अदानी ग्रीनचा शेअर्स मागच्या वर्षी ३० रुपयाला होता. आज १,००० रुपयाला आहे, का ते वाचा..

अंबानी, अदानी ही भारताची लाडकी माणसं. कारण ही माणसं फक्त बिझनेसमुळे चर्चेत नसतात. मोदींची जवळीक म्हणून या ना त्या कारणाने ती चर्चेत असतात. कोरानामुळे जगाची कितीही लागली तरिही ही माणसं पोत्याने पैसै कमवत असतात.

आत्ताही तसच झालय, मुद्दा आहे अदानी ग्रीनचा

गेल्या वर्षभरात अदानी ग्रीनने खोऱ्याने पैसा ओढलेला आहे. अगदी आकडेवारीत सांगायच झालं तर २०१९ च्या सुरवातीला अदानी ग्रीनचा शेअर्स ३० रुपयांच्या घरात होता. ऑगस्ट महिन्यात हा शेअर्स ४५ रुपयांवर गेला त्यानंतर नोव्हेंबर २०१९ मध्ये शेअर्सची किंमत ११५ रुपये झाली आणि अगदी तुफान उसळी घेवून हा शेअर्स वरच्या दिशेनेच चढत राहिला.

किती तर या वर्षी म्हणजे २०२० च्या नोव्हेंबर मध्ये या शेअर्सची किंमत १,११५ रुपयांवर गेलेला. आज देखील हजार प्लस मायनस मध्ये शेअर्स खेळतोय. 

Screenshot 2020 12 13 at 4.48.04 PM

ॲन्युअल बेसिसमध्ये सांगायच झालं तर तब्बल ८५६ टक्के इतके रिटर्न्स या कंपनीने दिलेत. २३४४ टक्यांनी शेअर्स वाढलेत. आज कंपनीच मार्केट कॅपिटलायझेशन तब्बल १,७९,००० कोटी इतकं आहे. आज अदानी ग्रीन भारतातल्या प्रमुख २० कंपन्यामध्ये समाविष्ठ झाली आहे. तर कंपनी निफ्टी नेक्स ५० मध्ये सामिल झाली आहे. 

तर आत्ता मुद्या येतोय की अदानी ग्रीन एवढा बुक्का पाडायल्यात ?

तर त्यासाठी आपण काही माहिती घेवूया.

म्हणजे जून २०२० साली झालेला कंपनीचा एक करार बघुया. अदानी ग्रीनचा जून २०२० सालात SECI अर्थात सोलर इंडिया कोर्पोरेशन ऑफ इंडिया सोबत एक करार झाला. इथे SECI मार्फत त्यांना १ गिगावॅटचा प्रोजेक्ट मिळाला. हा प्रोजेक्ट म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सोलर कॉन्ट्रक्ट आहे. या प्रोजक्टची किंमत साधारण ४५ हजार कोटींच्या घरात आहे. या बातमीमुळे देखील शेअर्स वाढण्यात मदत होत गेलीच. 

पण या प्रोजेक्टमध्ये अस सांगण्यात आलं की कंपनीने अदानी ग्रीनने SECI सोबत फिक्स पॉवर पर्चेस अग्रीमेंट केल आहे. म्हणजेच त्यांना अदानीकडून फिक्स रेटमध्ये पॉवर घ्यावी लागेल. पण यामागून चौकशी केल्यानंतर हे कळालं की या करारात फिक्स पॉवर पर्चेस अग्रींमेंट नाही.

थोडक्यात काय तर यामुळे अदानीकडून त्याच किंमतीत पॉवर घ्यावी लागण्याचं बंधन SECI वरती नाहीए. 

या प्रकारामुळे अदानीला फिक्स पॉवर पर्चेसवाला दूसरा खरेदीदार शोधावा लागणार आहे. 

पण इथे मुळ मुद्दा आहे तो कंपनीच्या शेअर्स वाढण्याचा.

तर कंपनीच्या शेअर्समध्ये पब्लिक शेअर होल्डिंगची टक्केवारी फक्त २.४ टक्के आहे.

एकंदरीत सर्व गोष्टी पाहता ही टक्केवारी खूपच कमी आहे. आत्ता हा प्रकार नेमका काय तर शेअर्स घेणारी सर्वसामान्य लोकं फक्त २.४ टक्के आहेत. बाकीचे हे लिमिटेड लोकं मोठ्या प्रमाणात शेअर्स बाळगूण आहेत. त्यामुळे जेव्हा ही लोकं खरेदी करायला उतरतात तेव्हा लगेच शेअर्सच्या किंमतीत उलाढाल वाढू लागते आणि शेअर्सची किंमत मोठ्या प्रमाणात कमी जास्त होते. 

आत्ता दूसरी गोष्ट म्हणजे,

कंपनीचे २२.४ टक्के समभाग हा फॉरेन इस्टिट्यूशनल इन्वेस्टरच्या ताब्यात आहे. पण हे फॉरेन इस्ट्यिट्यूशनल इन्वेस्टर मॉरिशस आणि सायप्रस सारख्या देशातून आहेत. आत्ता तुम्हाला हे कोण असतील हे वेगळं सांगायची गरज नाही. दूसरीकडे कंपनीच्या ०.३ टक्के समभागावरच डोमेस्टिक इस्टिट्यूशनल इन्वेस्टरचा ताबा आहे. 

मग कंपनीचे शेअर्स का वाढत आहे हे कोडं सुटत नाही.

त्यासाठी कंपनीचा बिझनेस परफोर्मेन्स आणि व्हॅल्युएशन पहावं लागतं. जानेवारी ते मार्च २०१९ च्या दरम्यान कंपनीने ६८१ कोटींचा रेव्हेन्यू बूक केला. त्यानंतर जुलै ते सप्टेंबर २०१९ मध्ये हा रेव्हेन्यू कमी होवून ६१२ कोटी झाला. मागील दोन वर्षात कंपनीने लॉस बुक केला होता मात्र मार्च २०२० मध्ये कंपनीने ४५ कोटी तर सप्टेंबर २०२० मध्ये १९ कोटी इतका प्रॉफिट बुक केला आहे. 

पण दूसरीकडे कंपनीचे कर्ज हे गेल्या चार वर्षात १९ हजार कोटींचे झाले आहे. साधारण ग्रीन पॉवरमध्ये कंपन्याचा प्राईज टू अर्निंग रेशो १८ च्या दरम्यान येतो अशा वेळी अदानी ग्रीनचा प्राईज टू अर्निंग रेशो कायच्या काय म्हणजे ४६५१ इतका येतोय. 

बेंजामिन ग्राहम यांनी एक फॉर्म्युला कंपनीचे करंट कॅपिटलायझेशन काढण्यासाठी सांगितला आहे.

यामध्ये करंट प्रॉफिट घेवून त्याला ८.५ ने गुणून त्यामध्ये ग्रोथ रेटची दुप्पटीची बेरीज केली जाते. या फॉर्म्युलानुसार कंपनीच्या मागील चार क्वाटर्समधले प्राफिट ३६ कोटी घेतले तर त्याला ८.५ ने गुणून प्राफीट रेटची दुप्पट मिळवली तर कंपनीचे कॅपिटलायझेशन हे ३ हजार १८५ होते. हे प्राफीट ९६ कोटी अस फिक्स ठेवलं तरी कॅपिटायलायझेशन हे ३३ हजार कोटींच्या दरम्यान येत. 

मात्र कंपनी आत्ता आपले कॅपिटलायझेशन १ लाख ७९ हजार कोटींचे आहे. आत्ता वरील गोष्टींचा निट विचार करुन लोकांना आपआपला निर्णय घ्यावा. तुमचं तुम्ही बघा ऐवढचं भावांनो.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.