टायरच्या खुणांमुळं २०० महिलांना मारणारा ‘सिरियल किलर’ घावला होता…

सीरियल किलर मिखाईल पॉपकोव्ह ह्याची केस जगभर प्रसिद्ध आहे पण नेमकं तो खरंच सिरीयल किलर होता का कि त्याने जाणूनबुजून हा प्रकार घडवून आणला याबद्दल आपण जाणून घेऊया. मिखाईल पॉपकोव्हने पोलिसांच्या चौकशीत आपण महिलांची हत्या करून कोणताही गुन्हा केला नसल्याची कबुली दिली होती. त्याने आयुष्यात ज्या 200 स्त्रिया आणि मुली मारल्या त्या समाजाची आणि त्याच्या शहराची घाण होती असं त्याचं वैयक्तिक मत होतं.

ही खरी पण भीतीदायक कथा आजपासून सुमारे 30 वर्षांपूर्वी सुरू झाली होती. 1990 च्या सुरुवातीस. अलीकडे, या कथेतील सर्वात धोकादायक आणि एकमेव पात्र असलेल्या सीरियल किलरचे नाव आता पुन्हा चर्चेत आले आहे.

कारण 57 वर्षांच्या या विक्षिप्त सीरियल किलरला म्हणजे मिखाईल पॉपकोव्हला न्यायालयाने दोन जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. म्हणजे माणसाच्या रुपात लांडग्यासारखी कृत्ये करणाऱ्या या व्यक्तीला आता तुरुंगातच आयुष्याचा शेवटचा श्वास घ्यावा लागणार आहे.

निकाल सुनावताना न्यायाधीशांनी या खतरनाक गुन्हेगाराची मानवी रूपातील लांडग्याशीही तुलना केली आहे. वयाच्या ५७ व्या वर्षी रक्तरंजित मानसिकतेच्या माणसाने आपल्या गावाच्या हद्दीत २०० महिला आणि मुलींची हत्या केली, हे पाहून न्यायालय आणि संबंधित प्रकरणांचा तपास करणारे पोलीस अचंबित झाले.

समाजातील कुणालाही याची माहिती मिळाली नाही. हा भयानक सीरियल किलर पेशाने पोलिस होता. 57 वर्षीय मिखाईलला दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्यापासून हे प्रकरण चर्चेत आले आहे. ज्या खुनांमध्ये मिखाईलला दोन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे, ती सर्व प्रकरणे मुली आणि महिलांच्या हत्यांशी संबंधित आहेत.

काही काळापूर्वी 22 खुनाच्या गुन्ह्यात या सिरीयल किलर माजी पोलीस कर्मचाऱ्याला एकाच वेळी दोन जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती, अटकेनंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने 1990 ते 2010 या कालावधीत सुमारे 200 खून पाडले होते. त्याने मुली आणि महिलांची हत्या केल्याची कबुली दिली होती.

मात्र 22 प्रकरणांव्यतिरिक्त सर्व खुनांशी संबंधित पुरावे गोळा करणे पोलिसांना अवघड झाले. त्यामुळे तपास यंत्रणेने सिद्ध केलेल्या 22 खुनाच्या प्रकरणात न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मिखाईलला शिक्षा सुनावताना न्यायालयातील न्यायाधीशांनी ‘तो मानवी रूपातील लांडगा आहे’, अशी टिप्पणी केली.

गुन्हेगार 200 खून हा गुन्हा मानत नाही….

सीरियल किलर मिखाईल पॉपकोव्ह याने पोलिसांच्या चौकशीत महिलांची हत्या करून कोणताही गुन्हा केला नसल्याची कबुली दिली होती. पण त्याने आयुष्यात ज्या 200 स्त्रिया आणि मुली मारल्या त्या समाजाची आणि त्याच्या शहराची घाण होती. त्यामुळेच या सर्वांना मारून त्यांनी शहर स्वच्छ ठेवण्याचे काम केले आहे. प्रत्येक पीडितेची हत्या केल्यानंतर आरोपी त्याचा मृतदेह जंगलात फेकून देत असे असं त्याचं मत आहे.

रशियाच्या अंगारस्क शहरातील आरोपी मिखाईल हा एकापाठोपाठ एक 200 खून करण्याच्या या घटना आपल्या गावी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. महिलांच्या शोधात तो शहरातील क्लब आणि बार हाऊसमध्ये फिरत असे. त्यानंतर पीडितेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तो गाडीत बसत असे.

त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तो तिची हत्या करायचा.

या रक्तरंजित बदमाशाची माहिती कोणालाच नव्हती. कदाचित लोकांच्या नजरेत तो रशियन पोलिसांचा कर्मचारी होता. अशा विक्षिप्त सिरीयल किलरच्या पकडीची देखील मनोरंजक कथा आहे. मिखाईलने खून केलेल्या मुलीच्या मृतदेहाजवळ पोलिसांना कारच्या टायरच्या खुणा आढळल्या होत्या. त्या टायरच्या खुणा जुळल्यावर ते मिखाईलच्या गाडीचे टायर असल्याचे समोर आले. पोलिसांनी सरळ सरळ त्याला अटक केली.

पोलिसी खाक्या दाखवताच समोर आलं की त्याने 200 महिलांचा खून केला होता. सगळ्या शहराला हादरवून टाकणारी ही बातमी होती. आता मात्र जन्मठेप मिळाल्यावर लोकांनी सुटकेचा निःश्वास टाकलेला आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.