व्हर्जिन, या शब्दाचा नेमका अर्थ माहित आहे का ?

नारी शक्ती आज कुठल्याच क्षेत्रात मागे राहिलेली नाही. प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन महिला आपल्या कर्तृत्वाचा झेंडा गाडताहेत. कित्येकवेळा तर पुरुषांनाही जमणार नाही इतक्या सफाईदारपणे महिला अनेक गोष्टी करतात. अशा या काळात इंडोनेशियातून महिलांच्या बाबतीत एक अतिशय लज्जास्पद बाब समोर आली आहे.

इंडोनेशियातून अशी बातमी समोर आलीये की या देशातील महिलांना पोलीस सेवेत भरती होण्यापूर्वी ‘व्हर्जिनिटी टेस्ट’ बंधनकारक करण्यात आलीये.

कुठल्याही महिलेला जर पोलीस सेवेत भरती व्हायचं असेल तर तिला आधी ‘व्हर्जिनिटी टेस्ट’मधून जावं लागतं. या टेस्टमध्ये जर ती महिला पास झाली तरच तिला पोलीस सेवेची संधी मिळू शकते.

प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही तर या तुघलकी नियमासारखाच अजून एक नियम इथल्या पोलीस सेवा भरतीसाठी लागू आहे. तो नियम असा की पोलीस भरतीसाठी महिला सुंदर आणि आकर्षक असणं देखील अनिवार्य आहे. त्यामुळे तेथील अधिकारी पोलीस सेवेसाठी महिलांची निवड करताना फक्त सुंदर महिलांनाच प्राधान्य देतात.

इंडोनेशियाच्या पोलीस भरती प्रक्रीयेसंबंधीच्या लज्जास्पद नियमांविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर मोहीम उघडण्यात आलीये. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी हा नियम रद्द करण्यासाठी इंडोनेशियावर दबाव निर्माण केला आहे. इंडोनेशिया मात्र या आंतरराष्ट्रीय दबावाला भिक घालायला तयार नाही. ही प्रक्रिया तिथे अजूनही तशीच सुरु आहे.

‘व्हर्जिन’ शब्द नेमका आला कुठून आणि त्याचा अर्थ काय..?

आजकाल जरी व्हर्जिन या शब्दाला फक्त सेक्सशी जोडून बघितलं जात असलं तरी हा शब्द जेव्हा सर्वप्रथम वापरला गेला त्यावेळी त्याचा सेक्सशी काहीही संबंध नव्हता.

‘व्हर्जिन’ या शब्दाचा अर्थ होतो अतिशय पवित्र. १०० टक्के शुद्ध.

इंग्रजी भाषेमध्ये हा शब्द सर्वप्रथम वापरण्यात आला इसवी सन १२०० मध्ये. कॅम्ब्रिज विद्यापीठातील ट्रिनीटी कॉलेजमधील हस्तलिखितांमध्ये uirgines हा शब्द वापरण्यात आला होता. याच शब्दाला पुढे चालून virgin म्हंटलं जाऊ लागलं.

‘व्हर्जिन’ शब्दाचा ख्रिश्चन धर्म आणि चर्च यांच्याशी देखील अतिशय जवळचा संबंध आहे. कुठलीही तरुण मुलगी जर चर्च सोबत काम करणार असेल तर तिच्या पवित्रतेसंबंधी ख्रिश्चन धर्मात व्हर्जिनिटी हा शब्द वापरला जातो. त्या तरुण मुलीची चर्चसोबत काम करण्याची योग्यता (पवित्रता) सांगणारा शब्द म्हणजे ‘व्हर्जिनिटी’ होय.

व्हर्जिन शब्दासंबंधीचा एक ऐतिहासिक घटना देखील आहे. असं सांगतात की अरसुला नावाची एक ब्रिटीश राजकुमारी होती. तिच्या वडिलांनी तिचं लग्न ठरवल्यानंतर ती आपल्या नियोजित पतीला भेटण्यासाठी ११ हजार व्हर्जिन सेविका घेऊन समुदसफरीवर निघाली होती.

अचानक समुद्रात वादळ सुरु झाल्याने तिने पोपला भेटायला जायचं ठरवलं आणि पुढच्या प्रवासात त्यांचा सामना झाला ‘हंस’ नावाच्या समुद्री चाच्यांशी. या समुद्री चाच्यांनी राजकुमारी अरसुला सहित तिच्या सोबतच्या ११००० व्हर्जिन सेविकांची हत्या केली.

ख्रिस्तोफर कोलंबस याने याच राजकुमारी अरसुलावरून अमेरिकेतील एका बेटाचं नामकरण ‘व्हर्जिन आयलँड’ असं केलं होतं. हे बेट अमेरिकेत ‘व्हर्जिन आयलँड ऑफ युनायटेड स्टेट्स’ म्हणून ओळखलं जातं, तर ब्रिटनच्या सीमेमध्ये या बेटाला ‘व्हर्जिन आयलँड’ असंच म्हणतात.

इतकं असलं तरी आज मात्र स्त्रीयांबाबत पवित्रता अर्थात व्हर्जेनिटी हा शब्द सेक्सशीच घेण्याच येतो.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.