३७ वर्षांपूर्वीच्या हत्याकांडातील आरोपी सुकुमार केरळ पोलिसांना आजपर्यंत सापडलेला नाहीये…

केरळमधील सुकुमार कुरूप या महत्त्वाकांक्षी पण भरकटलेल्या तरुणाने ३७ वर्षांपूर्वी अत्यंत निर्दयीपणे हत्या केली होती आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हत्येला एवढी वर्षे उलटूनही कुरूप पोलिसांच्या हाती लागला नाही. 1984 मध्ये केरळमध्ये एक घटना घडली होती जीची उकल तर झाली होती पण त्याचा मास्टरमाइंड सुकुमार कुरूप आजपर्यंत पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही. या गुन्हेगाराला पकडण्यासाठी या प्रकरणाशी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी देशातील सर्व शहरे आणि अगदी अंदमान-निकोबार आणि देशाबाहेर भूतान आणि आखाती देशांपर्यंत शोध घेतला पण आता सुकुमार कुरुप हा केरळमध्ये एक दंतकथा बनला आहेत, त्यावर अनेक चित्रपटही बनले आहेत.

22 जानेवारी 1984 रोजी पहाटे 4 वाजता केरळच्या मावळिकारा पोलिस स्टेशनमध्ये, कोणीतरी कळवले की KLQ-7831 नंबर प्लेट असलेल्या अॅम्बेसेडर कारला शेतात आग लागली आहे. या अपघातात ड्रायव्हिंग सीटवर बसलेली व्यक्ती जिवंत जळाली. पोलिस आले तेव्हा प्रथमदर्शनी हा रस्ते अपघात वाटला होता. आग विझवताना मृताचे हात बांधलेले दिसले. शवविच्छेदनात मृताच्या श्वसनमार्गामध्ये धूर नसल्याचे निष्पन्न झाले, याचा अर्थ खून केल्यानंतर हे नाट्य रचले गेले. मृताच्या पोटातून अल्कोहोल आणि इथाइल अल्कोहोल सापडल्याने गूढ अधिकच वाढले.

घटनास्थळी उपस्थित काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, घटनेनंतर काही लोक दुसऱ्या कारमधून पळून जाताना दिसले. पेटलेल्या गाडीला पेट्रोलच्या वासाने वेढले होते आणि आसपास शेतात पायाचे ठसे, माचिस, चप्पलचा एक जोड, मानवी केसांनी भरलेले रबरी हातमोजे होते. लवकरच बातमी पसरली की मृत सुकुमार कुरूप हा चेरीयानाड येथील रहिवास सुमारे 30 वर्षांचा असून तो काही आठवड्यांपूर्वी आखाती देशातून आला होता. त्याचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले, त्याचा भाऊ भास्कर पिल्लई याने मृतदेहाच्या देखाव्याच्या आधारे दावा केला की हा त्याचा भाऊ होता जो आदल्या दिवशी एका कारने जवळच्या अंबालापुझा शहरात गेला होता.

विम्याच्या रकमेसाठी कट रचला
मृतदेह पुरण्यात याची खबरदारी घेऊन पोलिसांनी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. त्यानंतरच्या तपासात, पोलिसांना कळले की सुकुमार त्यावेळी जिवंत होता आणि जो मेला होता तो चाको नामक फिल्म रिप्रेझेंटेटर होता. हा सगळा कट सुकुमार, त्याचा भाऊ भास्कर आणि इतर दोन लोकांनी रचला होता जेणेकरून ते विम्यामधून मिळालेल्या पैशाने रातोरात श्रीमंत होऊ शकेल.

इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार, या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावणारे डेप्युटी एसपी हरिदास म्हणतात, ‘तपासानंतर सुकुमारचा भाऊ भास्कर पिल्लई, त्याचा ड्रायव्हर पोनप्पन यांना हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. साहू हा सहआरोपी पोलिसांचा साक्षीदार झाला. भास्कर आणि सुकुमार यांच्या पत्नींची पुराव्याअभावी सुटका करण्यात आली.

मुख्य आरोपी आणि मास्टर माइंड सुकुमार पिल्लई उर्फ ​​सुकुमार कुरूप हा सुरुवातीपासूनच दुष्ट मनाचा आणि तो डेंजर होता. बारावी उत्तीर्ण झाल्यावर तो हवाई दलात एअरमन म्हणून भरती झाला पण लवकरच कोणालाही कळवता नोकरी सोडल्यामुळे त्याला हवाई दलाने फरारी घोषित केले. त्यानंतर त्याने पोलिसांच्या विशेष शाखेतील एका हेड कॉन्स्टेबलला लाच देऊन त्याच्या मृत्यूचे खोटे प्रमाणपत्र बनवले आणि ते हवाई दलाकडे पाठवले जेणेकरून ‘फरारी’ म्हणून त्याच्याविरुद्धचा तपास बंद व्हावा. त्यानंतर त्यांनी आपले नाव सुकमार कुरूपवरून बदलून सुकुमार पिल्लई केले.

त्याचप्रमाणे सुकुमारने सरसंमा नावाच्या स्त्रीशी त्याच्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध मंदिरात लग्न केले. सुकुमार जेव्हा वायुसेनेत दाखल झाला तेव्हा सरसम्मा हिने मुंबईत नर्सिंग कोर्सला प्रवेश घेतला. आता वायुसेनेतून बाहेर पडल्यानंतर सुकुमार आखाती देश अबुधाबीमध्ये जाऊन एका कंपनीत काम करू लागला तर त्याची पत्नीही एका खासगी रुग्णालयात रुजू झाली आणि नर्स झाली.

या काळात सुकुमारचे आयुष्य सुखाचे होते. मित्रांना खाऊ-पिऊ घालण्यासाठी तो भरपूर पैसा खर्च करत असे. त्यांना तो उघडपणे मदतही करत असे. या काळात त्याच्या कार्यालयात काम करणारा साहू त्याचा आवडता सहकारी बनला होता. अबुधाबीहून परतल्यावर सुकुमार भारतात राहणाऱ्या आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांसाठी अनेक भेटवस्तू घेऊन यायचा. इथे येऊन मित्रांना भरपूर दारू पाजायचा.

हळुहळु त्याची राजेशाही राहणी त्यालाचं नडु लागली. त्याला जेव्हा पैशाची तंगी भासत होती तेव्हा तो गावात घर बांधत होता, त्यासाठी पैशांची गरज होती. दरम्यान, बातमी उडू लागली की अबुधाबीमधील त्यांची कंपनी जुन्या कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे आणि कमी पगारावर नवीन भरती करणार आहे. अशा परिस्थितीत त्याच्या मित्रांनी त्याला केरळमध्ये व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला दिला. पण या सगळ्यासाठी पैशांची गरज होती, तीही लवकरात लवकर.

अशा परिस्थितीत सुकुमारने एका इंग्रजी गुप्तहेर मासिकात एक कथा वाचली. नंतर त्याने या कथेला खऱ्या आयुष्याची ब्लू प्रिंट बनवायचे ठरवले. कल्पना अशी होती – एखाद्या व्यक्तीचे शरीर त्याच्या दिसण्यासारखेच दाखवून त्याचा मृत्यू झाला आहे, असे जाहीर करावे. यानंतर, विम्यामधून मिळालेल्या पैशातून काढावेत. सुकुमारने ही कल्पना साहूला सांगितल्यावर त्यानीही होकार दिला. यानंतर सुकुमारने त्याचा भाऊ भास्कर आणि ड्रायव्हर पोनप्पनचाही त्यात समावेश केला.

आता प्रश्न असा होता की सुकुमारसारखा दिसणारा मृतदेह कुठून आला? आधी त्याला वाटले की, बेवारस मृतदेह मेडिकल कॉलेजमधून मिळेल, पण नंतर जेव्हा ते अयशस्वी झाले, तेव्हा त्यांनी सुकुमार सारख्या व्यक्तीचा शोध सुरू केला आणि नंतर त्याला मारून त्याचा वापर केला.

योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी, 8000 रुपयांना सेकंड हँड अॅम्बेसेडर कार सुकुमारकडून खरेदी करण्यात आली. बरेच दिवस शोध घेतल्यानंतर 21-22 जानेवारी 1984 च्या रात्री चाको स्वतः त्याच्याकडे आला आणि अलप्पुझाला जाण्यासाठी लिफ्ट मागितली. घरी परतताना चाको सिनेमा हॉलमध्ये तिकीट विक्रीचे नियोजन करत होता. सुकुमार आणि त्याचे मित्र ही संधी शोधत होते.

वाटेत या लोकांनी चाकोला जबरदस्तीने इथाइल अल्कोहोल मिश्रित दारू पाजून बेशुद्ध केले, त्यानंतर त्याचा गळा दाबून खून केला. त्यानंतर कोणी ओळखू नये म्हणून त्याचा चेहरा व डोके आगीत जळून खाक झाले. त्यानंतर त्याची अंगठी, घड्याळ आणि कपडे काढून सुकुमारचे कपडे त्याला घातले. हा मृतदेह KLY-5959 क्रमांकाच्या कारच्या ट्रंकमध्ये ठेवून ते दुसऱ्या कारने थन्निमुक्कम परिसरातील भातशेतीत पोहोचले. येथे चाकोचा मृतदेह दुसऱ्या कारच्या ड्रायव्हिंग सीटवर ठेवून शेतात कार ढकलून दिली आणि त्यावर पेट्रोल शिंपडून कारला पेटवून दिले.

जर सुकुमार आता जिवंत असेल तर तो 74 वर्षांचा असेल

त्यानंतर जे घडले ते केरळच्या इतिहासातील सर्वात जास्त काळ फरार होण्याची घटना ठरली. पोलिस सुकुमारला अनेकवेळा पकडत राहिले पण पोलीस येण्यागोदरच तो काही तासांपूर्वीच घटनास्थळावरून पळून गेला असायचा. यादरम्यान त्याच्यावर उपचार करणारी एक नर्स म्हणते,

‘सुकुमार आता जिवंत असतील, अशी आशा फार कमी आहे, त्यांना गंभीर आजार होता. जिवंत असतील तरी आज ते ७४ वर्षांचे असतील.

1984 पासून सुकुमारवर चित्रपट बनत आहेत. अलीकडेच या घटनेवर आणखी एक चित्रपट बनवण्यात आला आहे, ज्यावर चाकोच्या मुलाने तो थांबवण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. चाकोच्या कुटुंबीयांनी आणि मुलाने सांगितले की, आपल्या वडिलांच्या मारेकऱ्याचा गौरव करणे योग्य नाही. नेटफ्लिक्सवर कुरूपने राडा घातलाय हे वेगळं सांगायला नकोच.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.