राजा हिंदुस्थानीच्या गाण्यावर बँजो वाजवून जगभर फेमस झालेले उस्ताद नुर बक्ष बलोची…..

व्हायरलचा जमाना आहे भिडू त्यामुळं कोणत्या क्षणी काय फेमस होईल सांगता येत नाही. जगभरात टॅलेंट नांदत असतं ते फारसं जगभर पसरलेलं नसतं त्याला आजच्या काळात साथ मिळाली आहे ती म्हणजे सोशल मीडियाची. कधी कधी हे व्हायरल होणारे कंटेंट क्रींज सुद्धा फार लवकर वाटू लागतात. पण काही कंटेंट इतके सुंदर असतात की प्रसंगी आपण त्याला पैसेही मोजायला तयार असतो.

व्हायरलच्या जमान्यात मागच्या काही वर्षात भारताने अनेक वन नाईट स्टार पाहिले असतील आणि अजूनही पाहतच आहोत. आपल्या लोकांकडे हूनर, कलाकारी ठासून भरलेली असते पण योग्य वेळ, माणसे न मिळाल्याने ती जास्त प्रसिद्ध होत नाही पण काही कलाकृती या अचानक लक्ष वेधून घेतात आणि दीर्घकाळ स्मरणात राहतात.

आता तुम्ही म्हणाल अरे भिडू मुद्द्यावर ये की किती पाल्हाळ लावतो तर हा भिडू मुद्द्यावर आलोय..

तर सोशल मीडिया वर तुम्ही काही दिवसांपूर्वी बँजोवर एक बॉलिवूड गाणं वाजवणारे आर्टिस्ट पाहिले असतील. एकदम मनापासून ते वाजवताय आणि त्यांचं वादन ऐकून मन कसं जुन्या आठवणीत रमून जातं, अचानक नॉस्टॅल्जिया अंगात उतरू लागतो. आता हे बँजो वाजवणारे गृहस्थ काय साधीसुधी असामी नाहीये. अचानक व्हायरल झालेले आणि दीर्घकाळ स्मरणात राहतील असे हे गृहस्थ आहेत तरी कोण?

राजा हिंदुस्थानी तसा सगळ्यांना आवडणारा सिनेमा. त्यातला सगळ्यांना वयात आणणारा किस सोडला, तर त्यातली गाणी इतकी गोड आणि कायमची काळजात बसलेली होती. आये हो मेरी जिंदगी मैं तुम बहार बनके….हे गाणं उदित नारायण यांच्या तोंडून ऐकताना किती बरं वाटतं.

तर हेच गाणं बँजोवर वाजवलं होतं पाकिस्तानच्या उस्ताद नुर बक्ष बलोची यांनी. पाकिस्तानच्या दानियाल अहमद या संगीतकाराने शूट केलेला उस्ताद नुर बक्ष बलोची यांचा हा व्हिडिओ सध्या जगभर गाजत आहे. बँजोला एकदम सहजरीत्या हाताळत आणि प्रेमाने भाव समजून त्यांनी… आये हो मेरी जिंदगी मैं तुम बहार बनके….हे गाणं वाजवलं होतं.

जेव्हा दानियाल अहमद यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला तेव्हा लागलीच तो व्हायरल झाला कारण वादन करताना उस्ताद नुर बक्ष बलोची यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा आनंद. त्यांच्या एका एका हरकतींवर लोकांचं मन जिंकून घेण्याची शक्ती दिसून येते. आपल्या धुंदीत ते गाणं वाजवत आहे, स्वतःही आनंद लुटत आहे आणि लोकांनाही देत आहे. पाकिस्तानमध्ये उस्ताद नुर बक्ष बलोची हे एक महत्वाचे बँजो वादक म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांची बरीच गाणी फेमस आहेत.

तेव्हा ज्यांना नवीन नवीन प्रेम झालेलं होतं त्यांच्यासाठी हे आये हो मेरी जिंदगी मैं तुम बहार बनके…हे गाणं नॉस्टॅल्जिया बनून अजूनही मनात आहे. त्यात बँजोवर वाजवून उस्ताद नुर बक्ष बलोची यांनी त्यात अजूनच गोडवा ओतलाय. अजूनही पाहिला नसेल तर सोशल मीडियावर सर्च करा आणि मजा घ्या कारण अशा गोष्टी लै भारी असतात…

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.