मध्यप्रदेशपर्यन्त दुचाकीवरून तस्करांचा पाठलाग करणाऱ्या त्यांना नालायक वृत्तीने संपवलं

मेळघाट व्याघ्र प्रकल्पतील हरीसाल रेंजच्या RFO दिपाली चव्हाण यांनी आत्महत्या केल्याची बातमी आली. त्यांच्या आत्महत्येची बातमी यासाठी धक्कादायक आहे की त्या काही साध्यासुध्या व्यक्ती नव्हत्या. एखाद्या गोष्टीची भिती खाणे, मागे फिरणे असा त्यांचा स्वभाव नव्हता.

वय वर्ष फक्त २८ असणाऱ्या त्या लेडी सिंघम म्हणून प्रसिद्ध होत्या. एकदा तर डिंक तस्कर रेल्वेतून मध्यप्रदेशात पळून गेल्यानंतर त्यांचा पाठलाग त्यांनी दुचाकीवरून केला होता.

अशी व्यक्ती आत्महत्या कशी काय करु शकते असा प्रश्नच त्यांच्या आत्महत्येनंतर नातलगांकडून विचारण्यात येवू लागला आहे. 

नेमकं प्रकरण काय आहे… 

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरीसाल रेंजच्या RFO दिपाली चव्हाण यांनी काल सायंकाळी ७ च्या सुमारास स्वत:च्या बंदुकीतून गोळ्या झाडून आत्महत्या केली. धारणी तालुक्यातील हरिसाल येथे व्याघ्र प्रकल्पाच्या शासकीय घरात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्या गर्भवती असल्याची माहिती देखील समोर आली. व त्यानंतर त्यांची सुसाईट नोट समोर आली. 

ही सुसाईट नोट त्यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अप्पर प्र.भु.व. संरक्षक तथा क्षेत्र संचालक यांना लिहली आहे. यामध्ये त्यांनी वरिष्ठांचा होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे सांगितले. 

या माहितीची आधारावर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे DFO विनोद शिवकुमार यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतलेलं आहे. सोबतच DFO शिवकुमार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी दिपाली चव्हाण यांचे पती राजेश मोहिते यांनी केली आहे. 

त्यांच्या पत्रातील खाली प्रमुख मुद्दे 

  • DOF सर इतक्या हलक्या कानांचे आहेत की त्यांनी कोणत्याही गोष्टीची खात्री न करता माझ्या नावाच्या नोटीसा काढणे सुरू केले. मला वारंवार निलंबित करण्याची व चार्जशिट दाखल करण्याची धमकी देवू लागले. 
  • नेहमी मला नियमबाह्य कामे करण्यास भाग पाडले 
  • अतिक्रमण काढायला गेल्यानंतर गावकरी माझ्यावर ॲट्रासिटी दाखल करणार आहेत ही माहिती त्यांना कळवल्यानंतर मे खुद SP को बोलकर तुमपर ॲट्रासिटी लगाता हू असे म्हणाले ते रेकॉर्डिंग माझ्या मोबाईल मध्ये आहे. खासदार नवनीत राणांना मॅडमना देखील ती रेकॉर्डिंग ऐकवली आहे.
  • नोकरी आपण परिवारासाठी करतो पण इथे 1 दिवसही परिवारासाठी देता येत नाही. 
  • स्टाफ समोर, गावकऱ्यांसमोर व मजुरांसमोर मला शिवीगाळ करतात 
  • माझ्या एकटेपणाचा त्यांनी फायदा घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या मर्जीने न वागल्याची शिवकुमार मला शिक्षा देत आहेत. 
  • मागील आठवड्यापासून ते वारंवार हरिसाल मध्ये येत आहेत व माझ्याशी खूप खराब खराब बोलतात तुम्ही CCTV कॅमेरे चेक करा. 
  • माझ्या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार विनोद शिवकुमार उपवनसंरक्षक गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा हेच आहेत. 

महिलांवरती कार्यालयीन कामकाजात अशा प्रकारचे अन्याय, अत्याचार होत असतील तर त्याची दाद कुठे मागता येते. 

हेल्पलाईन नंबर 

संकटात असणा-या महिलांना मदत करण्‍यासाठी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या पोलीस घटकांमध्‍ये टोल फ्रि हेल्‍पलाईन क्र.१०३ व उर्वरीत महाराष्‍ट्रासाठी टोल फ्रि हेल्‍पलाईन क्र. १०९१ सुरू करण्‍यात आली आहे.

कामाच्या ठिकाणी तक्रार कमिटी 

सर्वोच्च न्‍यायालय नवी दिल्‍ली यांच्‍या न्‍यायनिर्णयातील मार्गदर्शक तत्‍वे (विशाखा जजमेंट) विचारात घेऊन ४५ पोलीस घटकांच्‍या मुख्‍यालयात व राज्‍य गुन्‍हे अन्‍वेषण विभाग पुणे येथे या समित्‍या स्‍थापन करण्‍यात आल्‍या आहेत. महिला पोलीस अधिकारी/कर्मचारी व पोलीस कार्यालयात कार्यरत असणा-या मंत्रालयीन महिला कर्मचारी यांच्‍या कामाच्‍या ठिकाणी होणा-या लैंगीक छळाची प्रकरणे या समितीकडून हाताळण्‍यात येतात.

  महिला पोलीस कक्ष 

महाराष्‍ट्र राज्‍यामध्‍ये महिलाविरूध्‍द गुन्‍हयास प्रतिबंध करणे, गुन्‍हे उघडकीस आणणे व गुन्‍हयांचा तपास करणे इ. कामे संबंधीत पोलीस ठाण्‍याकडून केले जातात.

महिलाविरूध्‍द प्रकरणे हाताळण्‍यासाठी सर्व पोलीस ठाण्‍यामध्‍ये महिला पोलीस कक्षाची निर्मिती करण्‍याबाबत पोलीस महासंचालक महाराष्‍ट्र राज्‍य, यांनी परिपत्रक पारीत केले आहे. महिला पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस कर्मचारी यांची उपलब्‍धतेनुसार या कक्षामध्‍ये नेमणूक करण्‍यात आली आहे. एकूण ९७५ महिला पोलीस कक्ष स्‍थापन करण्‍यात आले आहेत.

WhatsApp Image 2021 03 26 at 1.57.23 PM

WhatsApp Image 2021 03 26 at 1.57.23 PM 1

WhatsApp Image 2021 03 26 at 1.57.24 PM

WhatsApp Image 2021 03 26 at 1.57.24 PM 1

1 Comment
  1. Krishna says

    The concerned bastard got selected through upsc forest service . How such dumb assess get selected ? He should be whipped in front of all . Justice should be done and that too instantly . Though he is in a position of authority what right does he have to mentally harass any individual ? He is no less than a terrorist. Because of him a noble soul left the world . A precedent should be set that no one in future will dare to act like this.

Leave A Reply

Your email address will not be published.