संकटांना भिऊन पळायचं नसतं तर थेट भिडायचं असतं याचा दाखला म्हणजे विवेकानंद यांचा हा किस्सा….

स्वामी विवेकानंद यांचं नाव अगदी जगभरात लोकांना माहिती आहे. ज्ञानाचे प्रगाढ पंडित आणि भारतीय लोकांचा स्वाभिमान म्हणून विवेकानंद यांच्यांकडे पाहिलं जातं. स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील अशी घटना त्या लोकांसाठी एक मोठा धडा आहे, जे अनेकदा समस्येपासून दूर पळण्याचा प्रयत्न करतात. आपल्या जीवनात प्रत्येकाला समस्यांना तोंड द्याव लागते. अशा काही वेळा येतात जेव्हा आपण संकटांपासून दूर जाण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न करतो. पण असा उपाय कधीच सापडत नाही.

आज जाणून घेऊया स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील असा एक किस्सा जो तुम्हाला सांगेल की तुम्ही जितके संकटांना घाबरून पळून जाल तितकेच ते तुमच्या मागे येईल.स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील अशी घटना त्या लोकांसाठी एक मोठा धडा आहे, जे अनेकदा समस्येपासून दूर पळण्याचा प्रयत्न करतात. आपल्या जीवनात प्रत्येकाला समस्यांना तोंड द्याव लागते. अशा काही वेळा येतात जेव्हा आपण संकटांपासून दूर जाण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न करतो. पण असा उपाय कधीच सापडत नाही. आज जाणून घेऊया स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील असा एक किस्सा जो तुम्हाला सांगेल की तुम्ही जितके संकटांना घाबरून पळून जाल तितकेच ते तुमच्या मागे येईल.

एकदा स्वामी विवेकानंद बनारसमधील माँ दुर्गाजींच्या मंदिरातून बाहेर पडत असताना तेथे उपस्थित असलेल्या अनेक माकडांनी त्यांना घेरले. त्यांच्याकडून प्रसाद हिसकावून त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. माकडं विवेकानंद याना सारखी हूल देत होती, वेडेवाकडे चाळे करून त्यांना हिणावत होती. माकडांमुळे स्वामीजी भयंकर घाबरले आणि स्वतःला वाचवण्यासाठी पळू लागले. पुढे स्वामीजी आणि त्यांच्या मागे बरीच माकडे पळू लागली.

एक साधू बराच वेळ हे सर्व पाहत होता. मग त्यांनी स्वामीजींना थांबवले आणि म्हणाले की घाबरू नका, त्यांना सामोरे जा. वृद्ध भिक्षूचे हे बोलणे ऐकून स्वामीजी लगेच मागे वळून माकडांकडे जाऊ लागले. त्याच्या आश्‍चर्याला सीमाच उरली नाही, जेव्हा त्यांनी तसे करताच सर्व माकडे पळून गेली. मग विवेकानंद यांनी या सल्ल्याबद्दल वृद्ध भिक्षूचे खूप आभार मानले.

स्वामी विवेकानंद यांना या घटनेतून शिकायला मिळाले की, जोपर्यंत आपण एखाद्या घटनेपासून किंवा संकटदायक गोष्टीपासून दूर पळतो तोपर्यंत ती आपल्या मागे येते आणि आपल्याला अधिक घाबरवते. पण त्याला तोंड देण्याची हिंमत वाढवली तर ती गोष्ट आपल्यापासून दूर जाते.

अनेक वर्षांनंतर स्वामी विवेकानंदांनीही या घटनेचा उल्लेख एका भाषणात केला आणि तरुणांना समजावून सांगितले की, जर तुम्हाला कधीही कोणत्याही समस्येची भीती वाटत असेल तर त्याकडे काळजीपूर्वक पहा आणि खंबीरपणे सामोरे जा. त्यानंतर तुम्हाला त्याचे समाधान नक्कीच मिळेल. समस्येपासून दूर पळणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे. जर तुम्हाला ते संपवायचे असेल तर तुम्हाला त्याचा सामना करावा लागेल.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.