पायात कितीही हायफाय शूज येऊ देत शाळेतल्या ॲक्शन शूजची जादू विसरली जात नाही

ओ हो हो स्कुल टाइम, ॲक्शन का स्कुल टाइम ’ – प्रत्येक 90’s च्या मुलासाठी अविस्मरणीय जाहिरात जिंगल होती.

1990 च्या दशकातील एक अविस्मरणीय जाहिरात, ॲक्शन शूज जाहिरातीने शालेय जीवनातील सर्व मजेदार आणि नॉस्टॅल्जिक भाग एकत्र केले आणि त्यातून ती जाहिरात लोकांमध्ये इतकी लोकप्रिय झाली की ती जिंगल अजूनही लोकांना त्यांच्या शाळेच्या दिवसात घेऊन जाते.

ॲक्शन शूज 90 च्या दशकातल्या पोरांच्या शालेय जीवनाचा महत्वाचा भाग होता. जाहिरात जितकी सोपी होती तितकीच मार्केटिंग जास्त त्याची होती त्यामुळे ऍक्शन शूज घरोघरी पोहचले. क्लासवर्क, होमवर्क, शिक्षा, व्याख्यान अशा सगळ्या गोष्टी ॲक्शन शूज सोबत निगडित होत्या त्यात जाहिरातीने आमूलाग्र बदल घडवून आणला.

पण ॲक्शन ग्रुपने त्याकाळी शूजमध्ये इतकी प्रसिद्धी मिळवली होती की घरोघरी ॲक्शनच्या गोष्टी यांची मागणी वाढू लागली होती. शालेय अभ्यासक्रमात जितकं पुस्तकांचं महत्व होतं तितकंच महत्व ॲक्शनच्या शूजचं होतं. पण जेव्हा ॲक्शन ग्रुप सुरू झाला तेव्हा ते फक्त शूज विकायचे. शूज विक्रीतून मिळालेली प्रसिद्धी आणि पैसा यातून उभा राहिला ॲक्शन ग्रुप.

१९८४ साली बूट निर्मिती उद्योगापासून हा ग्रुप सुरू झाला आणि त्याच्या यशानंतर स्टील, रसायने, संगणक मॉनिटर, गृहनिर्माण प्रकल्प, आरोग्य सेवा आणि रिटेलच्या इतर क्षेत्रात पसरला. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर एकेकाळी त्याचा ब्रँड ॲम्बेसेडर होता. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात, ॲक्शन ग्रुपकडे मायक्रोटेक आणि ओकाया या दोन ब्रँडचे इन्व्हर्टर आहेत. ( US $ 22 दशलक्ष). अॅक्शन इस्पात या व्यवसायाच्या नावाखाली, या ग्रुपचे ओरिसामधील झारसुगुडा आणि छत्तीसगडमधील रायपूर येथे दोन स्टील प्रकल्प आहेत, प्रत्येकी 0.25 दशलक्ष टन क्षमतेचे आहेत आणि 2016 नंतर ओरिसा प्लांट 2.5 मेट्रिक टनापर्यंत वाढवण्याची योजना होती.

केवळ शूज मधेच अडकून न पडता ॲक्शन ग्रुप सगळीकडेच विस्तारला गेला. ॲक्शन शूज, कृती इस्पात, ॲक्शन केमिकल्स, ॲक्शन टेसा, कृती किरकोळ, मायक्रोटेक इन्व्हर्टर, पायनियर फ्लेक्स, सनसिटी प्रकल्प अशा अनेक विविध क्षेत्रात ग्रुप विस्तारला गेला आहे.

2010 मध्ये, मानव सेवा ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेसह ॲक्शन ग्रुपने दिल्लीत ॲक्शन कॅन्सर हॉस्पिटल उघडले. उद्घाटनाच्या वेळी, भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी केले होते, हॉस्पिटलमध्ये 150 बेड होते. हे श्री बालाजी ऍक्शन मेडिकल इन्स्टिट्यूट, नवी दिल्लीशी देखील संबंधित आहे.

लाला मांगे राम अग्रवाल हे ॲक्शन ग्रुपचे सध्याचे चेअरमन आहेत. आज घडीला करोडोंमध्ये ॲक्शन ग्रुपची उलाढाल चालते आणि भरपूर लोकांना यातून रोजगार मिळतो आहे. एक अस्सल भारतीय ब्रँड म्हणून ॲक्शन ग्रुपची ओळख आहे.

शाळेच्या बुटांपासून सुरू झालेला हा प्रवास आज भारतभर पोहचला आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.