रामदेव बाबा तर फक्त पोस्टर बॉय आहेत, पतंजलीचे ९८ % शेअर्स बाळकृष्णांकडे आहेत.

सध्या भारतातली बेस्ट फ्रेंडची बेस्ट जोडी म्हटल तर आपण मोदीजी आणि अमित शहा यांचं नाव घेतो. या दोघा दोस्तानी मिळून अख्ख्या भारताच राजकारण हलवून सोडलय हे तर त्यांचे विरोधक पण मान्य करतील. करायलाच पाहिजे कारण सगळ्या विरोधकांना त्यांनी भुईसपाट करून ठेवलंय.

पण अशीच आणखीन एक जोडी आहे ज्यांनी भारताच बिझनेस मॉडेल हलवून सोडलं. बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण.

रामदेव बाबा आणि त्यांच्या पतंजलीला कोण ओळखत नाही. सुरवातीला पहाटे टीव्हीवर योगासन शिकवत आपल्या घरात शिरले मग हळूहळू दात चमकवणाऱ्या दंतकांतीपासून ते तुपापर्यंत आणि नुडल्सपासून फेडेड जीन्सपर्यंत प्रत्येक गोष्ट आपल्या दारात विकायला आणली. बघता बघता त्यांचे एम्पायर उभे राहिले. अदानी अंबानी यांना जमणार नाही या वेगात पतंजलीची प्रगती सुरु होती. फक्त भारतातचं नाही तर जगात पतंजली मॉडेल बद्दल कुतूहल होतं.

अशातचं समोर आलं की रामदेव बाबा यांच्या या महाप्रचंड बिझनेसचा डोलारा त्यांचे जिवलग दोस्त आचार्य बालकृष्ण सांभाळतात.

आचार्य बालकृष्ण हे सुद्धा बालब्रम्हचारी आहेत. खर नाव बालकृष्ण सुवेदी. जन्मभूमी नेपाळ. पण वडील उत्तराखंडमध्ये एका आश्रमाचे रखवालदार होते. पण नोकरीमध्ये मन रमल नाही परत नेपाळला निघून गेले. साधारण चौदा पंधरा वर्षाचे असताना बालकृष्ण यांना चांगला स्वैपाकी आहे म्हणून कोणीतरी हरियानामधल्या कालबा गुरुकुल येथे आणल. तिथे आपले रामदेवबाबा शिकायला होते. असं म्हणतात की रामदेव बाबांची आणि त्यांची मैत्री तिथूनच सुरु झाली.

हां यामागे दंतकथा देखील आहे. कोणी कोणी म्हणत की बाबा रामदेव हिमालयात फिरत असताना गंगोत्री नदीच्या मुखापाशी एका गुहेत ध्यानधारणा करत असलेला बालकृष्ण त्यांना गाठ पडला. त्यांचे भक्त असही म्हणतात की जगात बालकृष्ण हे एकमेव असे व्यक्ती आहेत ज्यांना संजीवनी जडीबुटीचं ज्ञान आहे ते ओळखूनच रामदेव यांनी त्यांना आश्रमात आणलं.

ते काहीही का असेना बालकृष्ण कालबा अाश्रामात आले आणि रामदेव यांच्याबरोबर त्यांची मैत्री सुरु झाली.

आचार्य बालकृष्ण यांना जडीबुटी विद्या यामध्ये विशेष रस होता तर रामदेव बाबांना योगसाधनेचा. रामदेव यांचं खर नाव रामकिशन यादव. त्यांच घर हरयाणामधलंचं. शेतकरी कुटुंब. अगदी लहानपणीच पॅरालीसीस झाला आणि त्यामुळे  बर करण्यासाठी आश्रमात आले. दिवसरात्र ध्यान आणि योगधारणा करून त्यांनी आपल्या रोगावर विजय मिळवला.

दोघे एकत्र कायम एकत्र असायचे. काही वर्षांनी प्रथम बालकृष्ण यांनी आश्रम सोडला व हरिद्वारला निघून गेले. तिथे त्यांची भेट करम्भीर यांच्याशी झाली. तो गुरु शंकरदेव यांच्या आश्रमात योग शिकवायचा. त्यांच्यासोबत बालकृष्णदेखील शंकरदेव यांच्या अश्रामात योग शिकवू लागले. मग काही दिवसांनी त्यांनी रामदेव यांच्या देखील मागे लकडा लावला की हरिद्वारला या.

अखेर रामदेव तयार झाले. बालकृष्ण यांच्या पाठोपाठ तेही शंकरदेव आश्रमात दाखल झाले. तिथेच शंकर देव यांच्या मार्गदर्शनाखाली या दोघांनी दिव्य योग मंदिर ट्रस्टची स्थापना केली. पुढे काही वर्षांनी शंकरदेव यांचा संशयास्पद मृत्यू झाला. इकडे रामदेव आणि बालकृष्ण ही जोडगोळी दिवसेंदिवस प्रगतीच शिखर पार करतच चालली होती. रामदेव बाबा यांचं संवाद कौशल्य, त्यांची योगसाधना पाहून आस्था टीव्हीने आपल्या चॅनलवर सकाळी योग शिकवण्यास बोलावले. हा कार्यक्रम यशस्वी झाला.

त्यातून रामदेव बाबा यांची पब्लिसिटी वाढू लागली. सकाळी प्रवचन कम योगासन आणि तेही सोप्या पद्धतीने याचा प्रचंड मोठा परिणाम झाला. रामदेव बाबा यांना ठिकठिकाणी योग शिकवण्यासाठी बोलावण्यात येऊ लागलं. अमिताभ बच्चन पासून शिल्पा शेट्टी पर्यंत अनेक जण त्यांचे फॅन झाले. वेगवेगळे राजकारणी देखील रामदेव यांचा गर्दी जमवण्यासाठी फायदा घेऊ लागले. भारतातच नाही तर परदेशातही रामदेव बाबांची योगाशिबिरे हिट होती.

हे सगळ चालेल तेव्हा बालकृष्ण यांनी श्रवण पोद्दार या अनिवासी भारतीयाची मदत घेऊन पतंजलीची स्थापना केली. याचेही पोस्टर बॉय रामदेव बाबाच होते. हळूहळू अस्सल स्वदेशी, गुणकारक आयुर्वेदिक औषधे यापासून सुरु झालेला हा बिझनेस वाढतच गेला. रामदेव बाबांच्या प्रसिद्धीचा या कंपनीला देखील फायदा झाला. 

आज या महाप्रचंड कंपनीचा डोलारा रामदेव बाबा यांचा चेहरा आणि बालकृष्ण यांचं डोकं यामुळे उभा राहिलेला आहे. लोकांकडून उसने पैसे घेऊन सुरु झालेल्या या उद्योगाने २०१२ साली ४५० कोटी तर २०१६ सालापर्यंत १०००० कोटीचा टर्नओव्हर नोंदवला. पतंजली फूड पार्क पासून ते योगसाधना केंद्र अशा अनेक गोष्टीनी सुसज्ज असेलेले हरिद्वार येथील पतंजली आश्रम म्हणजे भारतातील आधुनिक आश्चर्य आहे.

याहूनही सगळ्यात मोठे आश्चर्य म्हणजे हा साम्राज्य सांभाळणारे रामदेव बाबा आणि बालकृष्ण हे दोघेही रूढ अर्थाने अशिक्षित आहे.

बालकृष्ण हे कंपनीचे सीईओ देखील आहेत. साधारण पतंजली उद्योग समुहाचे ९८% शेअर्स बालकृष्ण यांच्या ताब्यात आहेत. भारतातील सर्वात श्रीमंत १० व्यक्तींमध्ये त्यांची गणना होते.

गेल्या काही वर्षांपासून पतंजली देखील वादाच्या भोवर्यात अडकली. अॅलोपथीच्या औषधांवर त्यांनी केलेली टीका, पतंजलीच्या काही प्रोडक्टमध्ये असलेली भेसळ, कंपनी उभारताना गैरव्यवहार केलेला असण्याची शक्यता, पुत्रप्राप्ती औषधं अशा अनेक गोष्टीमुळे रामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्ण यांच्या भोवतीचा वाद कमी झालेला नाही.

काल आचार्य बालकृष्ण यांना हृद्यविकाराचा झटका आल्यामुळे दिल्लीच्या एम्स या रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांचे वय ४७ वर्ष इतके आहे. रामदेव बाबा यांनी मात्र आचार्य बालकृष्ण याना अज्ञात व्यक्तीने दिलेल्या पेढ्यातून विषबाधा झाल्यामुळे अॅडमिट करावे लागले आहे असे सांगितले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.