दुसऱ्या महायुद्धामुळे ब्रिटिशांनी आणि बिहाऱ्यांनी कोलकाताच्या झालमुडी भेळीला जन्म दिला….

भेळ हा लय जणांचा फेवरेट विषय आहे त्यातल्या त्यात स्ट्रीट फुडचे व्हिडिओ बनवणाऱ्या लोकांच्या तर एकदमच जिव्हाळ्याचा विषय. सुकी/सुखी भेळ, ओली भेळ हे दोन टॉपचे शूटर. पण कधी जर कोलकात्याला चक्कर टाकली तर रस्त्याच्या कडेला झालमुडी भेळीचे स्टॉल लागलेले असतात. कोलकात्याला गेले आणि तिथली स्पेशल झालमुडी भेळ खाल्ली नाही तर तुमच्या इतके दुर्दैवी तुम्हीच असाल.

पण इथ सगळयात आधी आपण झालमुडी या शब्दाचा अर्थ जाणून घेऊ नाहीतर खायची मजा नाही. तर झाल म्हणजे तिखटजाळ आणि मुडी म्हणजे मुरमुरे/भडंग. कोलकातामध्ये ठिकठिकाणी या भेळीचे स्टॉल पाहायला मिळतात. 

जे टिपिकल झालमुडी भेळ विकणारे असतात त्यांच्याकडे असलेल्या स्टॉलवर एक मोठा डबा असतो त्यात मुरमुरे असतात. आजूबाजच्या डब्यांमध्ये बटाटा, टोमॅटो, काकडी, हिरव्या मिरच्या, तळलेले शेंगदाणे आणि इतर मसाले सोबतच कोथिंबीर, लाल मिरच्या असं सगळं साहित्य असतं.

परफेक्ट प्रमाणात मस्टर्ड ऑईल घातलं जातं आणि गिऱ्हाईक लोकांना प्रेमाने ही भेळ दिली जाते. अनेक जण नॉस्टॅल्जिया म्हणून ही भेळ खातात वैगरे पण असं काही नाहीये कारण या भेळीचा शोध हा दुसऱ्या महायुद्धात लागल्याचं सांगितल जातं. 

सिंगापूर ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्यानंतर 1942 मध्ये झालमूडी भेळीची सुरुवात झाली. यामुळे कोलकाता महत्वाचं राज्य म्हणून प्रसिद्ध झालं. 

अमेरीकन सैनिक ब्रिटिशांना इथच येऊन मिळाले. कोलकात्यात सैनिकांचा भरणा जसा जसा वाढू लागला तसा तसा रस्त्याच्या कडेला स्टॉल टाकणाऱ्या लोकांचा उत्साहही वाढू लागला. रस्त्यावर हजारो सैनिक दिसू लागल्याने स्टॉल वाढू लागले.

स्थलांतरित झालेल्या बिहारी लोकांनी मुरी ( मुरमुरे/भडंग) ग्रँड हॉटेलच्या चोरंगी परिसरात विकायला सुरुवात केली. बरेच अमेरीकन सैनिक हे ग्रँड हॉटेलच्या परिसरात राहायला होते, काही महत्वाचे अधिकारी थेट ग्रँड हॉटेलमध्येच राहायला होते आणि त्यांचे मिलिटरी कॅम्पसुद्धा तिथेच होते.

नुसत्या साध्या मुडीला कोणी खाईल असं वाटतं नव्हतं म्हणून बिहाऱ्यानी काय केलं तर त्या साध्या मूडीमध्ये उकडलेले बटाटे, काकडी आणि मसाले टाकले. विकण्यासाठी त्यांनी सरळ ब्रिटिश आणि अमेरीकन सैनिक गिऱ्हाईक म्हणून पकडले. ब्रिटिश आणि अमेरीकन सैनिकांना ही भेळ प्रचंड आवडली.

चवीला तिखट आणि संध्याकाळचा नाश्ता म्हणून या भेळीकडे पाहिलं जाऊ लागलं. या झालमुडी भेळीमुळे नविन मार्केट सुरू झालं. बिहारी लोकांची ही आगळीवेगळी क्रिएटिव्हीटी पाहून स्थानिक लोकांनीही भेळ विकायला सुरुवात केली.

एका अर्थाने झालमुडी भेळीने पैसा निर्माण करायला शिकवलं.

जेव्हा कोलकाता मधील प्रतिष्ठित लोकांना हे भेळीचं प्रकरण कळलं तेव्हा त्यांनी सांगितलं की हा पदार्थ शरीरासाठी हानिकारक आहे त्यामूळे ही दुकानं बंद झालीच पाहिजे. पण जेव्हा याचं प्रतिष्ठित लोकांनी ब्रिटिश आणि अमेरीकन सैनिकांना झालमुडी भेळ खाताना पाहिलं तेव्हा मात्र त्यांच्या तोंडून एकही चकार शब्द निघाला नाही.

पण मात्र त्यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने भेळ विकण्याचे फॉर्म्युले शोधले आणि तेही मार्गी लागले. थोडक्यात नावं ठेवणारी लोकं या भेळीच्या प्रेमात पडली.

स्थलांतरित झालेल्या बिहारी लोकांनी आणि अमेरीकन सैनिकांनी ही भेळ मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध केली.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.