उनाकोटीच्या या रहस्यमयी जंगलामध्ये १ कोटी हिंदू देवीदेवतांच्या मुर्त्या आहेत….

भारतात विविधता अगदी ठासून भरलेली आहे. बरेच ऐतिहासिक संदर्भ इतिहासातून उलगडत असतात आणि हा ऐतिहासिक संदर्भांचा मोठा वारसा भारताला लाभलेला आहे. सिंधू संस्कृतीच्या पाऊलखुणा असो किंवा भीमबेटका मधील चित्रे असो किंवा अजिंठा लेण्या असो सगळ्या गोष्टी भारताची श्रीमंती दाखवतात. तर असाच एक विषय आहे त्रिपुराचा. भारतातील ‘ईशान्येकडील’ सर्व राज्ये अतिशय सुंदर मानली जातात. यापैकी एक म्हणजे त्रिपुरा. हे भारतातील सर्वात सुंदर राज्यांपैकी एक आहे. त्रिपुराचे नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासारखे आहे. पर्यटनाच्या दृष्टीने ‘ईशान्येकडील’ प्रमुख राज्यांपैकी एक आहे. त्रिपुरामध्ये अनेक सुंदर आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत. यापैकी एक उनाकोटी आहे, जे त्याच्या एका रहस्यासाठी खूप प्रसिद्ध आहे.

त्रिपुराची राजधानी आगरतळा पासून सुमारे 145 किमी अंतरावर उनाकोटी नावाचे ठिकाण आहे. हे ठिकाण केवळ त्रिपुरातच नाही तर देशभरात खूप प्रसिद्ध आहे. ‘उनाकोटी सुद्धा खास आहे कारण तुम्हाला इथल्या जंगलातल्या खडकांवर अनेक हिंदू देवदेवतांच्या मूर्ती पाहायला मिळतील. त्यांची संख्या 100 किंवा 1000 नाही तर 99 लाख 99 हजार 999 मूर्ती येथे आहेत.

उनाकोटीचे रहस्य काय?

उनाकोटीच्या खडकावर बांधलेल्या या 99 लाख 99 हजार 999 शिव आणि गणेशाच्या मूर्ती आजही गूढच आहेत. या सर्व मूर्तींचा इतिहासात कुठेही उल्लेख नाही. हे फक्त पौराणिक कथांवर आधारित आहेत. याशिवाय ‘उनाकोटी’मध्ये असे काही मार्ग आहेत ज्यांचे गूढ मोठमोठे वैज्ञानिकही सोडवू शकलेले नाहीत.

काळभैरवाची मूर्ती विशेष आहे

उनाकोटीच्या कित्येक किलोमीटरपर्यंत मनुष्यवस्ती नाही. इथे फक्त घनदाट जंगल आणि दलदल आहे. येथील बहुतेक मूर्ती शिव आणि गणेशाच्या आहेत. या सर्व मूर्ती मोठ्या आणि लहान आकाराच्या आहेत. अशा परिस्थितीत विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की, इतक्या निर्जन ठिकाणी इतक्या मूर्ती कोणी आणि कशासाठी बनवल्या? या मूर्ती बनवणाऱ्याने संपूर्ण १ कोटी मूर्ती का बनवल्या नाहीत? या प्रश्नाचे उत्तर इतिहासात कुठेही सापडत नाही.

1 कमी मूर्ती बनण्यामागील रहस्य

पौराणिक कथांनुसार, उनाकोटीच्या खडकांवर बनवलेल्या मूर्ती ‘काळू’ नावाच्या कारागिराने बनवल्या होत्या. असे म्हणतात की, जेव्हा त्यांनी भगवान शिवासोबत कैलासला जाण्याचा आग्रह धरला तेव्हा शिवाने अनेक वेळा नकार देऊनही ते मान्य झाले नाहीत. यानंतर शिवजीने ‘तुम्ही एका रात्रीत एक कोटी मूर्ती बनवल्यास मी तुम्हाला माझ्यासोबत कैलासात नेईन’ अशी अट घातली. ‘काळू’ ला शिवाची ही अट मान्य झाली आणि त्याने रातोरात मूर्ती बनवायला सुरुवात केली. सकाळी जेव्हा त्यांनी मूर्ती मोजल्या तेव्हा 1 मूर्ती कमी होती आणि तो भगवान शिवासोबत कैलासला जाऊ शकला नाही.

भारतीय पुरातत्व विभागा’नुसार ही शिल्पे सुमारे 1200 वर्षे जुनी आहेत. त्याच वेळी, शास्त्रज्ञांच्या मते, ही शिल्पे 8 व्या ते 9 व्या शतकात बनविली गेली होती. भारतातल्या आश्चर्यकारक गोष्टींपैकी एक म्हणजे हे उनाकोटी मानलं जातं. इतक्या घनदाट जंगलात इतक्या मुर्त्या असणं म्हणजे किती मोठं गूढ आणि समृद्ध वारसा असावा याचा अंदाज येतो. भारताच्या महत्वाच्या ठेव्यांपैकी एक म्हणजे उनाकोटी मानले जाते.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.