या भिडूने कोंबडीची अंडी उबवून दाखवलेत, कोरोनामुळे घरी बसलात तर हे आहेत ५ उपाय

कोरोनामुळे घरी बसलाय. करण्यासारखं काहीच नाही. नेटफ्लिक्सवर सिनेमे सापडत नाहीत. दिवसरात्र पिक्चर बघून पण बोअर झालाय. आत्ता करण्यासारखं काहीच उरलं नाही….

तर हा लेख फक्त तुमच्यासाठी आहे. 

कोरोनामुळे घरात बसून बोअर झाला असाल तर करण्यासारखे हे पाच प्रयोग आहेत. ते ही एकाच माणसाने सांगितलेले. फावल्या वेळेत वेगळं काहीतरी करण्याचा अनुभव देखील मिळेल.

अब्राहम पाॅइनशेवल हा माणूस. हा माणूस घरबसल्या उद्योग करणाऱ्यांचा बाप आहे. एका ठिकाणी किती वेळ थांबून राहू शकतो याच पण काहीतरी लिमीट आहे. पण हे कार्यकर्ते त्या लिमीटचा कळस आहेत

कस तर अब्राहमचा पहिला विक्रम सांगतो,

या भिडूने कोंबडीच्या अंड्यावर बसून अंडी उबवून दाखवली. त्यातनं पिल्ल पण बाहेर आली म्हणे. तो टोटल दहा अंड्यांवर २६ दिवस बसून राहिला. अंड्यावर बसायचं आहे म्हणल्यानंतर उब निर्माण करणारा अलगदपणा आणणं हे त्याच्यासमोरचं सर्वात मोठ्ठ दिव्य होतं.

पण त्याने हे केलं आणि ९ पिल्लांना जन्म दिला.

फक्त हा पराक्रम लोकांना पाहायचा होता म्हणून घरगुती न करता त्याने पॅरिसच्या म्युझियमध्ये बसुन केला. लोक तिथं यायचे आणि अंड्यावर बसलेल्या या कोंबड्याला बघायचं.

२) 

असाच एक प्रकार त्याने करुन दाखवला. तो म्हणजे एका दगडाच स्वत:च्या आकाराची जागा तयार केली आणि त्यात फिक्स झाला.

इथंपण माणसं यायची आणि छिद्रातनं त्याला बघून जायची. आठवडाभर या दगडात तो बसून राहिलेला.

३)

करोना लयच झाला तर हा उपाय सगळ्या गावाला करायला लागणार आहे. हा उपाय काय आहे तर खड्डा काढायचा आणि त्यात जावून बसायचं. साहेबांनी हे काम देखील करुन दाखवलय.

४)

पुर्वीच्या काळी राजे रजवाडे होते. ते शिकार करायचे. वाघ, सिंह, गवा, अस्वल असले प्राणी मारून त्यांची कातडी घ्यायचे. त्यात भूसा भरून परत ते शिवून टाकायचे. हा माणूस अशा शिवलेल्या अस्वलाच्या पोटात देखील राहिलाय.

५)

सात दिवसांच्या यादीत त्याने काय केलंय तर ६० फुटाचा एक खांब तयार केला आणि त्यावर ७ दिवस राहिला.

थोडक्यात काय तर हे पाच उपाय आहेत. याचा आनंद घ्या आणि रोग पसरवू नका.

हे हि वाच भिडू.