अल्लू अर्जुनच्या पप्पांनी बॉलिवूडला सगळयात आधी 100 करोडचा हिट सिनेमा दिला होता…

शाहरुखच्या पठाणनं शंभर कोटींची कमाई केल्याची चर्चा आहे, कित्येक महिने मागं पडलेलं बॉलिवूड पठाणमुळं पुन्हा फॉर्मात आल्याची चर्चा आहे. ही चर्चा सुरु झाली ती १०० कोटींच्या आकड्यामुळं. पिक्चरचं बजेट भले २०० कोटी असलं तरी १०० कोटींची कमाई म्हणजे गोल्डन नंबर मानला जातो.

पण बॉलिवूडला पहिला शंभर कोटींचा सिनेमा मिळाला होता अल्लू अर्जुनच्या वडिलांमुळे

अल्लू अर्जुन बॉलीवूडमध्ये आत्ताआत्ता फेमस झाला त्याच्या आधी बॉलीवूड मध्ये फेमस झाले होते ते म्हणजे त्याचे वडील अल्लू अरविंद. एका दशकाहून अधिक काळ अल्लू अरविंद बॉलीवूड मध्ये प्रोड्यूसर म्हणून नावाजलेले होते अजूनही आहेत, अनेक हिट सिनेमे त्यांनी दिले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का अल्लू अरविंद यांनी बॉलीवूड ला पहिला शंभर कोटीचा ब्लॉकबस्टर सिनेमा दिला आणि तो सिनेमा होता गजनी जो 2008 साली आला होता. 2005 साल चा तमिळ मधला हिट सिनेमा गजनी या सिनेमाचा तो रिमेक होता. आमिर खान असीम आणि जिया खान यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका होत्या.

अल्लू अरविंद यांची गजनी ही आठवी फिल्म होती ती प्रोडूसर म्हणून अल्लू अरविंद यांनी हाच सिनेमा तेलगू मध्ये डब केला आणि पुन्हा बाजारात उतरवला हिंदीमध्ये या सिनेमाने शंभर कोटीच्या क्लबमध्ये स्थान मिळवलं होतं तोवर शंभर कोटी हा बेंच मार्क बॉलीवूड मध्ये अल्लू अरविंद यांनी सेट केला होता. साउथ चे लोक फक्त हाणामाऱ्या करत नाही तर डोकं लावून बिजनेस सुद्धा करतात याचं हे उत्तम उदाहरण.

गजनी व्यतिरिक्त अल्लू अरविंद यांनी बॉलीवूडमध्ये प्रोड्युस केलेल्या फिल्मस म्हणजे प्रतिबंध, द जंटलमन, कौन  ? कुवारा आणि कलकत्ता मेल. त्यांचा पुढचा येणारा सिनेमा म्हणजे शाहिद कपूरचा आणि मृणाल ठाकूरचा जर्सी आणि अजून एक सिनेमा म्हणजे कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन स्टारर शहजादा होय. शहजादा हा ऑफिशियल रिमेक असून त्याचा ओरिजिनल पिक्चर हा 2020 साली अल्लू अर्जुनचा अला वैकुंठपुरामुलू होय.

आता जर नीट लक्ष देऊन बघितलं तर अल्लू अर्जुन आणि अल्लू अरविंद यांच्यामध्ये कळेल ही बाप बाप होता है पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अल्लू अरविंद यांनी बॉलिवूडला शंभर कोटीचा मार्क ठरवून दिला होता.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.