ही १३ मिनटांची शॉर्टफिल्म पहा, फरक पडेल..

भारतीय न्यायालयात १,००,००० पेक्षा जास्त बलात्काराच्या केसेस अजून पेंडिंग आहेत.

भारतात रोज सुमारे ९० बलात्काराचे गुन्हे दाखल होतात.

भारतात बलात्काराच्या आरोपात अटक असलेल्या आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण ३२ % पेक्षा कमी आहे.

फेसबुक ची फीड असेल किंवा टीव्ही स्क्रीन असेल, रोज अशी आकडेवारी आपल्या डोळ्यासमोर येत असते आणि आपणदेखील अजून एक ‘बातमी’ म्हणून वाचून फीड स्क्रोल करतो किंवा चॅनेल बदलतो. २

मार्च ला रिलीज झालेली, प्रियांका बॅनर्जीने डायरेक्ट केलेली  ‘देवी’ शॉर्टफिल्म बघा,

पुन्हा कधी तुमचं बलात्काराच्या गुन्ह्याकडे दुर्लक्ष करायचं धाडस होणार नाही.

स्टोरी टेलिंग चे एक प्रभावी माध्यम म्हणून जगभरात शॉर्ट फिल्म्स बनवल्या जातात. कमीत कमी वेळात एखाद्या गोष्टीचा जास्त परिणाम आपल्याला शॉर्ट फिल्म्स मधून दिसून येत असतो.

बलात्कार हा विषय ‘देवी’ मध्ये अशाप्रकारे हाताळला आहे कि या फिल्मची १३ मिनिटे तुम्हाला अस्वस्थ करतील, हे कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात लांब १३ मिनिट असतील.

एका घरात एकमेकांसोबत राहणाऱ्या काही व्यक्ती; वेगवेगळ्या धर्माच्या , वेगवेगळ्या वयाच्या, वेगवेगळ्या सामाजिक परिस्थितीतून आलेल्या, वेगवेगळ्या स्वभावाच्या पण या सर्वांच्यात साम्य एकच आहे या सर्व ‘स्त्रिया’ आहेत. स्त्रियांना देवी मानणाऱ्या आपल्या देशात हि ‘देवीचं’ सुरक्षित नाही; मग ती कोणत्याही वयाची असो, गरीब असो किंवा श्रीमंत असो.

दुर्दैव हे आहे कि, आपल्याकडे ‘बलात्काराचे’ देखील राजकारण केले जाते;

बलात्कार कोणावर झाला किंवा बलात्कार कोणी केला हा देखील आपल्या देशात राजकारणाचा मुद्दा ठरतो पण आपण एक महत्वाची गोष्ट विसरतो ती म्हणजे कोणावरही झाला असला, कोणीही केला असला तरी बलात्कार झाला आहे आणि त्याचे खूप भयानक परिणाम ती पीडित व्यक्ती भोगत आहे.

‘देवी’ आपल्याला याच पीडितांची कथा सांगते.

आधी म्हणल्याप्रमाणे, शॉर्ट फिल्म्स च काम असत कि कमी वेळेत जास्त परिणाम करायचा. हा परिणाम पाडण्यात प्रियांका बॅनर्जी एवढी यशस्वी झाली आहे कि, फिल्मच्या क्लायमॅक्स ला तुमच्या पोटात पडणारा खड्डा बराच वेळ तसाच टिकून राहतो.

  • महेश जाधव

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.