पु.ल. देशपांडे ते आ.ह. साळुंखे तोंडपाठ असणारा ‘सांगलीचा पंक्चरवाला’.

गाडी पंक्चर झाली की टायर खोलणार. त्यानंतर हवा मारून पंक्चर चेक करणार पंक्चर शोधून ते काढायला या माणसाचं हात सरसावू लागतात इतक्यात हा माणूस आर्य समाजाच्या स्थापनेचा विषय छेडतो. सहज बोलता बोलतां सांगतो, प्रबोधन हे दिल्लीतून नाही तर गल्लीतून होण्याची गरज आहे. आपणाला जरा कुठं इतिहासाची तंद्री लागते तोच या माणसानं गाडीचं पंक्चर काढून तयार असतं.

या दरम्यान आपणाला कळून चुकलेली असत की हा साधासुधा पंक्चरवाला नाही तर मराठी साहित्याचा अभ्यास असणारा, संस्कृती आणि राजकारण कोळुन पिलेला अस्सल विचारवंत आहे.

आदम जैमुद्दीन शेख वय वर्ष ६३.

सांगलीच्या राममंदीर चौकाकडून कॉंग्रेसभवनच्या दिशेला जाताना. उजव्या बाजूला वेलणकर मंगल कार्यालय लागतं. त्याच्या समोरच्या गल्लीत आदम शेख यांच पंक्चरच छोटसं दुकान आहे. दूकानाला लागूनचं मागच्या बाजूस छोटसं घर आहे. आदम शेख याचं नगरपालिकेच्या शाळेत सातवीपर्यन्तच शिक्षण झालं. त्यानंतर पोटासाठी म्हणून त्यांनी पंक्चरच दूकान काढलं. दूकानातल्या कामातून मिळणाऱ्या वेळेत त्यांनी वाचनाची सवय लावून घेतली. पु.ल. देशपांडे पासून आ.ह. साळुंखे पर्यन्तची जमेल ती पुस्तक वाचायचा नादच त्यांना लागलां. नुसती पुस्तक वाचून मत तयार व्हायला नको म्हणून दिसेल ते अनेक पुस्तक वाचूनच अचूक गोष्ट घ्यावी हे पक्क मत त्यांनी व्याख्यानं आणि पुस्तक वाचून तयार केलं.

१९७२ पासून वाचन करण्याचा हा प्रवास आजही न चुकता चालतो.

त्यांच्या दिवसाची सुरवातच लोकसत्तेचा अग्रलेख वाचून होते. आदम यांना अग्रलेखांचा तर इतका अभ्यास की कुमार केतकरांनी नेमकं काय लिहलेलं आणि गिरीश कुबेर काय लिहतात ते एखाद्या मातब्बर पत्रकारासारखं ते सांगू लागतात.

आदम शेख यांच साहित्यप्रेम पाहून त्यांना विचारलं की इतकं वाचून काय मिळालं त्यावेळी ते म्हणाले, ” व्याख्यान सुशिक्षीत लोकांसाठी असतात त्यांना जे माहित असत तेच ते ऐकतात आणि वाह वाह करतात. आपल्याला समजत नाही आणि ते आपल्यासाठी असतं हे लक्षात आल्यानंतर मी व्याख्यानांना जायला पुस्तक वाचायला सुरवात केली. पुस्तक वाचून मी ती पुढच्या व्यक्तीला देवू लागलो. आज माझ्याकडे एकसुद्धा पुस्तक नाही. जी पुस्तक वाचली ती दूसऱ्यांना दिली.

थोडक्यात आदम शेख हे नुसते साहित्यवेडे नाहीत तर ते मराठी साहित्य वाचून, विचारवंताचे व्याख्यानं ऐकून ते उत्तम विचारवंत देखील आहेत अस म्हणावं लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.