बैलगाडीवर लायब्ररी उभारुन ताटलीच्या आवाजावर शिकवणाऱ्या मास्तरीण बाई !

करोना महामारीमुळे शाळाच बंद झाल्या आणि शाळेच्या पटांगणात खेळणारी मुले दिसेनाशी झाली. खेळण्या-बागडण्याच्या वयात मुलांचे शिक्षण मोबाइल स्क्रीन वर आले. एक विचार करा जेव्हा मोठे लोकं वर्क फ्रॉम होम ला कंटाळले तर लहान पोरांची काय हालत असेल. शाळा म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातलं एक महत्त्वाचे पर्व असतं पण करोनामुळे हे पर्व थांबलं. आता जरी गाडी रुळावर येत असली तरी त्यात इतके स्वारस्य राहिलेले नाही.

मुलांचे शिक्षण थांबू नये म्हणून बैतूल, मध्यप्रदेशमधल्या एका शिक्षिकेने एक जबराट काम करून ठेवलंय. हे जेव्हा जगासमोर आलं तेव्हा तालिया बजती रहनी चाहिए या डायलॉगला पात्र ठरलं. देशाचं भविष्य वाचवण्यासाठी शिक्षिका कमला दवांडे यांनी एक जुगाडू लायब्ररी उभारली आणि सोबतच विद्यार्थ्याना शाळेची गोडीही लावली.

शिक्षिका कमला यांनी बैलगाडी ची व्यवस्था केली आणि त्या बैलगाडीवर पुस्तकात ठेवून ती सजवली थोडक्यात एक मिनी वाचनालय तयार केले. ही चालती फिरती बैलगाडी अर्थात हे मिनी वाचनालय घेऊन या शिक्षिका वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन लहान मुलांना शाळेची पुस्तकांची गोडी लावतात. ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना हे तर चांगलं ठाऊक असेल की बैलगाडीच्या मागं लहान मुलं धावतात. साधारणपणे बैलगाडीवर चारा खत धान्य असा काही माल वाहून आणला जातो. पण या अनोख्या बैलगाडीवर पुस्तक आणली जातात आणि त्या बैलगाडीच्या मागे लहान मुलं राहतात सारे शिकूया पुढे जाऊया या वाक्य अंतर्गत या शिक्षिका आपलं काम चोख करतात.

ही आगळीवेगळी लायब्ररी सुरु करण्याचं कारण…

खरंतर शिक्षिका कमला यांनी ही लायब्ररी फक्त दोन दिवसांसाठी सुरू केली होती पण ही आगळीवेगळी लायब्ररी लहान मुलं आणि त्यांच्या आई-वडिलांमध्ये भरपूर लोकप्रिय झाली. दर शनिवारी या लायब्ररी वरील पुस्तक लहान मुलांना वाटण्यात येतात. रामजी ढाणा नावाच्या गावात 87 विद्यार्थी शिकतात. पण या मुलांना पुस्तके मिळत नाही की ही पुस्तकं या मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी कुठलेही साधन नाही. पुस्तक पोहोचवण्यासाठी शाळेजवळ ना गाडी होती ना कोणी सहाय्यक होता. एक शिक्षिका तर करोनाची लागण झाल्यामुळे सुट्टीवर होते. पण शिक्षिका कमला यांनी बैलगाडीच्या लायब्ररीची आयडिया काढली. पन्नास रुपये प्रमाणे भाडोत्री बैलगाडी आणली आणि ही पुस्तकं मुलांपर्यंत पोहोचवली.

ताटली वाजवून शाळा भरते…

शिक्षिका कमला यांचं फक्त वाचनालयच नाही तर त्यांचा मोहल्ला क्लाससुद्धा खास आहे. त्या गावातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये मोहल्ला क्लास घेतात. ज्या भागामध्ये क्लास असणार आहे तिथे थाळ्या आणि चमचे वाजवून शाळा भरली जाते. शिक्षिका कमला या लहान मुलांना शिक्षित करण्यासाठी जे काम करताय ते खरंच अतुलनीय आहे. जगभरातील शिक्षकांसाठी त्यांचं काम प्रेरणादायी आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.