एक्झिट पोलनुसार पंजाबमध्ये ‘आप’नं वापरलेली स्ट्रॅटेजी सक्सेसफुल होताना दिसतिये

विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मतदान झाल्यानंतर सगळ्या देशाचं लक्ष रिझल्टकडे लागलंय. उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल येत्या १० मार्चला येणार आहेत. पण त्याआधी सगळ्याचं माध्यमांचे आणि साईट्सचे एक्झिट पोल समोर आलेत. 

हे एक्झिट पोल पहिले तर जवळपास सगळ्यांचं राज्यांमध्ये तिथल्या सत्ताधारी पक्षाकडेचं झुकता कल असल्याचं दिसतंय. पण या सगळ्यात पंजाबमधलं चित्र मात्र वेगळं पाहायला मिळतंय, ज्यामुळे पंजाबमधलं राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आलंय. कारण काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या पंजाबमध्ये सध्या अरविंद  केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष बाजी मारताना दिसतोय. 

WhatsApp Image 2022 03 08 at 2.52.34 PM

आता हा चार्टचं घ्या ना, देशातल्या काही मीडिया हाऊसच्या या एक्झिट पोलनुसार, पंजाब विधानसभेच्या एकूण १७७ जागांपैकी सर्वाधिक जागा ह्या आपच्या गोटात आहेत. म्हणजे असं म्हणायला काही हरकत नाही कि, पंजाबची जनता आपल्या जुन्या पक्षाला डावलून ‘आप’ला संधी देण्याच्या तयारीत आहे. 

तसं  एक्झिट पोल १०० टक्के खरे असतात अशातला भाग नाही. बऱ्याचदा ते सपशेल फेल सुद्धा ठरतात, पण असे योग्य जवळपास २० टक्केचं म्हणता येईल. पण ८० टक्के चान्सेस एक्झिट पोल खरे ठरण्याचे आहेत. फक्त आकडा कमी जास्त होऊ शकतो. 

तर जर आपण तात्पुरता एक्झिट पोल धरून चाललो, तर पंजाबमध्ये सत्ताधारी काँगेस आणि भाजपची अक्षरशः वाट लागेलली दिसतेय. पण यात आपच्या वाट्याला मात्र  ११७ जागांपैकी ४१ टक्के जागा आलेल्या पाहायला मिळतात. आणि या सगळ्यांमध्ये पंजाबमध्ये आपची दिल्लीवाली स्ट्रॅटेजी कामी आल्याचं बोललं जातंय. 

 म्हणजे झालं काय, तसही पंजाबमध्ये काँग्रेसनंतर आम आदमी पक्ष दुसऱ्या नंबरचा मोठा पक्ष होता. काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून पंजाबची राजकीय ओळख होती. पण गेल्या वर्षी निवडणुकीच्या काही महिने आधीच सत्ताधारी काँग्रेसमधली अंतर्गत भांडण समोर आली. नवज्योत सिंग सिद्धू आणि माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यातले हे वाद हळू हळू हायकमांड पर्यंत जाणून पोहोचले होते. 

काँग्रेस हायकमांड काय फिक्स स्टॅन्ड घ्यायला तयार नव्हतं. पण उघड उघड दिसत होत काँगेस नवज्योतसिंग सिद्धू यांच्या बाजूने आहे. त्यामुळे कॅप्टन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पक्षातून काढता पाय घेतला. यासगळ्यांमुळे काँग्रेसची पार अब्रूच निघाली. पंजाब काँग्रेस कमकुवत झालंय असं एकूण चित्र तयार झालं.

काँग्रेसने या सगळ्यावर पडदा टाकण्यासाठी चरणजित सिंह यांना मुख्यमंत्री पदावर बसवून दलित कार्ड वापरलं, काँग्रेसला वाटलं या गोष्टीमुळे आपण आपली गेलेली शान आणि सत्ता परत मिळवू पण सध्याच्या चित्रावरून तर काँग्रेसचा डाव पार फेल गेल्याच दिसतंय.

राहिला प्रश्न भाजपचा, तर पंजाबमध्ये भाजपची तशीही काही एवढी हवा नव्हती. पण २ वर्षांच्या शेतकरी आंदोनलामुळे होत नव्हतं ते प्रेमसुद्धा भाजपने गमावलं. पक्षाला आपली अवस्था समजली म्हणून तर भाजपकडून मुख्यमंत्री पदाचा फिक्स चेहरा समोर आणला गेला नाही. आणि बाकीच्या अकाली दल, शिरोमणी दलाचा अंदाजा तर कुणाला लागलाचं नाही.

आणि या सगळ्या घडामोडींचा फायदा आम आदमी पक्षाला पुरेपूर झाला. अरविंद केजरीवाल यांनी राज्यातल्या सगळ्या जागांवर आपले उमेदवार उतरवले आणि भगवंत मान यांना आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित केलं. आणि या सगळ्यात राज्यातल्या परिस्थितीत आपल्या सक्सेसफुल ठरलेल्या दिल्ली पॅटर्नचा वापर केला.

पक्षानं दिल्लीप्रमाणे पंजाबमध्ये मोफत वीज आणि पाणी पुरवठा करण्याचं आश्वासन दिलं. तसंच पंजाबमधील शिक्षण व्यवस्थेचा मुद्दा सुद्धा उपस्थित करत शिक्षणात सुद्धा दिल्ली मॉडेल वापरण्याची गॅरंटी दिली. बाकी चांगले रस्ते, शेतकऱ्यांना उत्तम मोबदला अशी आश्वासन सुद्धा पुढं ठेवली.

त्यात काँग्रेसला जरी वाटलं चन्नी यांच्या मदतीने आपण दलितांना आपल्याकडे घेऊ पण दलितांनी मात्र आपलाच पसंती दिलीये. त्यात राजधानी दिल्लीतलं चित्र पाहता तरुणांनी सुद्धा ‘आप’ला पाठिंबा दिल्याचं दिसतंय.  

एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, पंजाबमध्ये काँग्रेसला गेल्या २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत ३८.८ टक्के मतं मिळाली मिळाली. आणि सध्याच्या एक्झिटमध्ये हा आकडा २८ टक्के दाखवतोय,  म्हणजे डायरेक्ट १० टक्क्यांचा फटका. तर अकाली दल २५ टक्यांवरून १९ टक्के, भाजप आघाडीला ६ टक्क्यावरून ७ टक्के मिळाली आहेत. याउलट आम आदमी पक्षाचा आकडा पाहायचा झाला तर पक्षाला २०१७च्या विधानसभा निवडणुकीत २० जागा मिळाल्या होत्या, पण आता ह्याच जागा ६० ते ७० दरम्यान असल्याचं म्हणतात जातंय. 

आता जसं की, आपण आधीच क्लियर केलंय, एक्झिट पोल खरे ठरतात असं नाही, गेल्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा एक्झिट पोलमध्ये आप’ला मोठा पक्ष म्ह्णून घोषित केलेलं, पण हा अंदाज खोटा ठरला होता. पण सध्या पंजाबमध्ये काँग्रेसचा बोलबाला कमी झाल्यानं आम आदमी पक्षाला याचा फायदा नक्कीच होईल असं दिसतंय. 

 हे ही वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.