ आणि वरिष्ठ विद्यार्थ्यांच्या भौतिकशास्त्र आणि गणिताच्या अभ्यासासाठी वापरण्यात यावी. आर्थिक अडचणींमुळे जे विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नाहीत, त्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी ही रक्कम पाठवली आहे.

जगभरातून या व्हायरल घटनेचं कौतुक होत आहे आणि शैक्षणिक क्षेत्रात तर या घटनेला दुर्मिळ घटना सांगण्यात येतंय. एका माजी विद्यार्थ्याने इतके पैसे पाठवणे तेही आर्थिक कुवत नसलेल्या मुलांच्या शिक्षणासाठी हेच खरं कौतुकास्पद आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.