भारतात एकदा ‘शून्य रुपये’ किंमतीच्या ५ लाख नोटा छापण्यात आल्या होत्या

नोटबंदी झाल्यावर अनेक नवनवीन प्रकारच्या नोटा आपल्या देशाने बघितल्या. म्हणजे बऱ्यापैकी कलर आपल्याला पाहायला मिळाले. गुलाबी २ हजारांची कशी दिसते इथपासून ते नोटेमध्ये चिप बसवलेली आहे इथपर्यंत अनेक चर्चांना ऊत आला होता.

ण मागे एक झिरो रुपयांची नोट आली होती.

सोशल मीडियावर ती व्हायरल झाली होती की नंतर ती मीम म्हणून फेमस झाली होती. खरंच ती झिरो रुपयांची नोट आली होती का, तिचा पुढे काय वापर झाला अशा अनेक गोष्टी आपण जाणून घेऊया.

तर एक, दोन, पाच ते दोन हजारांपर्यंतच्या नोटा भारतात उपलब्ध आहेत. भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती या नोटांचा वापर त्याच्या दैनंदिन गरजांसाठी आणि इतर सर्व सुविधांसाठी करतो. तुम्ही जवळपास सर्व प्रकारच्या नोटांसह खरेदी देखील केली असेल. पण तुम्ही कधी शून्य रुपयांची नोट पाहिली आहे का?

या शून्य रुपयांच्या नोटेवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे चित्रही छापण्यात आले असून ते इतर नोटांसारखेच दिसते.

इथे हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच येत असेल की शेवटी शून्य रुपयाची नोट काढायची काय गरज होती. कारण शून्य असेल तर शेवटी शून्यच आहे, तरीही ही नोट बनवण्यामागचा हेतू काय आहे. ही नोट भारतात कधी आणि का छापली गेली ते आपण जाणून घेऊया. भारतात वापरल्या जाणाऱ्या सर्व भारतीय नोटा छापण्याचे काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) असले तरी या शून्य नोटा आरबीआयने छापल्या नव्हत्या.

भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत ही नोट महत्त्वाची मानली जात होती. वास्तविक, ही नोट एका संस्थेने भ्रष्टाचाराविरुद्धचे हत्यार म्हणून सुरू केली होती. २००७ मध्ये दक्षिण भारतातील एका ना-नफा संस्थेने (NGO) शून्य रुपयांची नोट छापली होती. तामिळनाडूतील 5th Pillar नावाच्या या NGOने सुमारे पाच लाख शून्य रुपयांच्या नोटा छापण्याचे काम केले होते. ही नोट हिंदी, तेलगू, कन्नड आणि मल्याळम या चार भाषांमध्ये छापून लोकांमध्ये वितरित करण्यात आली.

जाणून घ्यायचं झालं तर नोट छापण्यामागे एनजीओचा उद्देश काय होता ?

असे करण्यामागील एनजीओचा हेतू अगदी स्पष्ट होता. लाच मागणाऱ्यांना पैशांऐवजी ही नोट देऊन भ्रष्टाचाराविरुद्ध लढा दिला गेला. या चिठ्ठीत ‘भ्रष्टाचार संपवा’, ‘कोणी लाच मागितली तर ही नोट द्या आणि प्रकरण सांगा’, ‘मी घेणार नाही, देणार नाही’ असे अनेक संदेश लिहिले आहेत. या शून्य रुपयांच्या नोटेवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे चित्रही छापण्यात आले असून नोटेच्या तळाशी उजव्या बाजूला संस्थेचा फोन नंबर आणि ईमेल आयडी छापण्यात आला आहे.

भ्रष्टाचार विरोधी या नोटांचा वापर करण्यात आला होता पण या नोटेने लोकांना संभ्रमात टाकलं होतं आणि या झिरोच्या नोटेची ओळख पटवण देखील अवघड होतं. मात्र झिरो रुपयांची नोट हे देखील मोठं आश्चर्य होतंच हे ही तितकंच विशेष.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.