कोर्टानं म्हटल्याप्रमाणं, खरचं निवडणूक आयोगामूळं कोरोना वाढलायं का? काय सांगते आकडेवारी?
संपूर्ण देशाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागतोय. संक्रमितांची संख्या झपाट्याने वाढतेय. यंदाची परिस्थिती गेल्या लाटेपेक्षा जास्त भयानक आहे. सप्टेंबरच्या शेवट्या आठवड्यापासून कोरोनाच्या आकड्यांत घट होत होती. मात्र आता फेब्रुवारीच्या मध्यापासून पुन्हा एकदा या कोरोनान डोकं वर काढलं आहे. यात नागरिकांचा निष्काळजीपणा तर आहेचं मात्र, ह्या परिस्थितीला निवडून आयोगाला देखील धारेवर धरल जात आहे.
‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोगचं जबाबदार’
कोरोनाच्या नवीन संक्रमितांच्या आणि मृत्यूचा आकड्यांची गंभीर दाखल घेत मद्रास हायकोर्टानं निवडणूक आयोगला चांगलच सुनावलं आहे. मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजीव बॅनर्जी यांनी एका सुनावणीवेळी संताप व्यक्त करत म्हंटल कि,
‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोगच जबाबदार असून आयोगाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हाच दाखल केला पाहिजे.’
तुम्ही काय परग्रहावर होता ?
कोर्टन म्हंटल कि, निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना निवडणूक रॅली काढण्यास परवानगी दिली. पाचही राज्यांमध्ये हजारोंच्या निवडणूक रॅली होत असातना तुम्ही परग्रहावर होता काय? या रॅलीत कोरोनाच्या नियमांचं पालन झाली नाही. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला तुमची संस्थाचं जबाबदार आहे.
दरम्यान, फेब्रुवारी महिन्यापासून वाढत्या संक्रमणा दरम्यान निवडणूक आयोगाने तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरी या पाच राज्यांत निवडणूक जाहीर केली. त्यासाठी प्रचाराला देखील परवानगी देण्यात आली. त्यासाठी कोरोना नियमावली देखील जाहीर करण्यात आली. मात्र, प्रचार रॅलीदरम्यान या नियमाकडे नागरिकांबरोबर नेत्यांनी देखील दुर्लक्ष केलं.
एकीकडे देशातील महाराष्ट्र, दिल्लीसारख्या राज्यांत लॉकडाऊनची परिस्थिती असताना या पाच राज्यात प्रचारावेळी कोणाच्याही चेहऱ्यावर मास्कही नव्हते, तर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला. ज्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्यास आणखी संधी मिळाली.
पश्चिम बंगालमध्ये कोरोना संक्रमितांत झपाट्याने होतेय वाढ
राज्यात २९४ विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक घेण्यात येत आली. यात २७ मार्च ते २९ एप्रिल या दरम्यान एकून ८ टप्प्यात मतदान करण्यात आले. मात्र, निवडणुकांमुळे येथे कोरोनाच्या नियमांची ऐशीतैशी करण्यात आली. राज्यात मतदानाचे २ टप्पे अद्याप बाकी आहे.
मात्र, या दरम्यान कोरोनाचा स्पोट झाला आहे. राज्यात प्रत्येक दुसरा व्यक्ती कोरोनाने संक्रमित आढळीत आहे. राज्यात गेल्या २४ तासांत १४,२८१ नवीन प्रकरण आढळली असून ५९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. गेल्या महिन्याच्या रुग्णांच्या संख्येचा विचार करता ही संख्या ५ पट असल्याचे समजते.
तामिळनाडूमधील परिस्थिती चिंताजनक
तामिळनाडूच्या २३४ विधानसभा मतदार संघासाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडल. ६ एप्रिल रोजी याठिकाणी मतदान करण्यात आल. मात्र त्यानंतर कोरोनाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. रविवारी राज्यात १५, ६५९ रुग्णांचा कोरोन अहवाल सकारात्मक आला. यासह राज्यात एकून संक्रमितांची संख्या १०,८१,९८८ वर पोहोचली आहे. तर ८२ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला.
आसाममध्येही निवडणुकांमुळे परिस्थिती बिकट झाली. राज्यांत एकून १२६ मतदार संघासाठी तीन टप्प्यांत झालेल्या मतदानानंतर कोरोनाचा संख्येत वाढ होताना पहायला मिळाली. राज्यात शनिवारी २,२३६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यासह सध्या १४,००० रुग्ण सक्रीय असल्याचे समजते. दरम्यान, राज्यातील परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. कारण राज्यात कोरोनाचा डबल म्यूटंट आढळला आहे.
केरळमध्ये रुग्णांच्या संख्येत ४ पट वाढ
राज्यात ६ एप्रिल रोजी १४० विधानसभा मतदारसंघासाठी मतदान करण्यात आले. मात्र, निवडणुकानंतर संक्रमितांची संख्या झपाट्याने वाढल्या आहे. गेल्या १० दिवसात नवीन कोरोना रुग्णांत ४ पट वाढ झाल्याचे समजते. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी राज्यांत २८ हजार पेक्षा जास्त नवीन रुग्ण समोर आले. ज्यामुळे संक्रमितांची एकून संख्या १३ लाख, ५० हजार ५०१ झाली आहे.
पुद्दुचेरीमध्ये देखील संक्रमितांचा आकडा ५३, २७९ वर पोहोचला असून ७४८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे.
दरम्यान, या पाच राज्यांतच नव्हे तर इतर अनेक राज्यात स्थानिक पातळीवर निवडणुका झालेल्या पाहायला मिळाल्या. गुजरातमध्ये २१ ते २८ फेब्रुवारी दरम्यान अहमदाबाद आणि वडोदरासहीत सहा महानगरपालिकांसाठी निवडणुका घेण्यात आल्या. मोठमोठ्या प्रचार रॅल्या काढण्यात ज्याचा परिणाम आता पाहायला मिळत आहे. गुजरात मध्ये गेल्या २४ तासांत १४ पेक्षा जास्त नवीन रुग्ण समोर आले. जी दुसऱ्या लाटेतील आतापर्यंतची सर्वाधिक संख्या असल्याचे समजते.
कडक निर्बंध असूनही महाराष्ट्रात निवडणुका
दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. राज्यातील गंभीर परिस्थिती पाहता एकीकडे कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. तर दुसरीकडे पंढरपूरमध्ये पोटनिवडणूक जाहीर करण्यात आल्या होत्या. ज्यामुळे सगळ्याच नेत्यांचा इथे जमावडा होता . हजारोंच्या संख्येने गर्दी करून इथे प्रचार सभा घेण्यात आल्या. मात्र याचे पडसाद आता उमटायला सुरुवात झाली आहे. पंढरपूरात दररोज ८ ते १० संक्रमित आढळून येत आहेत. गेल्या ७ दिवसांत १ हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, पंढरपुरातील कोरोनाच्या परिस्थितीला नागरिकच जबाबदार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हंटले आहे.
उत्तर प्रदेशात पंचायत निवडणुकांची धूम
उत्तर प्रदेशात १५ एप्रिलपासून पंचायत निवडणुकांच्या मतदानास सुरुवात झाली आहे. ज्याचा आज तिसरा टप्पा पार पडला. कोरोनाच्या या उद्रेकातही सुरु असलेल्या या निवडणुकांमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. युपीमध्ये कोरोना प्रकरणांत घट झाली असली तरी संकट अद्याप टळलेले नाही. राज्यात काल ३५, ६१४ रुग्णांची नोंद झाली. तर २५,६३३ रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले.
अश्या परिस्थितीत एकीकडे देशातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली असताना निवडणूक आयोग या निवडणुकांना परवानगी देतोच कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यात येत्या २ मे रोजी ५ राज्यांच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यासाठी कोरोना प्रोटोकॉलचं पालन करण्यासाठी योग्य धोरण आखलं नाही तर आम्ही तात्काळ प्रभावाने मतमोजणी थांबवू, असा इशाराही न्यायालयाने आयोगाला दिलाय.
हे ही वाचा भिडू :
- निवडणूकांमुळे या पाच राज्यांनी कोरोनाला कोले केलय…!
- नव्या निवडणूक आयुक्तांसमोरची पहिलीच केस मोदींवरच्या छेडछाडीच्या आरोपांची आहे..
- निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेला तडा जाण्यासाठी आसामची एक घटना पुरेशी आहे.