क्राईम सिरीयल बघून या गड्याने स्वतःच्याच आईवडिलांचा मर्डर केला होता…

जानेवारी 2017 मध्ये उघडकीस आलेल्या आकांक्षा खून प्रकरणाने राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवून सोडले. दररोज नवनवीन खुलासे होत होते ज्यामुळे देशवासीयांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता. या सिरीयल किलरने आपल्याच घरातील पहिल्या मजल्यावरील खोलीत प्लॅटफॉर्म बनवून आपल्या मैत्रिणीचा अंत्यसंस्कार केला होता. तपासाची सूत्र फिरली आणि नंतर उघड झाले की त्याने फक्त गर्लफ्रेंडचं नव्हे तर आपल्या आई-वडिलांचीही हत्या करून रायपूरमधील एका घरात त्यांना पुरले होते.

या सगळ्याच्या मागे सीरियल किलर उदयन दास जगभर प्रसिद्ध झाला. त्याला इंग्रजीतील क्राईम सीरियल पाहण्याची सवय होती. या मालिकेतूनच त्याला हे करण्याची कल्पना सुचली. पश्चिम बंगालच्या बांकुरा न्यायालयाने एका प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

भोपाळच्या उदयन दासची बाकुरा येथे राहणाऱ्या आकांक्षासोबत सोशल मीडियावर मैत्री होती, त्यानंतर त्याने तिला जाळ्यात अडकवलं होतं. आकांक्षा त्याच्या प्रेमात पडली आणि 24 जून 2016 रोजी तिचा मित्र उदयन दास तिला अमेरिकेत नोकरी मिळवून देतो असे तिच्या पालकांना सांगितल्यानंतर ती भोपाळला आली. आकांक्षा घरून लॅपटॉप, मोबाईल, बँक पासबुक, आधार कार्ड, मतदार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स घेऊन आली होती.

एका इंग्रजी चित्रपटातून त्याला ही कल्पना सुचली

उदयनदास हुशार झाला होता. एका इंग्रजी चित्रपटातील क्राईम सिरियल पाहिल्यानंतर त्याला ही कल्पना सुचली. त्याला क्राईम सिरियल्स पाहण्याची आवड होती. बेकिंग डेथ या मालिकेतून त्याला ही कल्पना सुचली. त्याने आधी आकांक्षाचा गळा दाबून खून केल्याचे सांगितले, त्यानंतर मृतदेह दुसऱ्या खोलीत नेऊन जुन्या रिकाम्या पेटीत टाकला. तासाभरानंतर त्याने सिमेंटचे मट्रेल भरले.

यानंतर त्या संपूर्ण डब्याला सिमेंट ब्लॉक बनवण्यात आले. त्यासाठी त्याने 14 पोती सिमेंटचा वापर केला. भोपाळच्या शक्तीनगरमध्ये आकांक्षा उदयनच्या घरी पोहोचली आणि इथे पोहोचल्यावर तिची फसवणूक झाल्याचे तिला समजले. आकांक्षाने उदयनवर फसवणूक केल्याचा आरोप केल्यावर तो भांडू लागला आणि याच गोष्टीवरून दोघांमध्ये भांडण झाले. महिनाभर चाललेल्या भांडणानंतर 23 जुलै 2016 रोजी उदयनने आकांक्षा शर्माची गळा आवळून हत्या केली.

उदयन इतका हुशार होता की तो तिच्या आई-वडिलांशी चॅटिंगच्या माध्यमातून बोलत असे. त्यानंतर 5 ऑक्टोबर 2016 रोजी तो बांकुरा रवींद्र सरणी येथे आकांक्षाच्या घरी गेला, तिथे त्याने आकांक्षाच्या आई-वडिलांना सांगितले की ती अमेरिकेला जात आहे. त्यांना अमेरिकेला जायचे असेल तर तो त्याची व्यवस्था करेल. उदयन 8 ऑक्टोबरला भोपाळला पोहोचला. यानंतर आकांक्षाचा तिच्या पालकांशी संपर्क तुटला.

पण ह्या उदयनने अजून एक कांड बऱ्याच दिवस आधी केलं होतं ते म्हणजे स्वतःच्याच आईवडिलांची हत्या.

आई-वडिलांना रायपूरच्या घरी दफन करण्यात आलेल्या
उदयनच्या कृत्यांचे पदर हळूहळू उघडू लागल्यावर रोज धक्कादायक खुलासे होऊ लागले. रायपूरमधील एका घरात त्याने आपल्याच आई-वडिलांची हत्या केली आणि त्यांना त्यांच्या आवारात पुरले. त्यानंतर त्यानी घर विकले. अनेक वर्षांनी हे प्रकरण उघडल्यावर ते घर खोदण्यात आले. उत्खननात त्याच्या आई-वडिलांच्या मृतदेहाचे फक्त अवशेष सापडले.

सायको किलर उदयन दास याला पश्चिम बंगालच्या बांकुरा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 23 जुलै 2016 रोजी प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह स्वत:च्या घरातील पहिल्या मजल्यावरील खोलीतील एका बॉक्समध्ये टाकून त्यावर प्लॅटफॉर्म बांधला होता. जानेवारी 2017 मध्ये हे प्रकरण उघडकीस आले. बांकुरा येथील जलदगती न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुरेश विश्वकर्मा यांनी आरोपीला खून आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

यासोबतच 20 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. याशिवाय त्याने आपल्याच आई-वडिलांची हत्या करून रायपूरमध्ये जमिनीत गाडले होते आणि घर विकून तो भोपाळला आला होता. अनेक वर्षांनंतर, रायपूरच्या घरातून फक्त त्याच्या आई-वडिलांचे अवशेष मिळू शकले. विकृत असलेल्या उदयन दासने केलेलं कांड सगळ्या देशाला हादरवून टाकणार होतं.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.