शाहरुखला बॉलिवूडचा किंग बनवणारा ‘ स्वदेस ‘ एका सिरियलवरून प्रेरित होता…

शाहरुख खान म्हणल्यावर रोमान्स किंग ,बादशहा अशी आभूषणं ल्यालेला हिरो समोर येतो. त्याने बॉलिवूडमध्ये आणलेला रोमान्स ट्रेंड अजून तरी कोणाला मोडणं जमलेला नाही. पण शाहरुख खानच्या मोजक्या एकदम लख्ख आठवणीत राहणाऱ्या सिनेमांपैकी एक म्हणजे स्वदेस. या सिनेमाने बॉलिवुडमध्ये स्पेशल सिनेमांचा ट्रेंड आणला. शाहरुखच्या कारकिर्दीतील एक सगळ्यात महत्वाचा सिनेमा म्हणून स्वदेसची ओळख आहे. पण हा सिनेमा खरंतर प्रेरित होता एका सिरीयल वरून हे बऱ्याच जणांना माहिती नसेल आणि त्या सिरियलमध्ये खुद्द आशुतोष गोवारीकर हिरो होते तर जाऊन घेऊया या घटनेबद्दल.

ये जो देस है तेरा… स्वदेस है तेरा… तुझे है पुकारा…

ए आर रहमानच्या सुरात आणि आवाजात हे गाणं आपल्याला घरची आठवण करून देते. आपण कुठेही असलो तरी या गाण्यातही आपल्याला ‘स्वदेस’ या चित्रपटातील मोहन या मुख्य व्यक्तिरेखेचाच अनुभव येतो. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित या चित्रपटाला १७ वर्षे पूर्ण झाली. या चित्रपटात शाहरुख खान आणि गायत्री जोशी मुख्य भूमिकेत दिसले होते. 17 वर्ष उलटूनही शाहरुख लोकांच्या मनात घर करून बसलेला आहे हे सिनेमा आणि आशुतोष गोवारीकर यांचं मोठं यश म्हणावं लागेल. रेहमानच्या संगीताबद्दल तर विषयचं नाही.

या चित्रपटात शाहरुख खानने नासाचे शास्त्रज्ञ मोहन भार्गव यांची भूमिका साकारली होती. मोहन आपल्या दाईला भेटण्यासाठी भारतात परत येतो आणि त्याच्या बालपणीच्या मैत्रिणीच्या प्रेमात पडतो. बरेच सीन या चित्रपटातले ठळकपणे लक्षात राहतात. मकरंद देशपांडे यांच्यां सोबतच कैलास खेर आणि उदित नारायण ,रहमान यांनी गायलेलं गाणं युही चला चल राही ,युही चला चल राही, कितनी हसीन है ए दुनिया,,,, हे गाणं आजही अनेक ट्रॅव्हल करणाऱ्या भिडूंच्या स्टोरी, स्टेट्सला वाजताना दिसतं. कर्णमधून संगीत आणि परिस्थितीला अचूकपणे फिट्ट बसणारी गाणी म्हणजे रेहमान.

बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने काही खास कमाई केली नाही, मात्र प्रेक्षकांच्या मनात घर करण्यात या चित्रपटाने यश मिळवले. स्वदेशचा तो सूर आजही प्रत्येकाला घरातील मातीची आठवण करून देतो. आपल्या देशाप्रती असलेली ओढ काय असते, आपल्या मातीची ओढ आणि मायेचा ओलावा परफेक्टपणे दाखवलेला आहे. सिनेमा तेव्हा काय चालला नाही नंतर मात्र लोकांच्या मनात धुडगूस आणि काहूर या सिनेमाने माजवलं.

पण बऱ्याच लोकांना माहिती नसेल स्वदेस 90 च्या दशकातील एका मालिकेच्या कथेपासून प्रेरित होता. ही मालिका झी टीव्हीवर दाखवण्यात आली होती. लव्ह स्टोरीज या वाहिनीवर एक कार्यक्रम असायचा, ज्यामध्ये अनेक छोट्या कथा दाखवल्या जायच्या. या शोमध्ये एक कथा होती, ‘वापसी’. या एपिसोडमध्ये दस्तुरखुद्द आशुतोष गोवारीकर यांनी एनआरआय मोहनची भूमिका साकारली आहे जो कावेरी अम्मा यांना भेटण्यासाठी परततो. जेव्हा तो परततो तेव्हा त्याची त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशी भेट होते.

मोहन गीताच्या प्रेमात पडतो. आणि पुढे बरेच हृदयद्रावक सीन्स घडतात. ही सिरियल तेव्हाही मोठ्या प्रमाणात सुपरहिट झाली होती. कावेरी अम्माची भूमिका किशोरी बल्लाळ यांनी केली होती. स्वदेश हा चित्रपट अरविंदा पिल्लमरी आणि रवी कुचीमांची यांच्या जीवनावर आधारित आहे. अरविंद आणि रवी देशात परतले आणि त्यांनी पेडल पॉवर जनरेटर बांधले. स्वदेश हा चित्रपट आजही आपल्या सर्वांच्या हृदयाच्या जवळ आहे. शाहरुख खान मात्र या चित्रपटातुन खऱ्या अर्थाने बादशहा बनला.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.